षष्ठी : देवी कात्यायनी
आजच्या दुर्गा डॉ. शुभांगी पारकर
नवरात्र म्हणजे जागर शक्तीचा, शक्ती उपासनेचा…
चला या नवरात्रीत जाणून घेऊया मन:शक्ती ची उपासना करणाऱ्या, मन:शक्ती चा जागर करणाऱ्या “मानसशास्त्रातील नवदुर्गा”
अधिकार असणे आणि त्याचा योग्य वापर करणे, किंबहुना तो अधिकार, पद यापेक्षा ती एक जबाबदारी आहे असे मानून ती निभावणे – त्याला योग्य तो न्याय देणे आणि ती Organisation वाढवणे याच्यात खरी Leadership दिसते.
Seth GS Medical college & K. E. M. Hospital सारख्या नामांकित संस्थेत Dean पदावर काही वर्षे कार्यरत असणाऱ्या आणि नंतर सुद्धा अनेक Organisation च्या जडणघडणीत मोलाच वाटा असणारी आजची दुर्गा, डॉ शुभांगी पारकर यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया…
डॉ. शुभांगी रघुनाथ पारकर ह्यांची दैदिप्यमान अशी शैक्षणिक आणि व्यावसायिक गुणवत्ता आहे.एक प्रतिष्ठित मानसोपचार तज्ज्ञ असुन त्या अधिष्ठाता म्हणजेच डिन ऑफ वेदान्त इन्स्टिट्यूट ऑफ सायकॅस्ट्रिस्ट आहेत. DPM,MD,MSc, PhD international, PGDHR(human rights) असे त्यांचे educational qualification असून त्या जी. एस् मेडिकल कॉलेज च्या निवृत्त अधिष्ठाता आहे. मानसोपचार विभागाच्या प्रमुख , प्राध्यापक तसेच ड्रग ऍडिक्शन सेंटर ऑफ एक्सलन्सच्या प्रमुख.
डॉ. पारकर यांनी संशोधनात भरीव योगदान दिले आहे, विशेषत: आत्महत्येचे सामाजिक-सांस्कृतिक विश्लेषण आणि असुरक्षित लोकसंख्येवर व्यसनाचा प्रभाव. त्यांनी असंख्य पुरस्कार-विजेते पेपर प्रकाशित केले आहेत आणि त्यांचा राष्ट्रीय आरोग्य धोरणांच्या निर्मितीसाठी/ विकासासाठी एक मोलाचा वाटा आहे. “क्लिनिकल स्टिग्मा” आणि “सामाजिक-सांस्कृतिक पृथक्करण” या अभ्यासातील त्यांचे कार्य भारतीय सांस्कृतिक संदर्भातील आत्महत्या समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे.
शुभांगी ताई या के ई एम मध्ये ड्रग डी – ऍडीक्शन सेंटरच्या अध्यक्षा असल्याकारणाने त्यांनी मेंटल हेल्थ आणि ऍडीक्शन ट्रीटमेंट यामध्ये कमालीची कामगिरी ही केली आहे.
शुभांगी मॅडम यांनी आत्महत्येबद्दलचा पहिल्या जागतिक मेंटल हेल्थ रिपोर्ट मध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे. हा रिपोर्ट हार्डवर्ड युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क यांनी संपादित केला होता तर ऑक्साईड युनिव्हर्सिटी यांनी पब्लिश केला होता.
डॉ. पारकर ह्या वैद्यकीय शिक्षण आणि प्रशासन यातील मानाचे नाव आहेत. त्यातील नियोजन, अंमलबजावणी आणि प्रगतीमध्ये देखील त्यांचे मोलाचे योगदान आहे. स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर मानसिक आरोग्य धोरणे आणि व्यसनमुक्ती धोरणे त्यांनी यशस्वीरीत्या राबवली आहेत. मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य सरकार आणि भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय द्वारा त्यांची तज्ञ म्हणून मदत घेतली गेली आहे
मुंबईत 1993 च्या जातीय दंगली, 2006 चा बॉम्ब ब्लास्ट, 2007 चा पूर अशा बिकट प्रसंगांमध्ये शुभांगी मॅडम ने डिझास्टर मॅनेजमेंट प्रोग्राम भरीव योगदान देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
नवनवीन असे शैक्षणिक पॅटर्न त्यांनी विद्यार्थ्यांसाठी साठी शोधून काढले.
वेगवेगळ्या पेशंटच्या कंप्लेंट्स, ह्यूमन राइट्स पॉलिसी रिलेटेड इश्युज हे सॉल्व करण्यासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नॅशनल एअर कंट्रोल ऑर्गनायझेशन आणि यासारखे अनेक ऑर्गनायझेशन शुभांगी मॅडमना एक्सपर्ट कन्सल्टंट म्हणून बोलवतात.
शुभांगी मॅडम या एम्स, निम्हांस यासारख्या प्रथित यश संस्थेमध्ये पीएचडी चे एक्झामिनार म्हणून पण संलग्न आहेत. त्याचबरोबर मेंबर बोर्ड ऑफ स्टडीज आणि मेंबर ऑफ रिसर्च कमिटी, एसएनडीटी यूनिवर्सिटी मध्ये देखील त्या आहेत.
शुभांगी मॅडम या DPM & MD यूनिवर्सिटी मधे रैंक होल्डर आहेत.
