नववी माळ – नवमी
देवी – सिद्धिदात्री
कौशल्य – दातृत्व, निर्मिती, नियोजन
सिद्धिदात्री देवी च्या आराधनेने भगवान महादेवांना 8 सिद्धींची प्राप्ती झाली होती असे सांगतात. यात अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या सिद्धींचा समावेश होतो. सिद्धिदात्री देवीची उपासना केल्याने या अष्ट सिद्धि, नव निधि, बुद्धि आणि विवेक यांची प्राप्ति होते.
आधुनिक स्त्री जरी सिद्धी देणारी नसली तरी तिच्या सिद्ध हस्ताने ती नेहमीच सगळ्यांना काहींना काही देत असते. पोटभर, मनभरून चांगले – चुंगले खायला देत असते. मुलाबाळांना, नवऱ्याला माया देत असते, सासू सासाऱ्यांना आदराची जागा देत असते, प्रसंगी लग्न झाल्यावर देखील आई – वडिलांना आधार देत असते. नोकरी – व्यवसायात देखील येन केन मार्गाने तिचे सहकार्यांप्रति, employee प्रति हे दातृत्व चालूच असते. मुलांना चांगले संस्कार देणे हे तर तिचे अविरत पणे चालूच असते.
ज्याप्रमाणे सिद्धीदात्री देवीने प्रकुपिता ब्रह्मा ना सृष्टी निर्माण करायला सांगितले, भगवान विष्णू ना ती व्यवस्थित कार्य करतेय ना ह्यावर लक्ष ठेवायला सांगितले आणि महादेवांना दुष्ट प्रवृत्तीच्या विनाशाची जबाबदारी घ्यायला सांगितले. त्याप्रमाणेच स्त्री ही एक उत्तम नियोजन करणारी असते.. एक उत्कृष्ट व्यवस्थापक असते, Manager असते. जशी व्यवसायात ती Employees KRA – Key Responsibilities ठरवून देते, त्याप्रमाणे काम होतेय की नाही हे बघते. तसेच ती घरातही कुटुंबाचे KRA ठरवून देते. जबाबदाऱ्या वाटून देते. स्वतः काय करायचे, नवऱ्याने काय करायचे, मुलांनी कोणती कामे वाटून घ्यायची हे कुशलतेने ठरवते, आणि त्यांना त्याचे महत्व पटवून देऊन, कामे करूनही घेते. घरातील प्रत्येक कार्य, ते कितीही लहान असो किंवा मोठे असो, सणवार – उत्सव असोत, महिला सगळ्याचे यथासांग – व्यवस्थित निययोजन करून ते पार पाडते.
प्रत्येक स्त्री मधील सिद्धिदात्री ला मनापासून प्रणाम !
या शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त Myndful Mantras तर्फे आपण ९ देवता ९ कौशल्य (9 Goddess 9Skillset) या संदर्भात चर्चा केली.
प्रत्येक देवी हि कुठल्या ना कुठल्या कौशल्या बरोबर संलग्न आहे..त्याप्रमाणे प्रत्येक स्त्री देखील कुठल्या न कुठल्या देवीचे रूपच असते. त्याला अनुरूप रोज या नवरात्रोत्सवात आपण देवीच्या, आताच्या युगातील स्त्रीच्या एक एक मानसिकतेबद्दल चर्चा केली..
स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या , खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या या मानसिकतेचा 9 Powerful “Myndful Mantras” चा आपण तुमच्या साहाय्याने जागर केला।
नवरात्रीच्या या शेवटच्या माळेत मी भारतीय स्त्री मधील सर्व गुणांना, तिच्यातील नव दुर्गांना त्रिवार वंदन करते.
श्रेया कुलकर्णी जोशी
क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट
CBT प्रॅक्टिशनर
ज्यांनी या नवरात्रीतील मागील दिवसंबद्दल वाचले नसेल त्यांच्यासाठी..
पहिली माळ : https://bit.ly/9Goddess9skillset
दुसरी माळ : https://bit.ly/9goddess9skillsetday2
तिसरी माळ : http://bit.ly/9goddess9Skillserday3
चौथी माळ : https://bit.ly/9Goddess9SkillsetDay4
पाचवी माळ : https://bit.ly/9Goddess9SkillsetDay5
सहावी माळ : http://bit.ly/9Goddess9SkillsetDay6
सातवी माळ : http://bit.ly/9Goddess9SkillsetDay7
आठवी माळ : http://bit.ly/9Goddess9SkillsetDay8