आठवी माळ – अष्टमी
देवी – महागौरी
कौशल्य – ज्ञानी, बुद्धिमत्ता

आजची महिला: अनामिका यशस्वी लढा : Bipolar Disorder
द्वंद्व.. स्वतःच्या सुखदायक आणि क्लेशदायक वागणुकीचे…
द्वंद्व.. सामान्य अस्तित्वासाठीचे…

उच्च आर्थिक सामाजिक घरातून असलेली अनामिका, कॉन्वेंट शाळेत शिक्षण झालेलं. अनामिका हि खूप बुद्धिमान मुलगी, म्हणूनच तिने MBBS करण्यासाठी रशियाला जायचा निर्णय घेतला. रशियाला मध्येच तिला depression ने ग्रासल. त्यामुळे ती भारतामध्ये परत आली. त्यानंतर तिचे लग्न झाले आणि ती लग्नाची भट्टी काही जमलीच नाही आणि लगेचच divorce झाला. सासरच्या लोकांनीसुद्धा बराच त्रास दिला. तेव्हाच माहेरी देखील बरेच संकट आले, वडील गेले, भावाने आईला वृद्धाश्रमात टाकले आणि सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतली. हिच्या दोन बहिणींचे लग्न झाले असल्या कारणाने हि एकटी पडली आणि हिचे खूपच हाल व्यायला लागले. ह्याच दरम्यान माऊली सेवा प्रतिष्टान ला कोणीतरी फोन करून हि सगळी परिस्थिती कळवली. माऊली सेवा प्रतिष्ठानने अनामिकाला तिच्या घरी जाऊन सोडवून माऊली मध्ये आणलं. अनामिका आली तेव्हा तिचं वय ३० वर्ष होत आणि वजन ४० किलो. प्रथमतः अनामिका खूप चिडायची , तिचे खूप मूड स्विंग्ज व्हायचे, एखाद्या वेळेस माऊली मध्ये खूप energy ने काम करणार , सगळ्यांची काळजी घेणार , तर कधी कधी तिला एकदम वाईट वाटायचं, एकटं वाटायचं , इन्सिक़्युअर वाटायचं. आणि अनुवांशिक पद्धतीने diabetis ची सुद्धा देन आहे. अशा सगळ्या लक्षणांमुळे माऊली मधील डॉक्टरांनी तिला Bipolar Disorder असल्याचे सांगितले. आनामिकेने treatmentला योग्य तसा प्रतिसाद द्यायला सुरवात केली. प्रवास खूप तापदायक होता तिच्यासाठी आणि तिच्या आजूबाजूच्या लोकांसाठी सुद्धा. तिचे moods handle करणे कधी कधी खूप त्रासदायक व्हायचे तर कधी कधी खूपच सुखकारक. आता अनामिका stable condition मध्ये आहे. Dr. sucheta सांगतात कि आम्ही जेव्हा माऊली मध्ये नसतो तेव्हा अनामिका आमची कमी कोणालाच भासू देत नाही. अनिमिकाची ओळख करून देतांना हे सांगाव लागतं कि हिला मानसिक त्रास होता. adminstrative department तर ती इतकं छान हाताळते कि विचारूच नका. ती आलेल्या माणसाला अस्खलित इंग्लिश आणि मराठी मधून माहिती देऊ शकते. lockdown च्या काळात तर तिने तिचं राहिलेलं MA देखील पूर्ण केलं, यासाठी तिला माऊली सेवा प्रतिष्ठान कडून खूप प्रोत्साहन मिळालं आणि कौतुक देखील झालं. ती माउलीचा आता एक अविभाज्य भाग आहे.

अश्या ज्ञानी आणि बुद्धिमान दुर्गेला अनामिकेला नवरात्रीच्या आठव्या माळी मनाचा सलाम.

संकल्पना:
“नवदुर्गा – Women Who Fought against Mental Disabilities/Disorders”

मन आणि महिला हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या मला भासतात.
महिला ही टोकाची हळव्या मनाची पण असू शकते आणि टोकाची कणखर मनाची पण असू शकते.
पण महिलेच्या मनाकडे आपण किती लक्ष देतो, महिला तरी स्वतः कडे किती लक्ष देतात ?
चला या नवरात्रोत्सवात आपण महिलेच्या या मनाचा जागर करूयात…मानसिक व्याधींवर ,व्यंगांवर अथवा अपंगत्वावर मात केलेल्या आणि आपले आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचे आयुष्य सुरळीत पणे मार्गक्रमण करणाऱ्या महिलांना जाणून घेऊया..
अनेकदा स्त्री यशस्वी झाली की कौतुक करणारे काही असतात. शारीरिक अपंगत्वावर, व्यंगावर, व्याधी वर मात करून यशस्वी, नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या स्त्रियांचे समाजात कौतुक केले जाते. त्या वेगळे आयुष्य जगतात असे बोलले जाते (त्या Adverse Conditions var मात करून आयुष्य सुरळीत जगत असतातच, जे अजिबात सोपे नसते), त्यांना समाजात मानाचे स्थानही दिले जाते.
परंतु मानसिक आजारांवर, व्याधींवर मात करून यशस्वी झालेल्या, नॉर्मल आयुष्य तेवढ्याच ताकदीने पेलणाऱ्या महिलांना कोठेही फारसे Consider केले जात नाही. कौतुक करणे तर दूरच राहते. बऱ्याचदा कारणे अनेक असतात. आपल्याला मानसिक आजार झाला होता (जरी त्यातून पूर्णपणे बरे झालो असलो तरी) हे लोकांना सांगणे त्यांना योग्य वाटत नाही. दडपण येते. लोक वेडे म्हणतील अशी अनाठायी भीती असते. लोकांसमोर यायला घाबरत असतात. ती व्यक्ती तयार झाली तरी त्याचे कुटुंबीय तयार होत नसतात. या सगळ्या मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी, अश्या रोल मॉडेल लोकांसमोर ठेवण्याचे आम्ही ठरवले. जेणेकरून असे मांनसिक आजार झाले तरी त्यावर यशस्वीपणे मात करून नॉर्मल आयुष्य जगता येते, हे ठळकपणे दाखवून द्यायचे आहे. या महिलांचा, मानसिक आजाराने त्रस्त असणाऱ्या तसेच इतरही महिलांना, आदर्श घालून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

रोज ९ दिवस आम्ही एक एक देवी आणि तिचे कौशल्य बरोबर एक मानसिक आजारावर मात केलेली महिला…आधुनिक दुर्गा आपल्यासमोर आणायचा प्रयत्न करणार आहोत.

आपणही जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना या पोस्ट ला Tag करून, ही पोस्ट शेअर करून जास्तीत जास्ती समाजापर्यंत ही कल्पना पोहोचवावी ही विनंती.

स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या , खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या या मानसिकतेचा 9 Powerful “Myndful Mantras” चा आपण जागर करू.

नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!

श्रेया कुलकर्णी जोशी
Founder Myndful Mantras
Clinical Psychologist
REBT Practitioner