दुसरी माळ – द्वितीया
देवी – ब्रह्मचारिणी
कौशल्य – संयम, तपश्चर्या, अविचलता
आपण म्हणतो ना की स्त्री ने ठरवली एखादी गोष्ट की ती पूर्णत्वास नेतेच.
अनेक कौशल्य तिला स्त्रीत्वा बरोबरच उपजतच मिळालेली असतात. त्यात संयम आणि तपश्चर्या ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने दिसून येतात.
महिला घर असो वा व्यवसाय, आपले काम नित्यनेमाने करत असतात त्या बाबत त्या काही तक्रार देखील करत नाहीत. कि रोज रोज मला हेच काम करायला लागते. मग त्या कोणत्याही भूमिकेत असोत आईच्या, सहचरिणीच्या, मुलीच्या किंवा बहिणीच्या अगदी बॉस च्या सुद्धा, अविचलपणे मार्गक्रमणा करत असतात.
पण अनेकदा या सगळ्या दैनंदिन जबाबदऱ्यांमध्ये ती स्वत्व विसरून जाते, “मी” म्हणून असणाऱ्या तिच्या आशा आकांक्षा, स्वतःची अशी स्वप्ने, स्वतःचे असे आकाश ती विसरून जाते. ब्रह्मचारिणी देवी चे स्मरण करताना प्रत्येक स्त्री ने व्यावसायिक, कौटुंबिक जबाबदाऱ्यांबरोबरच स्वतःकडे देखील लक्ष दिले पाहिजे. स्वतःसाठी सुद्धा थोडे जगले पाहिजे त्यात सुद्धा रमले पाहिजे.
त्यामुळे तिच्या मानसिक सुखात – समाधानात आणखीन वाढ होईल. प्रत्येक स्त्रीने स्वत्वाकडे, स्वानुभूती कडे देखील तितकेच लक्ष द्यायला पाहिजे, महत्व द्यायला पाहिजे.
या शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त Myndful Mantras घेऊन येत आहे ९ देवता ९ कौशल्य (9 Goddess 9Skillset)
प्रत्येक देवी हि कुठल्या ना कुठल्या कौशल्या बरोबर संलग्न आहे..त्याप्रमाणे प्रत्येक स्त्री देखील कुठल्या न कुठल्या देवीचे रूपच असते. त्याला अनुरूप रोज या नवरात्रोत्सवात आपण देवीच्या, आताच्या युगातील स्त्रीच्या एक एक मानसिकतेबद्दल चर्चा करूया..
स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या , खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या या मानसिकतेचा 9 Powerful “Myndful Mantras” चा आपण जागर करू.
नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!