नमस्कार मंडळी , मी लिहिलेल्या सुप्त मन आणि जागृत मन या पोस्टवर मला personal वर भरघोस प्रतिसाद दिल्या बद्दल मी सगळयांचे मनापासून आभार मानते. जेव्हा मला सुप्त इच्छांची लिस्ट येत होत्या त्याच बरोबर काही प्रश्नही विचारले गेले जसे, काय लिहायचं आहे ह्या मध्ये ? माझी लिस्ट मोठी आहे चालेल का ? लिस्ट झाली आता काय ? असे एक ना अनेक.

चला तर आता बघूया काय करायचं ते. आता आपल्याला आपल्या सुप्त मनातल्या म्हणजेच लिस्ट मध्ये लिहिलेले आपले स्वप्न, इच्छा हे प्रयत्नपूर्वक जागृत मनात आणायचे आहेत. उदारणार्थ मला रोज व्यायाम करायचाय. मग आता आपण जशी शरीराला एखादी सवय लावतो ना तशी आता मनाला सवय लावायचीए.  मग आपल्या मनाला रोज सांगयचं कि मला रोज व्यायाम करायचाय. सुरवातीला आपण व्यायाम करू मग कदाचित कंटाळा करू पण तरी सुद्धा रोज मनाला प्रेमाने , अंजारून गोंजारून न कंटाळता conviction ने सांगायचं कि मला रोज व्यायाम करायचाय. हे कधी आणि किती दिवस करायचं ? जितक्या सहजतेने उठल्यावर आपण दात घासतो तितक्या सहजतेने न विसरता आणि कारण न देता व्यायाम करू तितके दिवस मनाला सूचना द्यायच्या कि मला रोज व्यायाम करायचाय. लक्षात असू द्या मनाला सवय लावतांना प्रयत्नांमध्ये सातत्य असाव लागतं, कारण आपल मन हट्टी असतं.

बऱ्याच वेळेला अशी तक्रार येते कि मी रोज मनाशीबोलतेय, सूचना देतीये पण काही फरकच पडत नाहीये. खोलात गेल्यावर कळत सूचनांमध्ये नकारात्मक शब्दांचा वापर जास्त होतोय. जस कि “मी जर लवकर झोपले नाही ना, तर मला उद्या व्यायाम करता येणार नाही”. असे म्हणण्या पेक्षा “मी लवकर झोपले, तर मला उद्या व्यायाम करता येईल”. अशा सकारात्मक सूचना दिल्या तर नक्कीच फरक पडतो .आणि लक्षात असू द्या एखादी गोष्ट मनाने पक्की ठरवली कि ति व्हायला वेळ लागत नाही.

चला तर मग लिहिलेली list काढा , परत वाचा. त्यातील १ गोष्ट करायचा प्लॅन करा त्याप्रमाणे मनाला सकारात्मक सूचना द्यायला सुरुवात करा. आणि काय होतंय ते तुम्ही मला कळवालच त्यामुळे मी वाट  बघतीये comment section मध्ये तुमच्या 👍  आणि तुमच्या प्रतिक्रियेची.           

धन्यवाद

श्रेया कुलकर्णी जोशी