पाचवी माळ – पंचमी
देवी – स्कंदमाता
कौशल्य – निर्दोषपणा, धैर्य, करुणा

देवी स्कंदमाता हे इच्छापूर्ती करणारे रूप मानले जाते. ते माता स्वरूप आहे. त्यामुळे दयाभाव, करूणा, निर्मळ प्रेम हे सगळे भाव तिच्या रुपात आपसूकच येतात.
स्त्री सुद्धा जेव्हा माता या भूमिकेत येते तेव्हा ती स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणते. माता होण्याची चाहूल लागल्यावर स्वतःची काळजी घेता घेता स्वतःच्या जबाबदाऱ्या अत्यंत हुशारीने काळजीपूर्वक पार पाडत असते. मातृत्व जसा तिच्या अपत्याचा जन्म असतो तसाच तिचाही तो पुनर्जन्मच असतो. डिलिव्हरी च्या वेळेस काहिजणींना तर मरणाच्या दारातून झगडून परत यावे लागते. त्यानंतर सुद्धा त्या कोणत्याही विषयाचा बाऊ न करता मुलांच्या संगोपनाकडे, कुटूंबाच्या कामात स्वतःला झोकून देते.
मातेच्या भूमिकेत ती चतुरस्त्र भूमिका बजावत असते नोकरी – व्यवसाय सांभाळणे, मुलांचे संगोपन, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, थोरा मोठ्यांची सेवा सर्व काही यशस्वीपणे हसतमुखाने पेलत असते. मुलांच्या संगोपनात, जडणघडणीत तिचे विशेष लक्ष असते. त्यांच्याभोवती स्वतःचे विश्व निर्माण करतात, स्वतःची स्वप्ने सुद्धा त्यांच्यातच एकजीव करून टाकतात. त्यासाठी पुरुषाच्या बरीबरीने जास्तीची मेहनत करतात. प्रसंगी इतर कुटुंबाला विरोध करन मुलांच्या मागे उभे राहतात. त्यांच्यावर आलेल्या कठीण प्रसंगाच्या वेळेस आधी आई सामोरे जाते. आणि हे सगळे मूल कितीही वर्षाचा झाले तरी अव्याहतपणे चालू असते.
स्त्री च्या ममतेला – ममत्वाला शतशः नमन!

या शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त Myndful Mantras घेऊन येत आहे ९ देवता ९ कौशल्य (9 Goddess 9Skillset)

प्रत्येक देवी हि कुठल्या ना कुठल्या कौशल्या बरोबर संलग्न आहे..त्याप्रमाणे प्रत्येक स्त्री देखील कुठल्या न कुठल्या देवीचे रूपच असते. त्याला अनुरूप रोज या नवरात्रोत्सवात आपण देवीच्या, आताच्या युगातील स्त्रीच्या एक एक मानसिकतेबद्दल चर्चा करूया..
स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या , खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या या मानसिकतेचा 9 Powerful “Myndful Mantras” चा आपण जागर करू.


नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!

ज्यांनी या नवरात्रीतील मागील दिवसंबद्दल वाचले नसेल त्यांच्यासाठी..
पहिली माळ : https://bit.ly/9Goddess9skillset
दुसरी माळ : https://bit.ly/9goddess9skillsetday2
तिसरी माळ : http://bit.ly/9goddess9Skillserday3
चौथी माळ : https://bit.ly/9Goddess9SkillsetDay4