चार लोक काय म्हणतील???
तुम्ही कपड्याच्या दुकानात जाऊन तिथे डिटर्जंट पावडर मागितली आहे का किंवा महागातील खूप मोठी कार घेऊन पेट्रोल पंपावर जाऊन त्यामध्ये फक्त पन्नास रुपयाचा पेट्रोल भरा असं सांगितल्यावर त्या माणसाने तुम्हाला विचित्र लूक दिलाय का ?
एखादा फळाला किंवा निर्जीव गोष्टीला दोरा बांधून एखाद्या पाळीव कुत्रा फिरायला न्यावं असं गर्दीच्या ठिकाणी केलय का ? लेक्चरमध्ये एखादा फालतू प्रश्न विचारलाय का ? आपली छाती फुटे स्तोवर मोठ्या आवाजात गर्दीच्या कधी गाणं गायला आहात का ?
मी केलय… माझे आजी आजोबा मला कुठल्यातरी दुकानात पाठवून त्या दुकानात अशी गोष्ट मागायला सांगायचे की जे त्या दुकानात ती मिळण्याची सुतराम शक्यता नाही. आजोबा मला वयाच्या १९ व्या वर्षी कार शिकवताना, माझी भीड चेपण्यासाठी भर ट्राफिकमध्ये मला ड्रायविंग सीट वर सोडून कार मधून उतरून जायचे.
माझे आई-बाबा देखील मला वाट्टेल तेवढं बार्गेनिंग करायला लावायचे. ज्याला आमच्या सायकॉलॉजी च्या भाषेत आणि अल्बर्ट एलिस यांच्या थेअरी नुसार म्हणतात “शेम अटॅकिंग टेक्निक”.
अल्बर्ट एलिस यांनी शेम अटॅकिंग एक्सरसाइज (SAE) जेव्हा introduce केल्या, तेव्हा पहिले त्या त्यांनी स्वतःवर अवलंबल्या. या शेम फुल अटॅकिंग टेक्निक मुळे होतं काय तर सगळ्यात पहिले आपण “नाही” पचवायला शिकतो.
नंतर ज्या Irrational Demand वर आपण अडकलेले असतो जसे की I Must Do Well, You Must Treat me Well & World Must Be Easy , या तीन गोष्टी कायम आपल्याला मागे ओढत राहतात.
पण SAE या विचारसरणीला छेद देतात आणि सांगतात की आपण गरजेपेक्षा काही गोष्टींना, कधीकधी वातावरणाला, समाजाला जास्त महत्व देतो.
एखादी लज्जास्पद गोष्ट घडली तर लोक आपल्याला काय म्हणतील या विचाराने किंवा भीतीने, किंवा सो कॉल्ड सोशल स्टॅंडर्ड मुळे, आपण बऱ्याच गोष्टी टाळतो. या सोशल स्टॅंडर्ड च्या नादात बरेच जण आपल्याला स्वतःला आयुष्य कसे जगायचे आहे याचा विचार करत नाही.
आणि या नादात स्वतःची Worth as a Human Being काय आहे हे लक्षात घेत नाही.
पण हे SAE आपल्याला aware करतात की, एखाद्या गोष्टीमुळे आपल्यावर जग कोसळणार नाहीये, किंवा एखाद्या नकारामुळे आपले आयुष्य संपणार नाहीये. आपण जेवढा विचार करतो की आपल्या बाबतीत लोक काय विचार करत असतील, तेव्हा लोक आपला तेवढा विचार करत नसतात.
SAE मुळे काय काय फायदे होतात
१. आपल्याला नाही पचवता यायला लागतं (Rejection Handling)
२. आपण उगाच काही गोष्टी Generalize, Dramatize करून Unrealistic Conclusion वर येतो.
३. It helps us to conquer our fear related to social settings.
जर तुम्ही Social Anxiety किंवा Rejection ला घाबरत असाल तर You Should Try सेल्फ अटॅकिंग एक्सरसाइजेस विथ द हेल्प ऑफ प्रोफेशनलस.
Few Self Attacking Exercises:
- Tell people that, I ran from Mental Asylum and now I want to Interview you for Quiz Show.
- Wearing Funny Clothes in Public
- Tie a ribbon around a banana and walk while talking as if walking with a pet in a crowded area.
- Writing a formal email with lots of typo errors in it.
- Shout out loudly “STOP” in crowded area.
- Ask for a Cigarettes’ or Condom in a Hardware store.
- न सांगता कोणाच्या तरी घरी जेवायला जाणं
असे एक्सरसाइज लहान मुलांबरोबर हि केले जाऊ शकतात. पण त्यांची Intensity जाणून घेऊन किंवा प्रोफेशनलस बरोबर डिस्कस करून हा उपाय करावा.
Learn to tolerate SHAME.
असे अजून काही Shame Attacking Techniques किंवा Experiences तुमच्याकडे असतील किंवा तुम्ही अनुभवले असतील तर मला नक्की सांगा.
श्रेया कुलकर्णी जोशी
Clinical Psychologist
REBT Practitioner
Flower Remedy Practitioner
Myndfulmantras@gmail.com
www.myndfulmantras.com