तिसरी माळ – तृतीया
देवी – चंद्रघंटा
कौशल्य – शांतता, सौम्यता, सजगता

देवी चंद्रघंटा चे रूप सौम्यता, शांतता दर्शवते.
तिच्या हातात तलवार, गदा, धनुष्यबाण इ अस्त्र-शस्त्र आहेत. तसेच कमळ आणि कमंडलू देखील आहे. जशी ती शांतीसाठी प्रसिद्ध आहे तशीच राक्षसांचा नाश करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
भारतीय महिलांमध्ये देखील देवी चंद्रघंटेचा अंश आढळून येतो. ती शांतपणे, हसतमुख अत्यंत संयमाने स्वतःचा संसार, व्यवसाय सांभाळते. स्वतःचे करिअर संभाळून सगळे सणवार, उत्सव साजरे करते किंबहुना यशस्वीपणे पार पाडते.
कितीही दमली भागली असली तरी घरातील सर्वांचे, पै पाहुण्यांचे हसतमुखाने, मनापासून कोणतीही appreciation ची अपेक्षा न करता अविरतपणे करत असते. घरातील, व्यवसायातील वादविवाद, तंटे ती सामोरे जाऊन, मध्यस्थी करून शांतपणे – प्रेमाने सोडवते.
तेव्हा तिच्यातील देवी चंद्रघंटेचे सौम्यरूप दिसते.
पण कधी कधी असेही प्रसंग येतात, जेव्हा तिच्या आप्तांवर, सग्या सोयऱ्यांवर, व्यवसायात कठीण प्रसंग येतो, येन केन प्रकारे आक्रमणे होतात. तेव्हा मात्र ती प्रसंगी देवी चे रौद्र रूप धारण करते देवी प्रमाणे अस्त्र शस्त्र बाहेर काढते आणि संकटे थोपवतच नाही तर त्यातून बाहेर काढते.
नमन देवी चंद्रघंटेला, नमन नारी शक्तीला!

या शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त Myndful Mantras घेऊन येत आहे ९ देवता ९ कौशल्य (9 Goddess 9Skillset)

प्रत्येक देवी हि कुठल्या ना कुठल्या कौशल्या बरोबर संलग्न आहे..त्याप्रमाणे प्रत्येक स्त्री देखील कुठल्या न कुठल्या देवीचे रूपच असते. त्याला अनुरूप रोज या नवरात्रोत्सवात आपण देवीच्या, आताच्या युगातील स्त्रीच्या एक एक मानसिकतेबद्दल चर्चा करूया..
स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या , खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या या मानसिकतेचा 9 Powerful “Myndful Mantras” चा आपण जागर करू.

नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!

ज्यांनी या नवरात्रीतील मागील दिवसंबद्दल वाचले नसेल त्यांच्यासाठी..
पहिली माळ : https://bit.ly/9Goddess9skillset
दुसरी माळ : https://bit.ly/9goddess9skillsetday2