त्यांच्या संशोधनासाठी त्यांना डॉ. बी.सी. मारफतिया राष्ट्रीय पुरस्कार ३ वेळा आणि
डॉ ए. व्ही.शाह हा झोनल पुरस्कार ५ वेळा मिळालेला आहे.
डॉ शुभांगी पारकर या बाॅम्बे सायकॅस्ट्रिक सोसायटी (वेस्टर्न झोन)च्या माजी अध्यक्ष आहेत.
त्यांच्या या विषयातील अमुल्य योगदानाबद्दल त्यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार, नवशक्ती सन्मान सोहळा पुरस्कार,पुण्यनगरी asha पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्याबरोबरच सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार, सकाळ वूमन इम्पॅक्ट पुरस्कार, एकच स्त्री सन्मान पुरस्कार, सुवर्णकन्या पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे.
त्यांनी स्वतः दोन मेंटल हेल्थ अँड रोल ऑफ एज्युकेशन या नॅशनल कॉन्फरन्सेस भरवल्या होत्या.
त्यांनी विविध ठिकाणी विविध सेंटर मध्ये विविध प्रकारचे 600 हून अधिक लेक्चर्स कंडक्ट केलेले आहेत.
KEMH च्या डी एडिक्शन सेंटर ऑफ एक्सलन्स याच्या त्या 1996 पासून अध्यक्ष होत्या. या सेंटरचं काम कशा पद्धतीने उत्कृष्टपणे होईल याच्यावर त्यांचा कटाक्ष होता.
डी अडिक्शन सेंटर मुंबई मध्ये तर होतेच पण मुंबई बाहेर गोवा गुजरात चेन्नई तेलंगणा आणि एमपी इथे सुद्धा त्यांनी एक्सपांड केले होते.
डॉक्टर पारकर यांनी भारताच्या पहिल्या महिलांसाठीच्या डी एडिक्शन वॉर्ड ची स्थापना केली त्याचबरोबर मेमरी क्लिनिक याची स्थापना केली तसेच सायको एज्युकेशनल प्रोग्रॅम, डिमेन्शिया क्लिनिक, ड्रग डी अडिक्शन सेंटर, सुसाईड काउन्सलिंग क्लिनिक, 24 तासाची मेंटल हेल्थ हेल्पलाइन, ड्रग ट्रीटमेंट सेंटर, योगा ओपीडी कैवल्यधाम, अशा वेगवेगळया आयमाना पण जन्म दिला.
डॉक्टर पारकर या सिद्धहस्त लेखिका देखील आहेत यांनी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण देखील केले आहे. अनेक प्रथितयश वृत्तपत्रांमध्ये म्हणजे पुण्यनगरी, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, नवशक्ती ई मध्ये एक दशकाहून अधिक काळ लिखाण करत आहेत.
आकाशवाणी आणि ऑल इंडिया रेडियो इथे देखील त्यांनी त्यांचा ठसा उमटवला आहे. कॉलेजमध्ये देखील त्यांना ड्रामा आणि कल्चरल प्रोग्राम्स करायला आवडत असे. डॉक्टर शुभांगी यांना पाळीव प्राण्यांबरोबर वेळ घालवायला आवडतो. आजकाल तर गोशाळेत जाऊन तिथे वेळ घालवणं, तिथल्या गाई आणि बैलांबरोबर वेळ घालवणं हे त्यांच्यासाठी समाधानकारक आणि रेफ्रेशिंग मोमेंट्स असतात असं त्या म्हणतात.
डॉक्टर शुभांगी या भगवद्गीता, त्याच्यानंतर बुद्ध फिलोसॉफी यांना फॉलो करतात.
त्यांना मुलांबरोबर, स्टुडंट्स बरोबर काम करायला प्रचंड आवडतं. हाडाची शिक्षिका कधीच रिटायर होत नाही असं म्हणतात.. आणि त्यांचे सगळे विद्यार्थी त्यांना खूप मानतात.
मानसिक आरोग्य, वैद्यकीय शास्त्रामध्ये त्यांचे असामान्य कौशल्य व ज्ञान आणि अमोघ वक्तृत्व, उत्कट मांडणीने त्यांना एक लोकप्रिय वक्ता बनल्या आहे. Dr. parkar सतत त्यांच्या अनुभवाने आणि सखोल ज्ञानाने श्रोत्यांना प्रेरणा देत असतात.
डॉ. पारकर ह्यांचे नेतृत्व आणि दृष्टीकोनाचा शैक्षणिक आणि सामाजिक अशा दोन्हींवर प्रभावी परिणाम झाला आहे. त्यामुळेच डॉक्टर शुभांगी यांचे नाव भारतात मानसोपचार आणि वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत मानाने घेतले जाते.
अश्या या मानसोपचार, वैद्यकीय शिक्षण याच्यात प्रभुत्व असलेल्या आणि त्याच्या प्रचार, प्रसार करण्याचे काम सेवाव्रती सारखे करणाऱ्या दुर्गेला आदरपूर्वक नमन. त्यांच्या कर्तुत्वाला सलाम.
चला या नवरात्रीत जाणून घेऊया मन:शक्ती ची उपासना करणाऱ्या, मन:शक्ती चा जागर करणाऱ्या “मानसशास्त्रातील नवदुर्गा”
या पोस्ट ला आणि आमच्या सोशल मीडिया channels ला Like, Follow आणि Subscribe नक्की करा… जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा.
श्रेया कुलकर्णी
Founder Myndful Mantras
Clinical Psychologist
Mindset Trainer