पहिली माळ – प्रतिपदा
देवी – शैलपुत्री
कौशल्य – सामर्थ्य , धैर्य

प्रत्येक महिलेत उपजतच काही गुण असतात.. त्यातील काही गुण म्हणजे सामर्थ्य आणि धैर्य. ती स्वतःबद्दल आलेल्या, व्यवसायात आलेल्या, तसेच घर – आप्तेष्ट यांच्या संदर्भातील कठीण प्रसंगांना अत्यंत धीराने – धैर्याने सामर्थ्याने तोंड देते आणि कठीण प्रसंगातून बाहेर काढते.

आज शारदीय नवरात्रौत्सव सुरु होत आहे , त्यानिमित्त Myndful Mantras घेऊन येत आहे ९ देवता ९ कौशल्य (9 Goddess 9 Skillset)

प्रत्येक देवी हि कुठल्या ना कुठल्या कौशल्या बरोबर संलग्न आहे..त्याप्रमाणे प्रत्येक स्त्री देखील कुठल्या न कुठल्या देवीचे रूपच असते. त्याला अनुरूप रोज या नवरात्रोत्सवात आपण देवीच्या, आताच्या युगातील स्त्रीच्या एक एक मानसिकतेबद्दल चर्चा करूया.. स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या, खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या या मानसिकतेचा 9 Poweful “Myndful Mantras” चा आपण जागर करू.

नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!