चतुर्थी : कृष्मांडा
कौशल्य – सृजनशीलता (Creativity)

सर्जनशीलता (Creativity) – आज जाणून घेऊया एका Creative व्यक्तिमत्वाबद्दल, “निकिता असोदेकर भागवत”, Nikita Asodekar-bhagwat, ज्या कवयत्री, कॉपी राईटर, लेखिका, निवेदक आणि अश्या अनेक भूमिकांमधून प्रसिद्ध आहेत.

आजच्या दिवशी “देवी कुष्मांडाला” स्मरताना भारतीय स्त्री ची जाणीव प्रकर्षाने होते.
स्वतःच्या संसाराची घडी बसवताना – एक प्रकारे निर्मितीच करताना ती हसतमुखाने प्रत्येक गोष्ट Plan करते. घराची घडी नीट बसवताना तसेच रोजच्या दैनंदिन संसारात देखील महिला छोट्यात छोट्या गोष्टीत Creativity – सर्जनशीलता वापरून चांगल्या गोष्टींची निर्मिती करत असतात. मग ते घर असो ज्यात जेवणातील विविध पदार्थ, घराचे interior, किंवा सण – उत्सवांमधील सजावट असो, किंवा व्यवसायातील अनेक नवनवीन कल्पना असोत. महिला नेहमीच सर्व बाबतींत पुढाकार घेतात

आजच्या मानकरी निकिता असोदेकर भागवत या त्यांच्या लिखाणातून, कवितांमधून त्या सातत्याने नवनवीन गोष्टी उलगडत असतात, कविता, लेख, निवेदन ह्यात तर त्या त्यांची Creativity दाखवत असतातच, पण दैनंदिन जीवनातल्या वस्तू, गोष्टींवर, चालू घडामोडींवर त्या सोशल मिडिया, blog वर व्यक्त होताना त्यांची सर्जनशीलता (Creativity) प्रकर्षाने जाणवते. तसेच त्यांच्या मुलांच्या मार्फत Live जाताना देखील मुलांच्या कार्यक्रमांच्या वेगळेपणात देखील त्यांचा हातभार असतो. त्या स्वतः online विविध विषयांवर कार्यक्रम करतात.
महाराष्ट्र शासनाच्या पुलं-गदिमा-बाबूजी जन्मशताब्दी निमित्त आयोजित, लेखन कार्यशाळांची समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
लेखिका म्हणून अनेक नियतकालिके, दिवाळी अंक, वासंतिक अंकांतून विविध विषयनवर लेखन.
Inspiring aspirers ह्या पुस्तकाचे इंग्रजीतून लेखन. राज्यस्तरीय लेखन कार्यशाळांतून मार्गदर्शक म्हणून सहभाग
गायिका म्हणून अनेक मराठी गीतांच्या कार्यक्रमात सहभागी. विविध वाद्यवृंदांतून गायन निवेदन. निवेदिका, सूत्रसंचालक म्हणून इंद्रधनू, संस्कार भरती, इ साहित्य प्रतिष्ठान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, शिवसेना, जनकल्याण समिती, प्रतिभा संगम, वामनराव ओक रक्तपेढी अशा अनेक संस्थांच्या कार्यक्रमांचे निवेदन, सूत्रसंचालन.


चित्रकार म्हणून प्रदर्शनांतून सहभाग. स्वत्व ह्या कला संस्थेची सदस्य . 200 ×4फूट वारली पेंटिंग.
मुलाखतकार, मुंबई आकाशवाणी, दूरदर्शन येथे संहिता लेखक, निवेदक, मुलाखतकार म्हणून त्यांनी काम केलंय.
चित्रकला, गायन, संगीत, निवेदन इ क्षेत्रांत निकीताजी काम करतात. इमॅजिनिकेतन ह्या स्वतःच्या कंपनीच्या द्वारे सृजनशील लेखन, डिझायनिंग, जाहिरातीची कॉपी, जिंगल, गीत लेखन, सर्व्हे, मीडिया व्यवस्थापन आणि इव्हेंट्स इ. कामे.
आकाशवाणीवरून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या साठी प्रकाशवाटा ह्या कार्यक्रमाची सल्लागार आणि समन्वयक म्हणून काम.
निर्मिती, लेखन, संशोधन,निवेदन ही संपूर्ण जबाबदारी होती.
सध्या विद्याभारती, अखिल भारतीय साहित्य परिषद, स्वत्व, प्रतिभा संगम इ. संस्थांमध्ये सक्रिय.
कवयित्री म्हणून अखिल भारतीय साहित्य संमेलनात अनेकदा निमंत्रित, कोकण मराठी साहित्य संमेलनात व अनेक राज्य सरीय कविसमेलनांतून निमंत्रित कवी म्हणून सहभाग घेतला आहे. प्रतिभा संगम या विद्यार्थी साहित्य संमेलनाची नांदेड येथे निमंत्रक व संचालन समितीत कार्यरत. कवी दुर्गेश सोनार यांच्यासोबत स्वतःच्या आणि अन्य अप्रकाशित कवींच्या कवितांच्या आणि गाण्यांच्या ‘कवितेचं गाणं गण्यातली कविता’ह्या कार्यक्रमाची संकल्पना लेखन आणि सादरीकरण त्यांनी केले आहे.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्टुडंट कौन्सिल मेंबर , IMR जळगाव येथे UR अशा जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत . निकिताजींचे चे शिक्षण BSc , BBM , MMS पर्यंत शिक्षण पुर्ण झाले आहे.
अभाविप च्या ‘हा छत्रशक्तीचा जय ‘, काळ मागतो तुझ्याकडे हे सामर्थ्याचे दान, प्रतिभासंगम थीम सॉंग आणि अनेक Campaigns साठी निकिताजींनी गीतलेखन केले आहे.
निकीताजींना आणि त्यांच्यातील सर्जनशीलतेला – Creativity ला, आणि एकूणच महिला वर्गाच्या Creativity ला Salute.

हा आणि या वर्षीच्या नवरात्रीतील आधीचे लेख Facebook वर www.facebook.com/MyndfulMantras वर जाऊन जास्तीत जास्त share आणि like करा ..

मागील वर्षाच्या नवरात्रीचे लेख बघण्यासाठी क्लिक करा https://www.myndfulmantras.com/blog/

श्रेया कुलकर्णी जोशी
Clinical Psychologist
REBT Practitioner
Flower Remedy Practitioner
Myndfulmantras@gmail.com
www.myndfulmantras.com