पंचमी : देवी स्कंदमाता
आजच्या दुर्गा डॉ. अनघाताई लवळेकर
मानसशास्त्रातील नवदुर्गा
नवरात्र म्हणजे जागर शक्तीचा, शक्ती उपासनेचा…
चला या नवरात्रीत जाणून घेऊया मन:शक्ती ची उपासना करणाऱ्या, मन:शक्ती चा जागर करणाऱ्या “मानसशास्त्रातील नवदुर्गा”
गरज ही शोधाची जननी असते असे म्हणतात…
पण वैयक्तिक नाही तर समाजाची गरज ओळखून शोध घेणे… समाजात त्याचा प्रसार करणे आणि लोकांच्या आयुष्यात चांगले बदल होताना बघून त्यात समाधान मानणे अश्या व्यक्ती आजच्या काळात फार क्वचित आढळतात. आपल्या आजच्या दुर्गा यांना संशोधनातील राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. अनेक मान सन्मान मिळवून, मानसशास्त्र, स्त्री संगठन या विषयात देश विदेश स्तरात अनेक संशोधन निबंध सादर करून भरीव कामगिरी करून उच्च स्तर असताना देखील मी फक्त एक कार्यकर्ती आहे. “माझे काम फक्त 1% एवढेच आहे” असे म्हणणाऱ्या एका आगळ्यावेगळ्या दुर्गेला “सौ अनघाताई लवळेकर” यांना आपण आज भेटणार आहोत. त्या ज्ञानप्रबोधिनी मध्ये मानसशास्त्र विभागाची किंवा प्रज्ञा मानस संशोधिका ह्या संस्थेची “प्रमुख” म्हणून काम बघत आहेत.
लहानपणीच आई – वडिलांकडून समजसेवेचे , समाजोपयोगी संघटनाची आवश्यकता व ते कसे असावे याचे बाळकडू मिळाले होते. माध्यमिक शिक्षण लातूर मध्ये पूर्ण करून नंतर पुण्यात आल्यावर ज्ञानप्रबोधिनी कन्यका प्रशालेमध्ये शिक्षण घ्यायचे ठरवले, ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक, संचालक कै. आप्पा तथा विनायक विश्वनाथ पेंडसे हे त्याच्या आईचे मामा तरी चाचण्या घेऊन शाळेमध्ये प्रवेश मिळाला. त्यानंतर S. p. College मध्ये कला शाखेला प्रवेश घेतला. त्यानंतर मानसशास्त्राची संथा मिळाली ती आजतागायत चालू आहे. अनाघाताईंनी शिक्षणाच्या पहिल्या वर्षी , कॉलेजमधून पदवी शिक्षण घेत असतानाच ज्ञानप्रबोधिनीचे युवती विभागाचे काम एकीकडे चालू केले होते. त्यामुळे- ‘संघटन म्हणजे काय? संघटनाचे मानसशास्त्र म्हणजे ? स्त्रियांच्या संघटनाचे काम करावयाचे तर त्यात काय काय अडचणी येऊ शकतात?’ ह्यासोबतच ज्ञानप्रबोधिनीचे एकूण तत्वज्ञान आणि त्याची प्रत्यक्ष व्यवहारातली मांडणी अशा अनेक गोष्टींचा जवळून परिचय होत गेला आणि त्यातून संघटक मानसशास्त्रज्ञाची मुळे भक्कम झाली.
ज्ञान प्रबोधिनी मध्ये स्त्रीशक्ती प्रबोधन या दिशेनी काम करण्यासाठी संवादिनी हा गट २००० साली सुरू केला. तसेच ‘कीर्तनातून महिलांचे संघटन’ असं काम करताना ग्रामीण महिलांच्या प्रश्नांची जवळून ओळख झाली आणि आपण किती सुरक्षित किंवा उत्तम आयुष्य जगत असतो याचं भान त्यांना आलं आणि तसच आयुष्य इतरांनाही मिळावं म्हणून आपण काहीतरी धडपड केली पाहिजे हे त्यांच्या मनामध्ये पूर्णपणे ठसलं. ‘स्त्री-विधा’ च्या माध्यमातून प्रबोधिनीतील अनेक उपक्रमांच्या अभ्यासांचे एक संकलन करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे.
‘माणसाचे नातेसंबंध’ हा अनघाताईंचा अत्यंत आवडीचा विषय तसेच ‘आपल्या भावनांचं व्यवस्थापन आणि त्याला लागणारी विवेकाची जोड’ हा देखील जवळचा विषय त्यामुळे समाधान म्हणजे काय? माणसाची समाधानाची व्याख्या काय असते? कुटुंबाचं आणि समाधानाचं नातं काय आहे? एकूणच नातेसंबंध आणि माणसाच्या जीवनाचे गुणवत्ता या मधला परस्पर संबंध काय आहे? स्त्रीच्या मानसिकतेला काही वेगळे आयाम आहेत का? वेगवेगळ्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिकता असतात का? त्यांचे प्रश्न काही वेगळे असतात का? भावनिक बुद्धिमत्ता या सगळ्यांमध्ये कुठे बसते? असे अनेक विषयांना हाथ घालत मुख्यतः कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्य , स्त्रियांचे नातेसंबंध, त्यांची मानसिकता ह्या पैलूंचा जास्त अभ्यास केला.
