अष्टमी : देवी महागौरी
आजच्या दुर्गा डॉ. जान्हवी केदारे
नवरात्र म्हणजे जागर शक्तीचा, शक्ती उपासनेचा…
चला या नवरात्रीत जाणून घेऊया मन:शक्ती ची उपासना करणाऱ्या, मन:शक्ती चा जागर करणाऱ्या “मानसशास्त्रातील नवदुर्गा”
समाजसेवेची आवड असलेल्या आणि ही आवड स्वतःचा व्यवसाय आणि नोकरीच्या माध्यमातून जपणाऱ्या आजच्या आपल्या नवदुर्गा आहेत. खरंतर बुद्धीमत्तेचा वापर समाजासाठी करणाऱ्या व्यक्ती दुर्लभ असतात. आजच्या आपल्या नवदुर्गा म्हणजे समाजाला नवी दिशा देणाऱ्या आणि सकारात्मक बदल घडवू पाहणाऱ्या मनोविकारतज्ञ आहेत. आपण समाजाला काहीतरी देणे लागतो या भावनेने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या, त्यातही मनोविकार शास्त्र (psychiatry) या विषयाची निवड करणाऱ्या, MD (psycH) आणि DPM या दोन्ही शैक्षणिक कारकीर्दीत ‘Gold Medalists’ असणाऱ्या अतिशय बुद्धिमान आणि एकूणच मनोविकाराच्या ज्ञानाच्या मदतीने लोकांना ट्रीटमेंट देऊन त्याचा प्रचार – प्रसार आणि प्रशिक्षण याच्यात सुवर्णमयी वाटचाल करणाऱ्या आजच्या आपल्या दुर्गा आहेत डॉ जान्हवी केदारे
एम.डी. असलेल्या डॉ. जान्हवी केदारे या १८ वर्ष केईएम रुग्णालयात ज्येष्ठ मनोविकार तज्ञ म्हणून काम पाहत होत्या तर गेल्या ९ वर्षपासून B. Y. L. Nair Hospital, Mumbai इथे अतिरिक्त प्राध्यापक म्हणून काम पाहत आहेत.
Geriatric psychiatry मध्ये १९९७ पासून जान्हवी ताई कार्यरत आहेत. वृद्धांच्या मानसिक आरोग्यासाठी काम करतांना त्यांच्या जागरूकतेसाठी विविध ज्येष्ठ नागरिक संघात जाऊन तिथे भाषण करणं, त्यासंदर्भात संशोधन करून त्यावर संशोधन निबंध प्रसिद्ध करणं अशी उल्लेखनीय कामं त्या सातत्याने करत आहेत. “निरोगी वार्ध्यक्य”, स्मृतीभंश (Dementia) अशा विषयांवर व्याख्याने देतात. आरोग्यदायी जीवनशैली, एकमेकांचे नातेसंबंध , ज्येष्ठांसमवेत सामाजिक संवाद या विषयावर मांडणी करतात. स्मृतीभंश झालेल्या जवळच्या लोकांसाठी (caregivers) चर्चा सत्र आयोजित करतात.
‘वैद्यकीयदृष्ट्या आजारी वृद्ध रूग्णांमधील नैराश्याचा अभ्यास आणि सामना करण्याचा मार्ग म्हणून अध्यात्म’ या विषयावरचा लेख, माहितीच्या स्वरुपात लेखन करुन डॉ. जान्हवी केदारे यांनी समाजातील वृद्ध रुग्णांना जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी दिली आहे.
त्यांना इंडियन असोसिएशन फॉर जेरियाट्रिक मेंटल हेल्थ संस्थेच्या माध्यमातून 2020 च्या वार्षिक परिषदेत “डॉ. शिव गौतम वक्तृत्व पुरस्कार” मिळाला आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी अनुकरणीय कार्यासाठी सावित्रीबाई फुले जेंडर रिसोर्स सेंटर, मुंबई द्वारे 2024 मध्ये त्यांना “सावित्रीबाई फुले गौरव पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले आहे. ‘Incidence of PTSD in Widows Vs Married Women in Earthquake Hit Area’ यासाठी १९९६ साली जान्हवी ताईला “Best paper award” मिळाला होता आणि त्यानंतरही २०१४ , २०१७ आणि २०२३ यावर्षी देखील वेगवेगळ्या ३ पेपर साठी “Best paper award” मिळाला आहे.
डॉ. जान्हवी ह्या T. N. Medical College आणि B. Y. L. Nair Hospital, Mumbai इथल्या POSH committee च्या अध्यक्षा आहेत. Bombay Psychiatric Society ह्या संस्थेच्या २०१८ साली त्या अध्यक्षा (president) होत्या. तसेच Hindu Women’s Welfare Association, Mumbai च्या ट्रस्टी आहेत. Journal of Psychiatry Spectrum च्या जान्हवी ताई Advisor होत्या. यासारख्या 15 हून अधिक हुद्यांवर जान्हवी ताईने जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
विविध संस्थामध्ये जान्हवी ताई सदस्य असल्यामुळे, बऱ्याच मनोविकार तज्ञांबरोबर त्यांचा संवाद चालू असतो. जान्हवी ताईने तब्बल 41 scientific paper publish केलेले आहेत. शाळा आणि कॉलेजेस मध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक ह्यांच्या बरोबर जान्हवी ताई संवाद साधत असतात त्याच बरोबर Guest Speaker, Lecturer, Panelist म्हणून सातत्याने जात असतात आणि मार्गदर्शन करत असतात. मानसिक आरोग्य याच्या प्रचारासाठी मराठी मासिकं, वृत्तपत्र, विविध पुस्तकं ह्यामध्ये ताईंच लेखन चालू असते. डॉ. जान्हवी ह्यांनी २०१५ ते २०१६ या वर्षभराच्या कालावधीत लोकप्रभा मध्ये तर मे 2023 पासून ई – लोकसत्ता मध्ये मानसिक आरोग्य यावर त्या लेखन केले आहे
जान्हवी ताई बद्दल इतक्या कमी शब्दात लिहिणे बोलणे खरच अवघड आहे.
समाजाला नैराश्यातून आणि नकारात्मक विचारांच्या अंधारातून प्रकाशाच्या दिशेने जाण्यासाठी सकारात्मक विचारांची शिदोरी देऊ पाहणाऱ्या डॉ. जान्हवी केदारे मॅडम या खऱ्या अर्थाने महागौरी आहेत. या नवदुर्गेच्या परिश्रमाना नेहमीच अधिक बळ मिळत राहो. डॉ. जान्हवी ह्यांना आणि त्यांच्या कार्याला शतशः नमन..
चला या नवरात्रीत जाणून घेऊया मन:शक्ती ची उपासना करणाऱ्या, मन:शक्ती चा जागर करणाऱ्या “मानसशास्त्रातील नवदुर्गा”
या पोस्टला आणि आमच्या सोशल मीडिया channels ला Like, Follow आणि Subscribe नक्की करा… जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा.
श्रेया कुलकर्णी
Founder Myndful Mantras
Clinical Psychologist
Mindset Trainer