नमस्कार ,
आपण नेहेमी कुठले ना कुठले दिवस celebrete करत असतो, जसं Mother’s Day किंवा Father’s Day, Womens’ Day, आणि त्या त्या दिवसाबाद्दलच त्याचं महत्व जाणून घेऊन त्याची माहिती घेत असतो. अगदी ह्याच पद्धतीने Mental Health Aweraness साठी प्रत्येक महिन्यात देखील वेगवेगळे दिवस वेगवेगळ्या cause साठी ठरवलेले आहेत. जसं १० सप्टेंबर हा दिवस “National Suicidal Prevention Day” म्हणून ओळखला जातो तर, २१ सप्टेंबर हा दिवस “World Alzheimer’s Day” म्हणून ओळखला जातो, असे दिवस लक्षात ठेऊन त्या बद्दल माहिती देणे किंवा Mental Health या विषयाची भिती किंवा त्याबद्दलचा stigma दूर करणं हे Myndful Mantrasच मुख्य उद्दिष्ट असून त्याबद्दल awerness create करण्याचा माझा प्रयत्न असतो.
आज मी अश्याच एका दुर्लक्षित झालेल्या आजाराबद्दल बोलणार आहे, ते म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन. डिलिव्हरी नंतर येण्याऱ्या डिप्रेशन ला “पोस्टपार्टम डिप्रेशन” म्हणतात. ह्यात पोस्टपार्टम ब्लूज आणि पोस्टपार्टम डिप्रेशन हे मुख्यतः अढळून येतात.
पोस्टपार्टम ब्लूजमध्ये, बाळ झाल्यानंतर ह्या नव्या आईला एक ना अनेक adjustments ला समोर जावं लागतं. या changes बरोबर डील करतांना तिला अचानक दुःखी वाटायला लागत, बाळ का रडतंय? आता मी काय करू? मला नीट जमतंय ना ? असे सतत प्रश्न पडत असतात. तिला बाळ झालंय याचा आनंदच ती उपभोगू शकत नाही. कोणी काही बोललं किंवा घरात काही घटना घडली तर तिला पटकन रडू येत किंवा खूप छोट्या छोट्या गोष्टींवर तिला खुप रडावसं वाटतं. असे काही symptoms Postpartum Blues मध्ये बघायला मिळतात. ह्या वरचा उपाय म्हणजे घरातल्यांचा योग्य support आणि लक्ष असेल तर दोन ते तीन आठवड्यांपेक्षा कमी काळामध्ये पोस्टमार्टम ब्लू हे बरे होऊ शकतात.
दोन ते तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ आधी मी सांगितलेले symptoms आपल्याला दिसत असतील आणि त्या मध्ये अजून काही symptoms add होत असतील जसे झोप न लागणे किंवा सतत बाळा बद्दल विचार येणे जसे बाळ आपल्या अंगाखाली येईल का? बाळ पलंगावरून पडणार तर नाही ना? अशा प्रकारची अनामिक भीती आईला वाटत असेल, मी चांगली आई होऊ शकते का? मी माझ्या बाळाची चांगली काळजी घेते का? मी बाळाला नीट फीडिंग करतीये का? हे योग्य पद्धत आहे? या सारखे अनेक प्रश्न सतत पडत असतील, तर तुम्ही prevention साठी आपल्या counsellor शी मदत घेण गरजेच आहे. Prevention का? जसं सध्या परीस्थित आपण करोना होऊ नये म्हणून मास्क वापरतोय किवां sanitizer चा वापर करतोय तसच या सारख्या काही मानसिक आजारांसाठी आपल्या counsellor शी बोलून ह्या प्रोब्लेमशी कसे योग्य प्रकारे डील करू शकतो हे जाणून घेणे गरजेचे असते. बऱ्याच वेळेस नवीनच झालेल्या बाबांना देखील बरेच प्रश्न पडतात, किवां parentingचा नकळत ताण येऊ शकतो अशा वेळेस आपण counsellor ची मदत घेतल्यास हा प्रवास सहज शक्य होतो.
Pregnancy ते Delivery या काळात होणारे हार्मोनल चेंजेस, नंतर येणारा शाररीक थकवा तसेच सामाजिक आणि कौटुंबिक अपेक्षेतून डोकावणारा मानसिक ताण, सतत होणारे मूड चेंजेस ह्याचा सतत वेगळा अनुभव नवीन आई वडील घेत असतात. स्त्री शरीरात होणारे Harmonal changes बरोबरच वर्किंग मदर्स, busy लाइफस्टाइल, nightshifts, न्यूक्लिअर फॅमिली, लादलेली किवां नको असलेली pregancy, Stressed Enviornment या सारख्या गोष्टी देखील पोस्टपार्टम डिप्रेशन ला कारणीभूत असू शकतात. बर्याच वेळेस फेमिलीला PPD लक्षात येत नाही, आणि मग मोठ्याकडून असे प्रश्न येतात की ही अशी का वागते आहे? हिला थोडं Adjust नाही का करता येत, होईल आपोआपच ठीक असं बोललं जात, म्हणूनच याकडे वेळीच लक्ष द्या, आपल्या आजूबाजूच्या लोकांना, मैत्रिणींना आणि मित्रांना सुद्धा याबद्दल awear करा , educate करा. counsellor कडे घेऊन जा. आणि आयुष्यातली हि सुंदर फेज मनापासून एन्जोय करा. माझी पोस्ट शेअर करा. आणि Myndful mantras ला तुमच्या आवडत्या social media platform वर Subscribe करा.
Thank You