काय मंडळी कसे आहात? Lockdown enjoy करताय ना ?? का संपण्याची वाट बघताय ?? कुठे गुंतवलाय वेळ ?? काय काय केलं मागच्या २१-२२ दिवसात ? टाळ्या वाजवल्या असतील , दिवे लावले असतील..नवीन पदार्थ try केले असतील..चला तर हि positivity घेऊन जरा डोकावूं आपल्या सुप्त मनात..
काय आहे हे सुप्त मन. तर ती एक शक्ती आहे.
अस म्हणतात सुप्त मनाची ( Subconscious Mind ) ताकद हि जागृत मनाच्या( Conscious Mind) तकदिपेक्षा दशलक्ष पटीने जास्त असते. आपल्या शरीरातील आंतरिक क्रियांवर किंवा रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या विचारांवर या सुप्त मनाचा खूप प्रभाव पडत असतो. आपण आधी बघितलेली आणि वेळ नाही म्हणून बाजूला सारून ठेवलेली स्वप्नही याच मनात दबा धरून बसलेली असतात. बऱ्याच सवयी आपण अंगिकरायचा प्रयत्न करतो पण काही सवयी या लागता लागत नाही, तर काही सवयी सुटता सुटत नाही त्याचं मूळ ह्या सुप्त मनात दडलेल असतं. चला तर मग अशा सवयी अशी स्वप्नं शोधून काढू..आपल्या सुप्त मनातून काहीतरी नवीन , काहीतरी जपलेलं , जपायच राहिलेलं नक्की सापडेल..इतर facebook challenge सारखं हे पण स्वतःला दिलेलं एक challenge..चला तर मग उचला कागद पेन किवा काढा mobile. विचारा तुमच्या सुप्त मनाला आणि कोणाला शेअर करू नका… कोणाला tag करू नका… स्वतःच्या सुप्त मनालाच tag करा… आणि मला कमेंट मध्ये/पोस्ट च्या खाली 👍 दाखवा, done म्हणा… शक्य झाल्यास काहीतरी response द्या. इथे पोस्ट नाही केली आणि personal ला पाठविले तरी चालेल. तुमच्या उत्तराच्या प्रतिक्षेत.. लिहून काढा, वाट बघतेय… आज, उद्या , परवा कधीही…
श्रेया कुलकर्णी जोशी