पाचवी माळ : पंचमी
देवी : स्कंदमाता
कौशल्य: करुणा, निर्दोषपणा, धैर्य
आजची महिला: सारा, यशस्वी लढा : Cerebral Palsy
वय लहान पण धैर्य महान. आजची कहाणी साराची ,जिद्दीची, धैर्याची, आणि असीम संयमाची.
वय लहान पण धैर्य महान. आजची कहाणी साराची ,जिद्दीची, धैर्याची, आणि असीम संयमाची. सारा ला भेटवण्यामध्ये प्रा Foundation च्या प्राजक्ता कोळपकर ह्यांचा मोलाचा वाटा. सारा ही premature baby. जन्म झाल्यावर दहा दिवस व्हेंटिलेटर वरती होती. तिला नॉर्मल श्वास घेता यायला लागला आणि डॉक्टरांनी साराला घरी पाठवले. परंतु नंतर लगेचच काही दिवसात साराच्या मानेत गाठ अढळून आली. डॉक्टरांनी यासाठी physiotherapy घ्यावी लागेल असे सांगितले. physiotherapy चालू होतीच तरी घरातल्यांना असं वाटायचं की अजून साराचे development che milestones लेट होतायेत. परंतु काही दिवसातच डॉक्टरांनी physiotherapy सगळया शरीराला द्यायला सांगितले आणि साराला Cerebral Palsy आहे हे देखील नमूद केले. म्हणजेच साराचा एक हाथ आणि एक पाय stiff आहे. ती सपोर्ट शिवाय बसू शकत नाही, चालू शकत नाही.. साराचे शरीर जरी व्यवस्थित नसले तरी सुद्धा तिची बुद्धिमत्ता मात्र देवाने शाबुत ठेवलीये. सारा ही 10 वी पर्यंत शिकलीये आणि पुढे शिकायची देखील तिची इच्छा आहे. सारा swimming ला देखील जायची, परंतु आईला Cancer detect झाला आणि साराला शाळा आणि swimming थांबवावं लागलं कारण सारा बर्यापैकी आईवर dependant आहे. आईला Cancer झाल्यावर देखील, सारा स्वतः medically down असून सुद्धा आईला या आजारात खचून न जाण्यासाठी खूप प्रोत्साहन देत असे. तिची आई म्हणते “सारामुळे खरोखरच या आजारातून बाहेर पडायला खूप मदत झाली, खरतर तेव्हा साराच माझी आई झाली होती.” इतकंच नाही तर साराचा “One Day One Thought” हा Youtube चॅनल आहे, आणि त्यावर सारा वेगवेगळे आणि छान आशयाचे videos post करत असते आणि लोकांना motivation देत असते. प्रत्येकाने नक्कीच एकदा या चॅनल भेट द्या. कॉम्प्युटर हाताळणे, टायपिंग करणे हे सारा उजव्या हाताने करत असते. सारा चेसही खेळते. साराशी बोलले तेव्हा तिच्या आवाजात एक energy जाणवली आणि किती संयमाने ती हे सगळं हाताळत असेल ह्याची जाणीव झाली. मला माहितीये हि series Mentally Challenged var आहे. आपण शरीराने धडधाकट असून सुद्धा कित्ती कुरबुरी करत असतो ना रोज. किती complaints असतात आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांच्या, वातावरणाच्या, परिस्थितीच्या.. मला असं वाटतं सतत complaint करत राहणं हे कुठल्या व्यंगापेक्षा कमी नाही. सारा या अशा खडतर परिस्थितीत काहीतरी करण्याचा सतत प्रयत्न करतीये हिच प्रेरणा घेऊन आपणही आपल्या Mental तसेच शारारीक Health कडे कटाक्षाने लक्ष देऊयात.
अशा संयमी आणि करुणामय दुर्गेला नवरात्रीच्या या पाचव्या माळी मनःपूर्वक नमन.
संकल्पना:
“नवदुर्गा – Women Who Fought against Mental Disabilities/Disorders”
मन आणि महिला हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या मला भासतात.
महिला ही टोकाची हळव्या मनाची पण असू शकते आणि टोकाची कणखर मनाची पण असू शकते.
पण महिलेच्या मनाकडे आपण किती लक्ष देतो, महिला तरी स्वतः कडे किती लक्ष देतात ?
चला या नवरात्रोत्सवात आपण महिलेच्या या मनाचा जागर करूयात…मानसिक व्याधींवर ,व्यंगांवर अथवा अपंगत्वावर मात केलेल्या आणि आपले आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचे आयुष्य सुरळीत पणे मार्गक्रमण करणाऱ्या महिलांना जाणून घेऊया..
अनेकदा स्त्री यशस्वी झाली की कौतुक करणारे काही असतात. शारीरिक अपंगत्वावर, व्यंगावर, व्याधी वर मात करून यशस्वी, नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या स्त्रियांचे समाजात कौतुक केले जाते. त्या वेगळे आयुष्य जगतात असे बोलले जाते (त्या Adverse Conditions var मात करून आयुष्य सुरळीत जगत असतातच, जे अजिबात सोपे नसते), त्यांना समाजात मानाचे स्थानही दिले जाते.
परंतु मानसिक आजारांवर, व्याधींवर मात करून यशस्वी झालेल्या, नॉर्मल आयुष्य तेवढ्याच ताकदीने पेलणाऱ्या महिलांना कोठेही फारसे Consider केले जात नाही. कौतुक करणे तर दूरच राहते. बऱ्याचदा कारणे अनेक असतात. आपल्याला मानसिक आजार झाला होता (जरी त्यातून पूर्णपणे बरे झालो असलो तरी) हे लोकांना सांगणे त्यांना योग्य वाटत नाही. दडपण येते. लोक वेडे म्हणतील अशी अनाठायी भीती असते. लोकांसमोर यायला घाबरत असतात. ती व्यक्ती तयार झाली तरी त्याचे कुटुंबीय तयार होत नसतात. या सगळ्या मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी, अश्या रोल मॉडेल लोकांसमोर ठेवण्याचे आम्ही ठरवले. जेणेकरून असे मांनसिक आजार झाले तरी त्यावर यशस्वीपणे मात करून नॉर्मल आयुष्य जगता येते, हे ठळकपणे दाखवून द्यायचे आहे. या महिलांचा, मानसिक आजाराने त्रस्त असणाऱ्या तसेच इतरही महिलांना, आदर्श घालून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
रोज ९ दिवस आम्ही एक एक देवी आणि तिचे कौशल्य बरोबर एक मानसिक आजारावर मात केलेली महिला…आधुनिक दुर्गा आपल्यासमोर आणायचा प्रयत्न करणार आहोत.
आपणही जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना या पोस्ट ला Tag करून, ही पोस्ट शेअर करून जास्तीत जास्ती समाजापर्यंत ही कल्पना पोहोचवावी ही विनंती.
स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या , खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या या मानसिकतेचा 9 Powerful “Myndful Mantras” चा आपण जागर करू.
नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!
श्रेया कुलकर्णी जोशी
Founder Myndful Mantras
Clinical Psychologist
REBT Practitioner