पहिली माळ: प्रतिपदा: देवी शैलपुत्री
कौशल्य: सामर्थ्य, धैर्य
प्रत्येक महिलेत उपजतच काही गुण असतात.. त्यातील काही गुण म्हणजे सामर्थ्य आणि धैर्य. ती स्वतःबद्दल आलेल्या, व्यवसायात आलेल्या, तसेच घर – आप्तेष्ट यांच्या संदर्भातील कठीण प्रसंगांना अत्यंत धीराने – धैर्याने सामर्थ्याने तोंड देते आणि कठीण प्रसंगातून बाहेर काढते.
आज शारदीय नवरात्रौत्सव सुरु होत आहे , त्यानिमित्त मागील वर्षाप्रमाणेच पण एका वेगळ्या रुपात Myndful Mantras घेऊन येत आहे ९ देवता ९ कौशल्य (9 Goddess 9 Skillset)
प्रत्येक देवी हि कुठल्या ना कुठल्या कौशल्या बरोबर संलग्न आहे..त्याप्रमाणे प्रत्येक स्त्री देखील कुठल्या न कुठल्या देवीचे रूपच असते. त्याला अनुरूप रोज या नवरात्रोत्सवात आपण देवीच्या, आताच्या युगातील स्त्रीच्या एक एक मानसिकतेबद्दल चर्चा करूया..
स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या , खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या या मानसिकतेचा 9 Poweful “Myndful Mantras” चा आपण जागर करू.
नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!
झाशीची राणी म्हणजेच राणी लक्ष्मीबाई नेवाळकर.
साहस, शौर्य, सामर्थ्य, धैर्य, ममत्व या साऱ्यांचेच मूर्तिमंत उदाहरण. जाज्वल्य राष्ट्रभक्ती आणि पराक्रमाचे प्रतिक.
ज्याप्रमाणे राणी लक्ष्मीबाईंनी सामर्थ्याने, निकराने, पराक्रमाने इंग्रजांशी झाशीच्या किल्ला टिकवण्यासाठी लढा दिला. राष्ट्राची, आपल्या राज्याची सेवा, संरक्षण करताना रणरागिणी चे रूप घेतले, वेळेवर आपल्या मुलाला पाठीशी बांधून रणांगणात स्वतः झुंज दिली. आणि शत्रूच्या पुढे किल्ला राखता येत नाहीये हे लक्षात येताच मुलाला सुखरूप बाहेर काढले. यातून मला वाटते त्यांचे ममत्व आणि मानसिक सामर्थ्य दोन्ही गोष्टी उलगडतात. नंतर पुन्हा सैन्य उभारून इंग्रजांपुढे लढा उभारला.
त्याप्रमाणेच आजची स्त्री सामर्थ्याने, निकराने अनेक आघाड्यांवर लढत असतात मग ते कुटुंब असून देत ( माहेर, सासर दोन्ही कडील), नवरा मुले असून देत की नोकरी अथवा व्यवसाय असून देत, धैर्याने प्रत्येक कठीण प्रसंगाला सामोरे जाऊन आप्त जणांचे संरक्षण करत असतात. प्रसंगी स्वतःच्या Career, अपेक्षांची, हौस – मौज, Passion बरोबर तडजोड करत असतात. पण आपल्या कुटुंबाला, मुला – बाळांना सदैव आनंदी ठेवण्यासाठी धडपडत असतात.
कदाचित त्यांना स्वतःच्या कुटुंबाकडून, नवऱ्या कडून तसेच इतर समाजकडूनही कधी पाठीवर कौतुकाची एक थाप, Appreciation चा एकही शब्द मिळत नसेल. पण ती थांबत नाही.
चला आपणच एकमेकींच्या मैत्रिणी बनू ज्यांना कुटूंबातून असे appreciation मिळत नसेल त्यांना आपण देऊ आणि त्यांची मनःस्थिती बळकट करू.
अश्या सामर्थ्यवान, धैर्यशील आणि ममत्व जपून कुटुंबाची काळजी घेणाऱ्या तुमच्या माझ्यातल्या स्त्री ला मनःपूर्वक नमन!
हा लेख Facebook वर www.facebook.com/MyndfulMantras वर जाऊन जास्तीत जास्त share आणि like करा ..
मागील वर्षाच्या नवरात्रीचे लेख बघण्यासाठी क्लिक करा https://www.myndfulmantras.com/blog/
श्रेया कुलकर्णी जोशी
Clinical Psychologist
REBT Practitioner
Flower Remedy Practitioner
Myndfulmantras@gmail.com
www.myndfulmantras.com