चौथी माळ – चतुर्थी देवी – कुष्मांडा
कौशल्य – सर्जनशीलता

आजची महिला: शर्मिला, यशस्वी लढा : Histrionic Personality Disorder

शर्मिला ही आई-वडिलांची एकुलतिएक मुलगी. लहानपणापासून शर्मिलेला कलेची खूप आवड. शर्मिला चिकण मातीपासून वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू बनवण्यात खूप गुंग असायची. एकदा ती वस्तू तयार झाली की मग ती वस्तू सगळ्यांना दाखवायची आणि मग त्याचा कौतुक सोहोळा व्हायचा.. असं सतत चालू असायचं.. शर्मिला चिडली तरी काहीतरी क्रिएटिव्ह करत बसायची. जसजशी शर्मिला मोठी होत गेली तसं तिच्या आवडी प्रमाणे तिने मूर्तिकार व्हायचं ठरवलं. तिचं सतत कुठे ना कुठे कौतुक व्हायचं.. स्पर्धा परीक्षांमध्ये बक्षीस पण मिळायची. ती उत्कृष्ट आणि नावाजलेली मूर्तिकार होऊ लागली. पण हळू हळू शर्मिलाच लक्ष कामावरून निसटून माझं कोण किती कौतुक करते आणि कसं कौतुक करत यावर जायला लागलं. मित्र मैत्रिणीच्या ग्रुप मध्ये सुद्धा तिलाच center of attraction राहायचं असायचं. शर्मिला बोलायला हुशार आणि दिसायला सुंदर असल्यामुळे ती लोकांचे लक्ष बरोबर वेधून घ्यायची.

हळू हळू मीच फेम मध्ये असले पाहिजे ह्या गोष्टींचं तिला जणू व्यसनच लागलं. फेम मध्ये राहण्यासाठी ती बऱ्याच उठाठेवी करत असे. चांगले कपडे वापरणं, नाटकी पण सालस दाखवणं, तर कधी समोरच्या लोकांचा अपमान करत त्यांना कमी लेखणं. वयात आल्यावर attention साठी मुलांबरोबर seductive behave करू लागली. ह्या सगळ्यामुळे तिचे पटकन कोणाही बरोबर affair सुरू व्हायचे, परंतु उथळ तत्वांमुळे आणि सतत कौतुकाची हाव पूर्ण न झाल्यामुळे लगेच breakup होत असे.. त्यामुळे परत चिडचिड , loneliness, depression, self-harm असे परिणाम दिसू लागले..
शर्मिला जेव्हा counselling ला गेली तेव्हा ती Male psychiatrist बरोबर देखील flirt करायचा प्रयत्न करून attention मिळवण्याचा प्रयत्न करत होती. डॉक्टर सांगतात शर्मिला आली तेव्हा ती Histrionic Personality Disorder होण्याच्या मार्गावर होती. एवढी सुंदर कला हातात असतांना सुद्धा जगण्याची कलाच गमावून बसली होती. ६ महिन्यांच्या counselling नंतर शर्मिला healthy behave करायला लागली. वागतांना, बोलतांना योग्य पद्धतीने विचार करू लागली. आणि आता शर्मिला हि नम्र मूर्तिकार म्हणून ओळखली जाते. आणि स्वतः प्रमाणेच लहान मुलांना, नव कलाकारांना यशस्वी मार्गदर्शन करू लागली. काही अयोग्य विचारसरणीमुळे आपले दैनंदिन आयुष्य कदाचित भरकटत जाऊ शकते. त्यामुळे आपल्या विचारांचे संगोपन करण्यासाठी तरी मानसिक आरोग्याकडे महत्वपूर्वक लक्ष देण्याचा प्रयत्न करूया.

अशा मुळातच सर्जनशील ( Creative ) असलेल्या, नंतर काही काळ अयोग्य विचारांची वाट पकडलेल्या पण अथक परिश्रमांनी पुन्हा सर्जनशीलतेकडे वळलेल्या या Creative दुर्गेस नवरात्री च्या चौथ्या माळी मनःपूर्वक अभिवादन.

संकल्पना:
“नवदुर्गा – Women Who Fought against Mental Disabilities/Disorders”

मन आणि महिला हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या मला भासतात.
महिला ही टोकाची हळव्या मनाची पण असू शकते आणि टोकाची कणखर मनाची पण असू शकते.
पण महिलेच्या मनाकडे आपण किती लक्ष देतो, महिला तरी स्वतः कडे किती लक्ष देतात ?
चला या नवरात्रोत्सवात आपण महिलेच्या या मनाचा जागर करूयात…मानसिक व्याधींवर ,व्यंगांवर अथवा अपंगत्वावर मात केलेल्या आणि आपले आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचे आयुष्य सुरळीत पणे मार्गक्रमण करणाऱ्या महिलांना जाणून घेऊया..
अनेकदा स्त्री यशस्वी झाली की कौतुक करणारे काही असतात. शारीरिक अपंगत्वावर, व्यंगावर, व्याधी वर मात करून यशस्वी, नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या स्त्रियांचे समाजात कौतुक केले जाते. त्या वेगळे आयुष्य जगतात असे बोलले जाते (त्या Adverse Conditions var मात करून आयुष्य सुरळीत जगत असतातच, जे अजिबात सोपे नसते), त्यांना समाजात मानाचे स्थानही दिले जाते.
परंतु मानसिक आजारांवर, व्याधींवर मात करून यशस्वी झालेल्या, नॉर्मल आयुष्य तेवढ्याच ताकदीने पेलणाऱ्या महिलांना कोठेही फारसे Consider केले जात नाही. कौतुक करणे तर दूरच राहते. बऱ्याचदा कारणे अनेक असतात. आपल्याला मानसिक आजार झाला होता (जरी त्यातून पूर्णपणे बरे झालो असलो तरी) हे लोकांना सांगणे त्यांना योग्य वाटत नाही. दडपण येते. लोक वेडे म्हणतील अशी अनाठायी भीती असते. लोकांसमोर यायला घाबरत असतात. ती व्यक्ती तयार झाली तरी त्याचे कुटुंबीय तयार होत नसतात. या सगळ्या मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी, अश्या रोल मॉडेल लोकांसमोर ठेवण्याचे आम्ही ठरवले. जेणेकरून असे मांनसिक आजार झाले तरी त्यावर यशस्वीपणे मात करून नॉर्मल आयुष्य जगता येते, हे ठळकपणे दाखवून द्यायचे आहे. या महिलांचा, मानसिक आजाराने त्रस्त असणाऱ्या तसेच इतरही महिलांना, आदर्श घालून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
रोज ९ दिवस आम्ही एक एक देवी आणि तिचे कौशल्य बरोबर एक मानसिक आजारावर मात केलेली महिला…आधुनिक दुर्गा आपल्यासमोर आणायचा प्रयत्न करणार आहोत.
आपणही जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना या पोस्ट ला Tag करून, ही पोस्ट शेअर करून जास्तीत जास्ती समाजापर्यंत ही कल्पना पोहोचवावी ही विनंती.

स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या , खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या या मानसिकतेचा 9 Powerful “Myndful Mantras” चा आपण जागर करू.

नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!

श्रेया कुलकर्णी जोशी
Founder Myndful Mantras
Clinical Psychologist
REBT Practitioner