पहिली माळ: देवी शैलपुत्री
कौशल्य – सामर्थ्य , धैर्य
मन आणि महिला हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या सारख्या मला भासतात.
महिला ही टोकाची हळव्या मनाची पण असू शकते आणि टोकाची कणखर मनाची पण असू शकते.
पण महिलेच्या मनाकडे आपण किती लक्ष देतो, महिला तरी स्वतः कडे किती लक्ष देतात ?
चला या नवरात्रोत्सवात आपण महिलेच्या या मनाचा जागर करूयात…मानसिक व्याधींवर ,व्यंगांवर अथवा अपंगत्वावर मात केलेल्या आणि आपले आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचे आयुष्य सुरळीत पणे मार्गक्रमण करणाऱ्या महिलांना जाणून घेऊया..
अनेकदा स्त्री यशस्वी झाली की कौतुक करणारे काही असतात. शारीरिक अपंगत्वावर, व्यंगावर, व्याधी वर मात करून यशस्वी, नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या स्त्रियांचे समाजात कौतुक केले जाते. त्या वेगळे आयुष्य जगतात असे बोलले जाते (त्या Adverse Conditions var मात करून आयुष्य सुरळीत जगत असतातच, जे अजिबात सोपे नसते), त्यांना समाजात मानाचे स्थानही दिले जाते.
परंतु मानसिक आजारांवर, व्याधींवर मात करून यशस्वी झालेल्या, नॉर्मल आयुष्य तेवढ्याच ताकदीने पेलणाऱ्या महिलांना कोठेही फारसे Consider केले जात नाही. कौतुक करणे तर दूरच राहते. बऱ्याचदा कारणे अनेक असतात. आपल्याला मानसिक आजार झाला होता (जरी त्यातून पूर्णपणे बरे झालो असलो तरी) हे लोकांना सांगणे त्यांना योग्य वाटत नाही. दडपण येते. लोक वेडे म्हणतील अशी अनाठायी भीती असते. ते लोकांसमोर यायला घाबरत असतात. ती व्यक्ती तयार झाली तरी त्याचे कुटुंबीय तयार होत नसतात. या सगळ्या मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी, अश्या रोल मॉडेल लोकांसमोर ठेवण्याचे आम्ही ठरवले. जेणेकरून असे मांनसिक आजार झाले तरी त्यावर यशस्वीपणे मात करून नॉर्मल आयुष्य जगता येते, हे ठळकपणे दाखवून द्यायचे आहे. या महिलांचा, मानसिक आजाराने त्रस्त असणाऱ्या तसेच इतरही महिलांना, आदर्श घालून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
रोज ९ दिवस आम्ही एक एक देवी आणि तिचे कौशल्य बरोबर एक मानसिक आजारावर मात केलेली महिला- आधुनिक दुर्गा आपल्यासमोर आणायचा प्रयत्न करणार आहोत.
आपणही जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना या पोस्ट ला Tag करून, ही पोस्ट शेअर करून जास्तीत जास्ती समाजापर्यंत ही कल्पना पोहोचवावी ही विनंती.
आज जाणून घेणार आहोत , अश्याच एका मानसिक व्याधींवर मात करून, लढा देऊन आता चे आयुष्य नॉर्मल जगत असणाऱ्या माधुरी माधव, यांच्या बद्दल.
माधुरी ह्या CMS Computer मध्ये १४ वर्ष झाले नोकरी करत होत्या. अचानक एके दिवशी मुलाचा accident होतो. आणि मुलाला एकटं सोडण शक्य नसल्याने त्यांनी आपली नोकरी सोडायचे ठरवले. त्यानंतर एकाकीपणामुळे मधुरींना कसले तरी भास व्यायला लागले आणि हळू हळू Schizophrenia ह्या मानसिक आजाराने त्या ग्रस्त झाल्या. सतत होणारे भास, त्याचे त्रास ह्यामुळे दैनंदीन जीवन विस्कळीत झाले होते. काही वर्षे त्यांची Treatment Andheri मधील Dr कडे झाली. पण त्यांना अंधेरी – डोंबिवली ट्रीटमेंट साठी जाणे शक्य नसल्यामुळे त्यांनी पुढील Treatment डोंबिवलीतील नामांकित डॉ अद्वैत पाध्ये यांच्याकडे यशस्वीरीत्या पूर्ण केली. तिथेच डॉक्टरांनी अश्याच पेशंट करिता केलेल्या “फिनिक्स गृप ” मध्ये त्या जाऊ लागल्या व त्यांचा आत्मविश्वास परत आला. तिथे माधुरी जी ना शिवणकाम येत असल्याने त्या कामात पण त्यांनी रस घेतला.
नंतर त्या आजारातून जवळपास बरे झाल्यावर पाध्ये डॉक्टरांशी काही काम मिळू शकेल का असे विचारले जेणेकरून त्या मुख्य प्रवाहात राहू शकतील.
डॉक्टरांनी देखील त्यांचा आत्मविश्वास आणि काम करायची जिद्द बघून त्यांना त्यांच्याच क्लिनिक मध्ये Receptionists ची नोकरी देऊ केली. माधुरी जी नी ती जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पाडली. आणि अजुनही छान प्रकारे त्या जबाबदारी सांभाळत आहेत. माधुरी म्हणतात आलेल्या पेशंटला स्वतःच्या अनुभवावरून धीर देता येतो. आणि ह्याची जाणीव देखील राहते की कोणाच्यातरी दुःखापेक्षा आपले दुःख छोटे आहे. हे सगळे चालू असताना, आणि ट्रीटमेंट चालू असतानाच अनेक लहान मोठे प्रसंग आले, माधुरीजी नी सामर्थ्याने त्या सगळ्यांना नुसते यशस्वीपणे तोंड नाही दिले तर त्या परिस्थितीवर मात करून पुढे वाटचाल केली.
त्यांना, या आजारातून बरे होऊन नॉर्मल आयुष्य जगण्यास सुरुवात केली म्हणून, IPH (Institute for Psychological Health, Thane) तर्फे “द्विज” या पुरस्काराने देखील सन्मानित केले आहे.
त्यांच्या या आदर्शवत जीवनाने अनेक मानसिक आजारांशी झगडणाऱ्या तसेच नॉर्मल महिलांना नक्की प्रेरणा मिळेल.
अश्या या सामर्थ्यवान दुर्गेला माधुरी माधव ना, या पावन नवरात्री च्या सुरुवातीला मनःपूर्वक नमन.
स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या , खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या या मानसिकतेचा 9 Poweful “Myndful Mantras” चा आपण जागर करू.
नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!
श्रेया कुलकर्णी जोशी
Foundar Myndful Mantras
Clinical Psychologist
REBT Practitioner