सातवी माळ : सप्तमी
देवी : कालरात्री
कौशल्य: शुभंकारी, बहुगुणी
आजची महिला: पूजा यशस्वी लढा : मतिमंदत्वाशी
मतिमंद समजणाऱ्या लोकांची स्व-कर्तुत्वाने मति गुंग करणारी पूजा…
नक्की वाचा कहाणी अहुआयामी पूजाची..
पूजाच्या वेळेस पूजाच्या आईची Forceps Delivery झाली. चिमटा लावताना पूजाचा नस दबली गेली. जन्मल्यानंतर काही काळाने पूजा रडायला लागली. पहिले दोन वर्ष खूप छान गेले. पण दुसऱ्या वर्षी पूजाला गॅस्ट्रो आणि कावीळची लागण झाली त्याचा परिणाम इतका झाला की पूजाचं पुढच आयुष्य बदलून गेलं. जन्माच्या वेळेस झालेले complications आणि नंतर झालेली कावीळ व गॅस्ट्रो आणि तेंव्हा डोक्यात गेलेला ताप या सगळ्याचा परिणाम म्हणजे पूजाला डॉक्टरांनी मतिमंद असल्याचं declare केलं.
पूजा स्पेशल मुलांच्या शाळेत जायला लागली आणि तेव्हा पासूनच शाळेला तिच्यातले गुणधर्म ओळखायला यायला लागले. शाळेत असताना पूजाला “आदर्श विद्यार्थीनी” हे आवर्ड देखील मिळालं आहे. पूजा आता Phoenix group च्या Lark शाळेत शिकवायला जाते. आज पूजा एकटी फिरू शकते, इतकं तिच्या आईनी तिला आत्मनिर्भर बनवलं आहे. पुणे ते लोणावळा चालत जाण्याच्या स्पर्धेत पूजा पहिली आली होती. ऑर्गनायझर सांगतात ती या मार्गात कुठेही थकली नाही आणि तिने जर्नी पूर्णच नाही केली तर तिथे ती पहिली आली. शाळेत आणि इतर ठिकाणी पूजाचं खूप कौतुक असतं. इतकंच करून पूजा शांत नाही बसत, पूजाची आम्हाला भेट घडवून दिलेल्या प्राजक्ता कोळपकर च्या प्रा Foundation ला पूजाने 1000 आकाशकंदील बनवून दिले होते. Paper Quilling, Paper चे पाकीट हे देखील पूजा बनवते. वेगवेगळ्या ठिकाणी पूजा exhibition मध्ये भाग घेते. आणि आजपर्यंत पुजाने जवळपास 10 हजार पाकीट बनवून विकली आहेत. पूजाचे ड्रॉइंग्स खूप सुंदर आहेत थोडक्यात सांगायचं तर पूजाकडे जवळपास 30 ते 40 मेडल्स आहेत. पूजा खूप सुंदर गाणी म्हणते आणि पूजा अंदमान निकोबार येथे एकटी देखील जाऊन आलेली आहे. अशा odd परिस्थितीमध्ये देखील पूजा सतत कायर्रत राहण्याचा प्रयत्न करते.
अशा बहुगुणी निरंकारी दूर्गेला पूजेला नवरात्रीच्या सातव्या माळी शतशः नमन..
संकल्पना:
“नवदुर्गा – Women Who Fought against Mental Disabilities/Disorders”
मन आणि महिला हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या मला भासतात.
महिला ही टोकाची हळव्या मनाची पण असू शकते आणि टोकाची कणखर मनाची पण असू शकते.
पण महिलेच्या मनाकडे आपण किती लक्ष देतो, महिला तरी स्वतः कडे किती लक्ष देतात ?
चला या नवरात्रोत्सवात आपण महिलेच्या या मनाचा जागर करूयात…मानसिक व्याधींवर ,व्यंगांवर अथवा अपंगत्वावर मात केलेल्या आणि आपले आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचे आयुष्य सुरळीत पणे मार्गक्रमण करणाऱ्या महिलांना जाणून घेऊया..
अनेकदा स्त्री यशस्वी झाली की कौतुक करणारे काही असतात. शारीरिक अपंगत्वावर, व्यंगावर, व्याधी वर मात करून यशस्वी, नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या स्त्रियांचे समाजात कौतुक केले जाते. त्या वेगळे आयुष्य जगतात असे बोलले जाते (त्या Adverse Conditions var मात करून आयुष्य सुरळीत जगत असतातच, जे अजिबात सोपे नसते), त्यांना समाजात मानाचे स्थानही दिले जाते.
परंतु मानसिक आजारांवर, व्याधींवर मात करून यशस्वी झालेल्या, नॉर्मल आयुष्य तेवढ्याच ताकदीने पेलणाऱ्या महिलांना कोठेही फारसे Consider केले जात नाही. कौतुक करणे तर दूरच राहते. बऱ्याचदा कारणे अनेक असतात. आपल्याला मानसिक आजार झाला होता (जरी त्यातून पूर्णपणे बरे झालो असलो तरी) हे लोकांना सांगणे त्यांना योग्य वाटत नाही. दडपण येते. लोक वेडे म्हणतील अशी अनाठायी भीती असते. लोकांसमोर यायला घाबरत असतात. ती व्यक्ती तयार झाली तरी त्याचे कुटुंबीय तयार होत नसतात. या सगळ्या मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी, अश्या रोल मॉडेल लोकांसमोर ठेवण्याचे आम्ही ठरवले. जेणेकरून असे मांनसिक आजार झाले तरी त्यावर यशस्वीपणे मात करून नॉर्मल आयुष्य जगता येते, हे ठळकपणे दाखवून द्यायचे आहे. या महिलांचा, मानसिक आजाराने त्रस्त असणाऱ्या तसेच इतरही महिलांना, आदर्श घालून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
रोज ९ दिवस आम्ही एक एक देवी आणि तिचे कौशल्य बरोबर एक मानसिक आजारावर मात केलेली महिला…आधुनिक दुर्गा आपल्यासमोर आणायचा प्रयत्न करणार आहोत.
आपणही जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना या पोस्ट ला Tag करून, ही पोस्ट शेअर करून जास्तीत जास्ती समाजापर्यंत ही कल्पना पोहोचवावी ही विनंती.
स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या , खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या या मानसिकतेचा 9 Powerful “Myndful Mantras” चा आपण जागर करू.
नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!
श्रेया कुलकर्णी जोशी
Founder Myndful Mantras
Clinical Psychologist
REBT Practitioner