सातवी माळ: देवी कालरात्री
कौशल्य – शुभंकारी, बहुगुणी
आजची दुर्गा: अनुराधाताई तांबोळकर

‘भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वैविध्य आहे. तसेच कला, आध्यात्म आणि विज्ञान हा आपल्या भारतीय पाककलेचा पाया आहे. इतकेच नाही तर भारतीय पाककलेमागे वैज्ञानिक सिद्धांत आहे म्हणूच त्याला पाकशास्त्र असे म्हटले जाते. भारतीय पाकशास्त्राचा वारसा एका पिढीकढून दुसऱ्या पिढीकडे जाणे तितकेच महत्त्वाचे असते. तेव्हाच आपली संस्कृती आणि आपली कला कायम राहते आणि वाढते. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती जपत ती पुढच्या पिढीला सुपूर्त करणाऱ्या आपल्या आजच्या सातव्या दुर्गा आहेत अनुराधाताई तांबोळकर.

शारदीय नवरात्रौत्सवात माईडफुल मंत्राज जागर करीत आहे अशा नऊ महिलांचा ज्यांच्या तिमिरातून तेजाकडे जाण्याच्या प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळते आहे, आणि यापुढे देखील मिळत राहील. आजच्या डिजिटल विश्वात आपण अशा महिलांचा जागर करणार आहोत ज्यांनी खऱ्या अर्थाने देवीच्या गुणांना अंगिभूत केले आहे. अशा महिला ज्यांनी नवदुर्गांचा अंश आमच्यातही आहे असं म्हणत संकटांवर मात केली आहे आणि आज त्या दिमाखात इतरांना संकट काळात लढण्याची प्रेरणा देत आहेत.

आजी आजोबांच्या संस्कारात वाढलेल्या अनुराधाताई अत्यंत उत्साही स्वभावाच्या आहेत. कोणतंही काम छोटं नसतं, फक्त कष्टाने ध्येय गाठता आलं पाहिजे अशा विचारांमध्ये त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांच्या आई अत्यंत प्रयोगशील आणि हरहुन्नरी होत्या. स्विमिंग, बॅडमिंटन चे अद्भुत कौशल्य असलेल्या अनुराधाताईंच्या आई समाजसेवेतही भाग घेत असत. हेच संस्कार अनुराधाताईंमध्येही रोवले गेले. म्हणूच तर त्यांना कधी कामाशिवाय स्वस्थ बसणे माहितीच नाही.

नुसत्या रोज दिलेल्या वरणाच्या फोडणीवरून त्यांच्याच घराच्या वरच्या मजल्यावर असणाऱ्या एका ऑफिसमधल्या २५० शास्त्रज्ञांची जेवणाची ऑर्डर अनुराधा ताईंनी मिळवलेली आहे आणि ह्या विषयातच हातखंडा आहे म्हणूनच भारतीय खाद्य संस्कृती समृद्ध करणारी ‘मेजवानी व्हेजवानी’ ‘आणि आज काय मेन्यू’ ही खाद्यपदार्थाच्या रेसीपीची पुस्तके काढली आहेत. ‘मेजवानी व्हेजवानी’ या पुस्तकाचे दोन भाग असून ३००० पेक्षा जास्त व्हेज रेसिपीज त्या पुस्तकात आहेत. यावर्षी त्या पुस्तकाची ५ वी आवृत्ती काढली गेली आहे.

भारतीय पाककलांमध्ये शरीरविज्ञानाचा विचार खोलवर रूजलेला आहे. पचनसंस्थेत असलेल्या मायक्रोन्सपर्यंत पदार्थ पोहोचल्यानंतर त्या पदार्थाच्या चवीला उत्स्फूर्त दाद मिळते असं अनुराधाताई नेहमी म्हणतात. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स सारख्या वृत्तपत्रांमध्ये खाद्यसंस्कृती, पाकशास्त्र, पाककला विषयांवर लेख आणि कविता त्यांनी लिहल्या आहेत. तसेच विष्णू मनोहर आणि त्या सारख्या अनेक Celebrity बरोबर अनुराधा ताईंचे टीव्ही वर शोज झाले आहेत. खूप रेसेपीज त्यांनी दाखवल्या आहेत. संजीव कपूर के किचेन खिलाडी या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला आणि ३५-४०००० महिलांमधील पहिल्या ५० मध्ये अनुराधा ताई होत्या. आणि “मी हे करू शकते हे सागणारा” तो त्यांचा टर्निंग पोइंट होता. त्या नेहमी सांगतात की खाद्यसंस्कृतीचा मागील दोन पिढ्यांचा हा वारसा पुस्तकाच्या रूपाने त्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम मी करीत आहे. पण एवढ्यानेच होणार नाही म्हणून या पिढीला सर्वात सोप्पी वाटणारी गोष्ट म्हणजे Youtube किंवा इंटरनेटवर गोष्टी शोधणे सो तिथे आपण पोहोचायला हवे. म्हणून २०१९ साली अनुराधा तांबोळकर (Anuradha Tambolkar) हे youtube channel सुरु केले.

Youtube channel सुरु झालं खर पण माहित कुठे होत त्यातलं काही, मग अनुराधा ताईंनी त्याचा अभ्यास केला. मग अगदी स्वयंपाकाची भीती का वाटते पासून, नैवेद्य कसा करावा, ते करतांना मनात काय भाव असावा, कुठल्या पदार्थाचे वैशिष्ठ्य काय आणि ते कधी कसे खावे इथपर्यंत सगळ अनुराधा ताई अगदी आजीच्या नात्याने सांगतात. एक कानात गोष्ट सांगू का ह्या आपल्या आजीला mocktails पण बनवता येतात बरंका..

सतत कार्यरत राहिलं पाहिजे याचं बाळकडू लहानपणापासूनच मिळालेलं असल्याने त्यांना थांबलेलं कधीच बघितलं नाहीये. अशा अत्यंत शुभंकारी विचारांच्या आणि बहुगुणी असलेल्या अनुराधाताईं ह्यांना आपल्याला जर काही विचारायचं असेल तर एका कॉल वर उपलब्ध असतात.

कालरात्री देवीच्या शुभंकारी, बहुगुणी या गुणांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या नवदुर्गेला माईंडफुल मंत्राजतर्फे मानाचा मुजरा.

देवी कालरात्री श्लोक :
या देवी सर्वभूतेषु माँ कालरात्रि रूपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ||

रोज ९ दिवस आम्ही एक एक देवी आणि तिचे कौशल्य बरोबर नऊ महिलांचा ज्यांच्या तिमिरातून तेजाकडे जाण्याच्या प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळते आहे, आणि यापुढे देखील मिळत राहील अश्या महिला- आधुनिक दुर्गा आपल्यासमोर आणायचा प्रयत्न करणार आहोत.

आपणही जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना या पोस्ट ला Tag करून, ही पोस्ट शेअर करून जास्तीत जास्ती समाजापर्यंत ही कल्पना पोहोचवावी ही विनंती.

स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या, खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या मानसिकतेचा, Powerful “Myndful Mantras” चा आपण या नवरात्रीत जागर करू.

या वर्षीच्या इतर नवदुर्गांविषयी माहिती वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा –
पहिली माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga23Day1
दुसरी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga2023Day2
तिसरी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga23Day3
चौथी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga23Day4
पाचवी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga2023Day5
सहावी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga2023Day6

नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!

श्रेया कुलकर्णी
Founder Myndful Mantras
Clinical Psychologist
REBT Practitioner