दुसरी माळ: देवी ब्रम्हचारिणी
कौशल्य – संयम, तपश्चर्या, अविचलता
आजची दुर्गा: सौ. श्वेता इनामदार

कष्टाने आणि प्रामाणिक प्रयत्नांनी सर्वकाही मिळवता येतं असं म्हणणारी आणि Accident नंतरही शारीरिक त्रास आणि limitations वर मात करत यशस्वी वाटचाल करणारी आजची आपली दुर्गा.

शारदीय नवरात्रौत्सवात माईडफुल मंत्राज जागर करीत आहे अशा नऊ महिलांचा ज्यांच्या तिमिरातून तेजाकडे जाण्याच्या प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळते आहे, आणि यापुढे देखील मिळत राहील.
आजच्या डिजिटल विश्वात आपण अशा महिलांचा जागर करणार आहोत ज्यांनी खऱ्या अर्थाने देवीच्या गुणांना अंगिभूत केले आहे. अशा महिला ज्यांनी नवदुर्गांचा अंश आमच्यातही आहे असं म्हणत संकटांवर मात केली आहे आणि आज त्या दिमाखात इतरांना संकट काळात लढण्याची प्रेरणा देत आहेत.

कष्टाने आणि प्रामाणिक प्रयत्नांनी सर्वकाही मिळवता येतं असं म्हणणारी आजची आपली दुसरी दुर्गा म्हणजेच देवी ब्रम्हचारिणीच्या संयम, तपश्चर्या आणि अविचलता या गुणांचे प्रतिनिधित्व करणारी प्रसिद्ध व्यवसायिका आणि S.A. Inamdar Readymade Matching Blouses Pvt. Ltd. च्या Director श्वेता ईनामदार.

वयाच्या 19 व्या वर्षी दिल्लीतून आएएसची परिक्षा देत असताना वडिलांचे अचानक निधन झाले आणि घरच्या व्यवसायात संयमाने सहभाग घेणं भाग पडलं. व्यवसायातलं मार्गदर्शन करणारं कोणीही नसताना अनुभव हाच मोठा मार्गदर्शक मानून वडिलांच्या रेडिमेड ब्लाऊज विक्रीच्या दुकानाला उद्योगाचं स्वरुप प्राप्त करुन देण्याचा निर्णय श्वेता ईनामदार यांनी पक्का केला.

१९९२ साली दुकानात काम सुरु केलं त्यावेळी अनेक अडचणी होत्या, अनेक कारागिर काम सोडून गेले होते, ब्लाऊजचे फ़ॉर्मास चोरीला गेले होते. त्यावेळी त्या स्वतः ब्लाऊजचे सँम्पल्स आणि फॉर्मास बनवायला शिकल्या. हे करत असतांना काही काळातच त्यांनी पुणे, ठाणे आणि दादर भागात दुकानाच्या ब्रँचेस सुरु केल्या. २०१९ साली यूएसए मध्ये चौथी ब्रँच सुरू केली आणि व्यवसायिका श्वेता इनामदार यांनी १९९२ मध्ये पाहिलेलं स्वप्न पुर्ण झालं. वडिलांच्या दुकानाचा व्यवसाय आणि व्यवसायाचं यशस्वी उद्योगात रुपांतर करतानाचा हा प्रवास अजिबातच सोपा किंवा सहज नव्हता, ही एक तपश्चर्या होती जी श्वेता ईनामदार यांनी संयमी वृत्तीने केली. त्यातच दुकानात काम करतांना त्या २८ फुटांवरून खाली पडल्या आणि आता पुढे काय? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला. कित्येक महिने श्वेता ईनामदार ह्या हॉस्पिटलमध्ये होत्या. पण दुकान, व्यवसाय, असलेले कारागीर हा सगळा पसारा आणि त्यासाठी चाललेली त्यांची तगमग काही त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितल कि आता तुम्ही चालू शकत नाही, दुसरे कोणी असते तर चालताच येणार नाही या कल्पनेने सुद्धा खचले असते. परंतु केवळ आणि केवळ मानसिक जोराच्या बळावर आज हि आपली दुर्गा फक्त नजरेने अंतर मोजून अंदाज घेत पाऊल टाकत असते. अजुनही major Spinal Cord इन्जुरी असतांना, शारीरिक Limitations, प्रचंड शारीरिक त्रास असुनही ह्याचा किचिंतसा लवलेशही श्वेता ईनामदार यांच्या चेहेऱ्यावर येत नाही. किंवा त्या आजारपणाचा त्या बाऊ देखील करत नाहीत, Undue Advantage घेत नाहीत.

मला श्वेता मॅमबरोबर जवळून काम करायची संधी मिळालेली आहे, त्याचं नियोजन, बारीक बारीक गोष्टींवर लक्ष देऊन संयमाने त्या काम करतात. त्या नेहमी सांगतात की, व्यवसाय हा पूर्णवेळच करावा लागतो. पार्ट टाईम व्यवसाय करणाऱ्यांना, यश देखील पार्ट टाईम मिळत जातं. स्वतःवर आणि स्वतःच्या मेहनीतीवर विश्वास ठेवून अविचल राहणारी आजची आपली दुर्गा श्वेता ईनामदार यांना अनेक नामांकित अवॉर्ड्स मिळालेले आहेत. प्रिंट तसेच इलेक्ट्रोनिक media मधून त्यांच्या तपश्चर्याबद्दल लेख तसेच मुलाखती आलेल्या आहेत. वेगवेगळ्या सामाजिक तसेच business forums वर त्या कार्यरत आहेत आणि उत्तम कामगिरी करतायेत. BBNG ह्या नामांकित संस्थेच्या Women Wing ची सेक्रेटरी म्हणून जबाबदारी निभावताना अनेक महिलांना व्यवसाय दृष्टिकोनातून Empower करत असतात.

अशाच देवी ब्रह्मचारिणीच्या गुणांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संयमी आणि अविचलपणे तपश्चर्या करणाऱ्या श्वेता ईनामदार या आजच्या दुर्गेला माईंडफुल मंत्राजचा मानाचा मुजरा..

ब्रह्मचारिणी श्लोक :
दधाना करपद्माभ्यामक्षमालाकमण्डलू।
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा॥
या देवी सर्वभूतेषु माँ ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

रोज ९ दिवस आम्ही एक एक देवी आणि तिचे कौशल्य या बरोबर नऊ महिलांचा, ज्यांच्या तिमिरातून तेजाकडे जाण्याच्या प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळते आहे, आणि यापुढे देखील मिळत राहील अश्या महिला- आधुनिक दुर्गा आपल्यासमोर आणायचा प्रयत्न करणार आहोत.

आपणही जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना या पोस्ट ला Tag करून, ही पोस्ट शेअर करून जास्तीत जास्ती समाजापर्यंत ही कल्पना पोहोचवावी ही विनंती.

स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या , खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या मानसिकतेचा, Powerful “Myndful Mantras” चा आपण या नवरात्रीत जागर करू.

नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!

श्रेया कुलकर्णी
Founder Myndful Mantras
Clinical Psychologist
REBT Practitioner