चतुर्थी: देवी कुष्मांडा
आजच्या दुर्गा सौ. संगीता शेंबेकर
नवरात्र म्हणजे जागर शक्तीचा, शक्ती उपासनेचा…

चला या नवरात्रीत जाणून घेऊया मन:शक्ती ची उपासना करणाऱ्या, मन:शक्ती चा जागर करणाऱ्या “मानसशास्त्रातील नवदुर्गा”

आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात मानसिक स्ट्रेस वाढलेत, नातेसंबंधांची ओढाताण वाढली आहे.
अनेकांचा स्वतः वरचा विश्वास कमी होतोय असे जाणवते, स्वतःचा विचारच अनेक जण करत नाहीत…तर काही जण फक्त स्वतःचाच विचार करतात. अश्या गुंता गुंतीच्या आयुष्यातून अनेक मनांना चेतना देत सर्वोतोपरी Heal करण्याचे काम Heal to Deal च्या माध्यमातून करणाऱ्या आजच्या दुर्गा आहेत सौ संगिता शेंबेकर.

सहृदय असणाऱ्या संगिताताई एकमेकांना support करणाऱ्या, आपण चांगले राहू…जग आपोआप चांगले राहील या प्रमाणे विचार करणाऱ्या लोकांना तयार करण्याचे त्यांना एकत्रित गुंफण्याचे अतिशय सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे काम निरंतर करत आहेत.Whatsapp groups, Facebook, Instagram सारख्या सोशल मीडिया मधुन ह्या सकारात्मक मानसिकता पसरवण्याच्या चळवळीचा प्रसार, प्रचार करत आहेत अनेकांना जोडून घेत आहेत आणि त्यांच्या आयुष्यात, परिवारात सकारात्मकता आणत आहेत.

ऑनलाईन मीटिंग, विनामुल्य workshops च्या माध्यमातून त्यांनी अनेकांना संबोधित केले आहे. तिथे त्यांचे हजारो followers आहेत.

त्या रेकी शिक्षिका आहेत. अनेकांना त्यांनी प्रशिक्षण दिले आणि अनेक शिक्षकही तयार केले. त्या Past Life Regration Therapist असून त्याद्वारे अनेकांना दुःखातून, त्रासातून त्यांना बाहेर काढले आहे. आणि हा अनुभव प्रत्यक्षात ज्यांनी घेतला आहे ते बोलतांना ऐकणं म्हणजे एक परवणीच असते.

त्या उत्कृष्ट गायिका आहेत. घरातून आलेला गाण्याचा वारसा त्यांनी अतिशय सुरेखपणे जोपासला आहे. संगीत संयोजन क्षेत्रात “स्वर – आर्टस्” च्या त्या Founder आणि Creative Head आहेत. “सत्व होलिस्टिक” च्या त्या संचालिका आहेत.

चौराहा, चातक,मनस्वी पलछिन,गुंजा यांसारख्या अनेक पुस्तकांचं लेखन संगीता ताईंनी केलेलं आहे.

सर्वांचे चांगले होवो, सकारात्मक वातावरण राहो हा विचार प्रत्यक्ष कृतीतून संदेश आणि शिकवण देणाऱ्या सहृद दुर्गेला मनःपूर्वक नमन!

चला या नवरात्रीत जाणून घेऊया मन:शक्ती ची उपासना करणाऱ्या, मन:शक्ती चा जागर करणाऱ्या “मानसशास्त्रातील नवदुर्गा”

या पोस्ट ला आणि आमच्या सोशल मीडिया channels ला Like, Follow आणि Subscribe नक्की करा… जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा.

श्रेया कुलकर्णी
Founder Myndful Mantras
Clinical Psychologist
Mindset Trainer