देवी – कात्यायनी
कौशल्य – प्रतिकार-असुर विनाशनी
देवी कात्यायनी ही महिषासूर मर्दिनी म्हणून प्रसिद्ध आहे. महिषासूर नामक असुरचा देवींनी वध केला.
आपल्या समाजात अनेक अश्या महिला आहेत ज्यांनी समाजातील अनेक अपप्रवृत्तीच्या विरोधात जाऊन, प्रसंगी त्यांचा नाश, नायनाट केला आहे, करत आहेत.
अनेक जणी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून, कधी वैयक्तिक Capacity मध्ये अनेकविध असामाजिक तत्वांना, व्यक्तींचा महिषारसुर मर्दिनी सारख्या सामोरे जातात, प्रसंगी त्यांचे मर्दन करतात.
महिला लाचार नाहीत तर त्या प्रसंगी दुर्गेचे महिषासूर मर्दिनी चे रूप देखील घेऊ शकतात हे अनेक जणींनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.
प्रशासकीय सेवांमध्ये असणाऱ्या महिला जसे IPS, IFS, सैन्यदलातील महिला, मेरी कोम सारख्या, नुकतेच KBC karmavir मध्ये आलेल्या यादव जी या अश्या अनेक कात्यायनी, महिषासूर मर्दिनी चे स्वरूप आहेत असे मला वाटते. मागेच news वर दाखवले होते की 2 महाविद्यालयीन विद्यार्थिनींना छेडायला आलेल्या मुलांना त्या सामान्य अश्या मुलींनी अक्षरशः सगळ्यांसमोर बदडले.. या आधुनिक काळातील महिषासूर मर्दिनी वाटतात..
अश्या सर्व शक्तींना माझे वंदन!
या शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त Myndful Mantras घेऊन येत आहे ९ देवता ९ कौशल्य (9 Goddess 9Skillset)
प्रत्येक देवी हि कुठल्या ना कुठल्या कौशल्या बरोबर संलग्न आहे..त्याप्रमाणे प्रत्येक स्त्री देखील कुठल्या न कुठल्या देवीचे रूपच असते. त्याला अनुरूप रोज या नवरात्रोत्सवात आपण देवीच्या, आताच्या युगातील स्त्रीच्या एक एक मानसिकतेबद्दल चर्चा करूया..
स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या , खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या या मानसिकतेचा 9 Powerful “Myndful Mantras” चा आपण जागर करू.
नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!