दुसरी माळ
देवी – ब्रह्मचारिणी
कौशल्य – संयम, तपश्चर्या, अविचलता
आजची महिला: एक अनामिका, यशस्वी लढा : Addiction आणि Depression
ती तशी उच्च मध्मवर्गीय कुटुंबातील सामान्य मुलगी होती.
घरची आर्थिक परिस्थिती चांगलीच होती. 4 जणांचे चौकोनी कुटुंब. आई, बाबा, मोठी बहीण आणि ही स्वतः. पण म्हणतात ना नियातीला काही वेगळेच मंजूर असते कधी कधी. वडीलांना अल्कोहोल आणि Drugs चे sever addiction. घरातील वातावरण बिघडू लागले. वडलांच्या अशा वागण्यामुळे कालांतराने आई ला सुद्धा acute Depression आले आणि ती सुद्धा Drug Addict झाली. वाद विवाद, भांडणे, मारहाण यात अनामिकेचे नुकतेच सुरू झालेले तारुण्य काही वर्षे अंधारात गेले. सतत drugs घेणे हेच सगळ्या problem Che solutions असे वाटायला लागले. आणि drugs घ्यायला सुरुवात झाली. तशातच आधी वडील आणि मग आई Expire झाले.
ती आणि बहीण दोघीही Depression मध्ये गेल्या. हिला नैराश्याने एवढे ग्रासले की ती अल्कोहोल आणि Drugs च्या महाभयंकर विळख्यात अडकली.
पराकोटीचे भयंकर Drugs ती घेऊ लागली. इतके की ते न मिळाल्याने झालेल्या वादामुळे तिला जेल मध्ये सुद्धा 2 रात्री काढायला लागल्या. जेल मध्ये गेल्यामुळे रिॲलिटीची परखडपणे जाणीव झाली आणि जेल मध्ये तिने ठरवले की आता बास झाले यातून बाहेर पडले पाहिजे. तिच्या बहिणीने तिची खंबीर पणे साथ दिली.
अनेक अथक प्रयत्नानंतर, counselling आणि Rehabilitation Center असे अनेक पर्याय वापरून स्वतः वर कंट्रोल करत ती हळू हळू या सगळ्यातून बाहेर पडली. स्वतःच्या पायावर उभी राहिली. अशक्य ते शक्य असा प्रवास मागे वळून पाहताना तिला तिचा संघर्ष/ यातना पदोपदी आठवत होते. त्यातूनच स्वतःचा छोटासा व्यवसाय सांभाळत तिने अश्या प्रकारच्या Depression ग्रस्त महिलांच्या मदतीला धावायचे ठरवले. त्यांना आधार देत Counselling, स्वतःचे अनुभव यांच्या जोरावर आणि शक्य तेवढी इतर मदत देऊन, Depression मधुन बाहेर काढायला आजही मदत करत आहे.
अश्या या संयमी दुर्गेला, अनामिकेला नवरात्री च्या दुसऱ्या माळी मनःपूर्वक नमन.
मन आणि महिला हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या मला भासतात.
महिला ही टोकाची हळव्या मनाची पण असू शकते आणि टोकाची कणखर मनाची पण असू शकते.
पण महिलेच्या मनाकडे आपण किती लक्ष देतो, महिला तरी स्वतः कडे किती लक्ष देतात ?
चला या नवरात्रोत्सवात आपण महिलेच्या या मनाचा जागर करूयात…मानसिक व्याधींवर ,व्यंगांवर अथवा अपंगत्वावर मात केलेल्या आणि आपले आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचे आयुष्य सुरळीत पणे मार्गक्रमण करणाऱ्या महिलांना जाणून घेऊया..
अनेकदा स्त्री यशस्वी झाली की कौतुक करणारे काही असतात. शारीरिक अपंगत्वावर, व्यंगावर, व्याधी वर मात करून यशस्वी, नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या स्त्रियांचे समाजात कौतुक केले जाते. त्या वेगळे आयुष्य जगतात असे बोलले जाते (त्या Adverse Conditions var मात करून आयुष्य सुरळीत जगत असतातच, जे अजिबात सोपे नसते), त्यांना समाजात मानाचे स्थानही दिले जाते.
परंतु मानसिक आजारांवर, व्याधींवर मात करून यशस्वी झालेल्या, नॉर्मल आयुष्य तेवढ्याच ताकदीने पेलणाऱ्या महिलांना कोठेही फारसे Consider केले जात नाही. कौतुक करणे तर दूरच राहते. बऱ्याचदा कारणे अनेक असतात. आपल्याला मानसिक आजार झाला होता (जरी त्यातून पूर्णपणे बरे झालो असलो तरी) हे लोकांना सांगणे त्यांना योग्य वाटत नाही. दडपण येते. लोक वेडे म्हणतील अशी अनाठायी भीती असते. लोकांसमोर यायला घाबरत असतात. ती व्यक्ती तयार झाली तरी त्याचे कुटुंबीय तयार होत नसतात. या सगळ्या मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी, अश्या रोल मॉडेल लोकांसमोर ठेवण्याचे आम्ही ठरवले. जेणेकरून असे मांनसिक आजार झाले तरी त्यावर यशस्वीपणे मात करून नॉर्मल आयुष्य जगता येते, हे ठळकपणे दाखवून द्यायचे आहे. या महिलांचा, मानसिक आजाराने त्रस्त असणाऱ्या तसेच इतरही महिलांना, आदर्श घालून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
रोज ९ दिवस आम्ही एक एक देवी आणि तिचे कौशल्य बरोबर एक मानसिक आजारावर मात केलेली महिला…आधुनिक दुर्गा आपल्यासमोर आणायचा प्रयत्न करणार आहोत.
आपणही जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना या पोस्ट ला Tag करून, ही पोस्ट शेअर करून जास्तीत जास्ती समाजापर्यंत ही कल्पना पोहोचवावी ही विनंती.
स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या , खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या या मानसिकतेचा 9 Poweful “Myndful Mantras” चा आपण जागर करू.
नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!
श्रेया कुलकर्णी जोशी
Foundar Myndful Mantras
Clinical Psychologist
REBT Practitioner