नववी माळ: देवी सिद्धदात्री
कौशल्य – दातृत्व, निर्मिती, नियोजन
आजची दुर्गा – डॉ. योगिनी देशपांडे
आदिशक्ती हिच खरी सृष्टीची निर्माणकर्ती आहे असे म्हटले जाते. मी स्वयंभू आहे, असे म्हणणाऱ्या देवांना तू कुणाच्या उदरातून जन्म घेतलास? असा सवाल करून निरुत्तर करणारी तीच ही आदीमाया. ब्रह्मांड जेव्हा शून्यावस्थेत होते, तेव्हा ज्या शक्तीने विश्वाची निर्मिती केली ती आदिशक्ती. केवळ नव्या जीवाला जन्म देण्याइतकेच स्त्रीचे कर्तव्य नाही तर या संपूर्ण चराचराच्या निर्मितीमध्येच जणू आदीशक्तीची किमया आहे, असे म्हणायला हरकत नाही. या निर्माणकर्तीचे कौशल्य – निर्मितीचे कौशल्य आपल्यातही आहे असे कर्तृत्वाने सिद्ध करणाऱ्या आपल्या आजच्या नवव्या दुर्गा आहेत डॉ. योगिनी देशपांडे.
शारदीय नवरात्रौत्सवात माईडफुल मंत्राज जागर करीत आहे अशा नऊ महिलांचा ज्यांच्या तिमिरातून तेजाकडे जाण्याच्या प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळते आहे, आणि यापुढे देखील मिळत राहील. आजच्या डिजिटल विश्वात आपण अशा महिलांचा जागर करणार आहोत ज्यांनी खऱ्या अर्थाने देवीच्या गुणांना अंगिभूत केले आहे. अशा महिला ज्यांनी नवदुर्गांचा अंश आमच्यातही आहे असं म्हणत संकटांवर मात केली आहे आणि आज त्या दिमाखात इतरांना संकट काळात लढण्याची प्रेरणा देत आहेत.
डॉ. योगिनी देशपांडे यांचे सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी शिक्षण मुंबई युनिव्हर्सिटीतून पूर्ण झाले. त्यांनी उच्च शिक्षण युएसए येथील Purdue University येथे पूर्ण केले. काही अंशी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात नव्या संकल्पनांसह डॉ. योगिनी देशपांडे यांनी युएसए मधील विविध युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन पत्रिका सादर केल्या. युएसए येथील Purdue University मध्ये डॉ. योगिनी देशपांडे यांना त्यांच्या कामगिरीसाठी सर्वोत्तम शिक्षक आणि सर्वोत्तम संशोधक असे दोन पुरस्कार देऊन सन्मानित देखील करण्यात आले आहे.
सिव्हिल इंजिनिअरिंग विषयावरील ४० संशोधनपत्रिका प्रसिद्ध करत डॉ. योगिनी देशपांडे यांनी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्राशी निगडीत १५० पेक्षाही जास्त व्याख्याने दिली आहेत.
डॉ. योगिनी देशपांडे या सध्या त्यांनी स्थापन केलेल्या रेणुका कन्सल्टंट्सच्या तांत्रिक संचालक आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका, आयआयटी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या संस्थांसोबत रेणुका कन्सल्टंट सहयोगी संस्था म्हणून काम करीत आहे. बांधकाम विभागातील शासकीय अशासकीय प्रकल्पांसंबंधी उच्चस्थरीत समितीमध्ये नेहमीच रेणुका कन्सल्टंट संस्थेचे नाव सर्वप्रथम घेतले जाते.
अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य अश्वारुढ पुतळा उभारण्याच्या कामात स्थापत्य विभागाच्या हेड म्हणून डॉ. योगिनी देशपांडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रेणुका कन्सल्टंटने अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी काम केले आहे, उदा. Mumbai Coastal Road, Mumbai Trans Harbour, Mumbai Metro 3, 2A and Metro 5, Iconic Mandovi Panaji Bridge म्हणजेच Atal Setu, आणि Naval Dockyard.
त्या Honorary Secretary of India Chapter of American Concrete Institute, आणि On Board of Directors of Indian Concrete Institute, Mumbai Chapter आहेत. त्या The Women in Deep Foundation Institute, India Chapter च्या Core Member देखील आहेत.
इंडिका टुडे या संस्थेच्या त्या सहसंस्थापिका आहेत. तसेच २०१५ मध्ये त्यांना अंबुजा सिमेंट या कंपनीतर्फे Contribution to the Construction Industry हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. O P Jindal University येथे त्यांची Civil Engineering विभागाच्या उच्च प्राध्यापिका म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. भारतीय संस्कृती, स्थापत्य क्षेत्राचा अमूल्य ठेवा जपण्यासाठी त्या भारतीय स्थापत्य शास्त्रातील पुरातन वास्तूंचे जतन, संवर्धन करण्याचे महत्त्वाचे काम करतात.
इंडिका टुडे मार्फत त्या आपल्याकडील ज्ञानाचा ठेवा इतरांबरोबर शेअर करतात. भारतीय तत्त्वज्ञान, पुरातन स्थापत्य आणि संवर्धन विषयात अनेक रिसर्च करणाऱ्या 300 हून अधिक Research Scholars आणि तरुण Researchers बरोबर त्या जोडल्या गेल्या आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करतात. देवीचा दातृत्व हा गुणच जणू अंगिकरतात.
आधुनिक भारत घडवताना विविध इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आपल्या आजच्या नवदुर्गा देवी सिद्धदात्री देवीच्या दातृत्व, निर्मिती आणि नियोजन या कौशल्यांचे प्रतिनिधित्व करतात.
देवी सिद्धदात्री श्लोक:
सिद्धगंधर्वयक्षाद्यैरसुरैररमरैरपि।
सेव्यमाना सदा भूयात सिद्धिदा सिद्धिदायिनी।।
रोज ९ दिवस आम्ही एक एक देवी आणि तिचे कौशल्य बरोबर नऊ महिलांचा ज्यांच्या तिमिरातून तेजाकडे जाण्याच्या प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळते आहे, आणि यापुढे देखील मिळत राहील अशा महिला- आधुनिक दुर्गा आपल्यासमोर आणायचा प्रयत्न करणार आहोत.
आपणही जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना या पोस्ट ला Tag करून, ही पोस्ट शेअर करून जास्तीत जास्ती समाजापर्यंत ही कल्पना पोहोचवावी ही विनंती.
स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या, खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या मानसिकतेचा, Powerful “Myndful Mantras” चा आपण या नवरात्रीत जागर करू.
या वर्षीच्या इतर नवदुर्गांविषयी माहिती वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा –
पहिली माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga23Day1
दुसरी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga2023Day2
तिसरी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga23Day3
चौथी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga23Day4
पाचवी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga2023Day5
सहावी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga2023Day6
सातवी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga2023Day7
आठवी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga2023Day8
नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!
श्रेया कुलकर्णी
Founder Myndful Mantras
Clinical Psychologist
REBT Practitioner