स्त्रियां, किशोरवयीन मुल मुली यांच्यासमवेत देखील प्रचंड काम केले आहे. “उमलत्या वयाशी जुळवून घेताना’, वाढत्या वयात ‘बदलत जाणार्या सौंदर्याच्या कल्पना’ पासून ते ‘मैत्री- प्रसारमाध्यमे- व्यसने आणि उद्दिष्ट निश्चिती’ पर्यंत अनेक अंगांनी या विषयची मांडणी करण्याचा प्रयत्न केला. संवादिनी सदस्यांच्या या सामूहिक आणि अत्यंत निष्ठापूर्वक केलेल्या कामातून आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरच्या सुमारे दीड लाख किशोरवयीन मुला-मुलींन पर्यंत पोहोचून हजारो पालकांपर्यंत हा विषय पोहोचवण्याच महत्वाच काम अनघा लवळेकर ह्यांनी केल. आणि असा विषय शिकवू शकणारे शेकडो प्रशिक्षकही घडवले.
गेल्या पंचवीस वर्षांमध्ये ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून अनेक विषयांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनघा ताई घेऊन गेल्या आहेत. त्या म्हणतात “औपचारिक दृष्ट्या ज्ञानप्रबोधिनी मध्ये मानसशास्त्र विभागाची किंवा प्रज्ञा मानस संशोधिका ह्या संस्थेची प्रमुख म्हणून काम मी पहात असले तरीसुद्धा मुळात मी ज्ञानप्रबोधिनीची एक साधी कार्यकर्ती आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. जे काही व्यावसायिक यश मिळवू शकले त्या सगळ्यामध्ये ज्ञानप्रबोधिनी मधील ज्येष्ठांचा कायम असलेला आशीर्वाद, मार्गदर्शन, सहकाऱ्यांचा विश्वास आणि त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या संधी याचा वाटा सगळ्यात जास्त आहे, हेही मला माहीत आहे. त्यामुळेच माझ्या परीने मानसशास्त्राच्या क्षेत्रात मी किंचित का होईना योगदान करू शकले.
‘विवेकनिष्ठ विचार पद्धती’ ह्या मानसशास्त्रातल्या या ‘जादूई किल्ली’ने त्या पंधरा वर्षे जगण्यामध्ये पडलेल्या अनेक प्रश्नांच्या कुलपांना उघडण्याचा प्रयत्न करत आले.
‘वाचन हा माझा ध्यास आणि लेखन हा माझा छंद’ असं म्हनाण्यार्या अनाघाताईंची “ मनाच्या आरोग्यवाटा, रंग नात्याचे, स्त्री मनाचा कानोसा, आजचे पसायदान, अशी बरीच सुंदर पुस्तके प्रसिद्ध आहेत एवढाच नाही तर मानसशास्त्र या विषयाशी निगडीत ३० प्रोग्रम रेडिओवर झाले. तर टीव्ही वर बिनभिंतीचे घर या सेरीअल साठी psychology expert म्हणून बोलावलं होत.
अनघाताईंनी मानसशास्त्रीय कसोट्या (Psychometric Tests) तयार केल्या. काही ठळक सांगायच्या झाल्या तर Exploring Emotional Abilities, Marital Satisfaction Scale, Satisfaction Profile, Battery of Sexuality measures, Quality of Life Scales इत्यादी , हे खूप मोलाचे योगदान आहे.
Sexuality education and gender sensitization, Prevention of Child Sexual Abuse, REBT based Counseling, Quest for Happiness. Enhancing relationships for positive mental health या आणि अश्या विविध विषयावर अनघाताई ट्रेनिंग घेतात
अनघा ताईंना “पुष्पलता रानडे महिला संशोधन हा राष्ट्रीय पुरस्कार,” National award for women in research मिळाला असून , ढवळे अवॉर्ड , कोथुरकर अवॉर्ड बेस्ट टीचर अवॉर्ड असे अनेक मान सन्मान मिळाले आहे.
सगळ्यात जास्त महत्वाचे काय असे विचारले असता अनघाताई म्हणतात “आपण एक माणूस म्हणून चांगले घडत आहोत आणि इतरांना त्यांच्यातलं ‘माणूसपण’ जपायला मदत करू शकत आहोत हाच सगळ्यात मोठा आनंद आणि समाधानाचा भाग आहे”. त्यांच्याशी बोलताना, त्याचे लिखाण वाचताना त्यांचे जमिनीशी असलेले घट्ट नाते, इतरांना सर्वात प्रथम माणूस म्हणून बघणे, आणि कमालीचा निस्वार्थीपणा हा जाणवतो.
मानसशास्त्र तसेच सामजिक कामातील योगदानाविषयी बोलतांना त्या म्हणतात ‘ “हे मला माहीत आहे की माझ्या चोचीतल्या एवढ्याश्या पाण्यानी आग विझंणार नाही, संपूर्णपणे नष्ट होणार नाही. पण मला एवढेच समाधान राहील की – मी बघ्याची भूमिका घेतली नाही किंवा मी पाठ दाखवून लांब गेले नाही”.. असे उद्दात विचार असण्यार्या आणि कुठलाही अभिनिवेश न बालागाण्यार्या आजच्या कर्तुत्ववान आणि विनयशील दुर्गेला त्रिवार वंदन…
चला या नवरात्रीत जाणून घेऊया मन:शक्ती ची उपासना करणाऱ्या, मन:शक्ती चा जागर करणाऱ्या “मानसशास्त्रातील नवदुर्गा”
या पोस्ट ला आणि आमच्या सोशल मीडिया channels ला Like, Follow आणि Subscribe नक्की करा… जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा.
श्रेया कुलकर्णी
Founder Myndful Mantras
Clinical Psychologist
Mindset Trainer