नववी माळ – नवमी
देवी – सिध्दीदात्री
कौशल्य – दातृत्व, निर्मिती , नियोजन
आजची महिला: कीर्तिदा यशस्वी लढा : OCD
लोकांसाठी निर्मिती करतांना स्वनिर्मिती गवसलेली किर्तिदा
कीर्तिदा एक नामांकित Architect. तिच्या कामाच्या quality साठी , वेळेवर प्रोजेक्ट complete करण्यासाठी प्रसिद्ध. लहान पणापासूनच किर्तीदाला नीटनेटकेपणाची आणि वस्तू जागेवर ठेवण्याची सवय होती. हि तिला तिच्या व्यवसायामध्ये खूपच मदत करत होती. परंतु कुठे थांबावं याची thin line कदाचित किर्तीदाला कळली नसावी. सतत employees ने माझ्या पद्धतीनेच काम करावं. ते काम certain order नेच झालं पाहिजे. माझीच पद्धत आणि कामाची वेळ बरोबर ह्याचा प्रचंड अट्टाहास असायचा. कधी कधी ते योग्य देखील असते पण तसे नाही झाले तर समजावून सांगण्यापेक्षा चिड चिड जास्त व्हायची. कधी कधी staff आणि vendors ला हे difficult होत होतं. Work Environment दुषित होऊ लागले होते. घरी पण तीच परिस्थिती ओटा स्वच्छच असलाच पाहिजे, कचऱ्याचा डबा अमूक जागी असलाच पाहिजे, bedshit अश्या पद्धतीनेच घातली गेली पाहिजे. घरातील सगळ्या वस्तू सगळ्यांनी त्या त्या जागेवरच ठेवल्याच गेल्या पाहिजेत, त्यांचे Direction सुद्धा बदलता कामा नये असे पदोपदी Instructions द्यायची आणि न झाल्यास परत चिड चिड होत असे. त्याच बरोबर कीर्तिदा gas बंद केला आहे का ? कुलूप नीट बंद आहे का ? दार उघड नाही ना हे सतत check करायची.
हळू हे प्रकार वाढतच जात होते. Office, Sites, Customers आणि घर सगळे Suffer होऊ लागले होते. मित्र मंडळींना, घरातल्यांना आणि Collegues हे प्रकर्षाने जाणवायला लागले. प्रत्येकाने आपापल्या परीने Directly, Indirectly तिला सांगून बघितले. सुरुवातीला तिला वाटले आपले कामात Perfection आणि त्या बाबत चा आग्रह ह्यामुळे सगळ्यांना असे वाटतेय. पण ५-६ वेगवेगळ्या लोकांनी सांगितल्यावर तिला ते Alarming वाटले. आणि तिने त्याच्यावर आणि स्वतःवर काम करायला सुरुवात केली.
Counsellor ची हेल्प घ्यायची ठरवली. त्यांनी तिला Treat करायला सुरुवात केली. कीर्तिदा ला OCD आहे असे त्यांना Diagnose झाले. तिला Therapy द्यायला सुरुवात केली. हळू हळू किर्तीदाला स्वतःमधील थोडासा अनावश्यक “च” जाणवू लागला. आणि ती त्यावर काम करू लागली. प्रसंगांना वेगळ्या पद्धतीने Treat करू लागली. आणि अट्टाहासाला Healthy Boundries ने Replace करू लागली. आणि अतिशय सुंदर पद्धतीने अजून सगळे manage करू लागली. सगळी कडची Efficiency वाढली. आणि अजून प्रसिद्धी मिळू लागली. आता कीर्तिदा मुंबई मधील एक नामांकित Architect आहे. आणि Client Projects, अनेकांची घरे यांची उत्कृष्टपणे निर्मिती करताना च्या स्वतःच्या ह्या पुन: निर्मिती बद्दल सुद्धा ती अभिमानाने सगळ्यांना सांगते. अनेक नवोदितांना आणि तरुण वर्गाला ती Business related Skills आणि life Skills बद्दल मार्गदर्शन सुद्धा करते.
अश्या नवनिर्मितीची सदैव आस असणाऱ्या दुर्गेेला नवरात्रीच्या नवव्या माळी मनापासुन नमन..
संकल्पना:
“नवदुर्गा – Women Who Fought against Mental Disabilities/Disorders”
मन आणि महिला हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या मला भासतात.
महिला ही टोकाची हळव्या मनाची पण असू शकते आणि टोकाची कणखर मनाची पण असू शकते.
पण महिलेच्या मनाकडे आपण किती लक्ष देतो, महिला तरी स्वतः कडे किती लक्ष देतात ?
चला या नवरात्रोत्सवात आपण महिलेच्या या मनाचा जागर करूयात…मानसिक व्याधींवर ,व्यंगांवर अथवा अपंगत्वावर मात केलेल्या आणि आपले आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचे आयुष्य सुरळीत पणे मार्गक्रमण करणाऱ्या महिलांना जाणून घेऊया..
अनेकदा स्त्री यशस्वी झाली की कौतुक करणारे काही असतात. शारीरिक अपंगत्वावर, व्यंगावर, व्याधी वर मात करून यशस्वी, नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या स्त्रियांचे समाजात कौतुक केले जाते. त्या वेगळे आयुष्य जगतात असे बोलले जाते (त्या Adverse Conditions var मात करून आयुष्य सुरळीत जगत असतातच, जे अजिबात सोपे नसते), त्यांना समाजात मानाचे स्थानही दिले जाते.
परंतु मानसिक आजारांवर, व्याधींवर मात करून यशस्वी झालेल्या, नॉर्मल आयुष्य तेवढ्याच ताकदीने पेलणाऱ्या महिलांना कोठेही फारसे Consider केले जात नाही. कौतुक करणे तर दूरच राहते. बऱ्याचदा कारणे अनेक असतात. आपल्याला मानसिक आजार झाला होता (जरी त्यातून पूर्णपणे बरे झालो असलो तरी) हे लोकांना सांगणे त्यांना योग्य वाटत नाही. दडपण येते. लोक वेडे म्हणतील अशी अनाठायी भीती असते. लोकांसमोर यायला घाबरत असतात. ती व्यक्ती तयार झाली तरी त्याचे कुटुंबीय तयार होत नसतात. या सगळ्या मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी, अश्या रोल मॉडेल लोकांसमोर ठेवण्याचे आम्ही ठरवले. जेणेकरून असे मांनसिक आजार झाले तरी त्यावर यशस्वीपणे मात करून नॉर्मल आयुष्य जगता येते, हे ठळकपणे दाखवून द्यायचे आहे. या महिलांचा, मानसिक आजाराने त्रस्त असणाऱ्या तसेच इतरही महिलांना, आदर्श घालून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
रोज ९ दिवस आम्ही एक एक देवी आणि तिचे कौशल्य बरोबर एक मानसिक आजारावर मात केलेली महिला…आधुनिक दुर्गा आपल्यासमोर आणायचा प्रयत्न करणार आहोत.
आपणही जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना या पोस्ट ला Tag करून, ही पोस्ट शेअर करून जास्तीत जास्ती समाजापर्यंत ही कल्पना पोहोचवावी ही विनंती.
स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या , खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या या मानसिकतेचा 9 Powerful “Myndful Mantras” चा आपण जागर करू.
नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!
श्रेया कुलकर्णी जोशी
Founder Myndful Mantras
Clinical Psychologist
REBT Practitioner