चौथी माळ – चतुर्थी
देवी – कुष्मांडा
कौशल्य – सर्जनशीलता

देवी कुष्मांडा ने स्वतःच्या सुहास्याने – स्मित हास्याने या सृष्टीची निर्मिती केली अशी मान्यता आहे. ती निर्मिती करतांना सृष्टीतील सर्व अंगांचा , सर्व घटकांचा यथायोग्य विचार झाला आहे. सर्व घटकांसाठी समान प्रयोजन केले. देवी कुष्मांडाला स्मरताना भारतीय स्त्री ची जाणीव प्रकर्षाने होते.


स्वतःच्या संसाराची घडी बसवताना – एक प्रकारे निर्मितीच करताना ती हसतमुखाने प्रत्येक गोष्ट Plan करते. घराची घडी नीट बसवताना तसेच रोजच्या दैनंदिन संसारात देखील महिला छोट्यात छोट्या गोष्टीत Creativity – सर्जनशीलता वापरून चांगल्या गोष्टींची निर्मिती करत असतात. मग ते घर असो ज्यात जेवणातील विविध पदार्थ, घराचे interior, किंवा सण – उत्सवांमधील सजावट असो, किंवा व्यवसायातील अनेक नवनवीन कल्पना असोत. महिला नेहमीच सर्व बाबतींत पुढाकार घेतात.

त्यांच्यातील सर्जनशीलतेला Salute.

या शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त Myndful Mantras घेऊन येत आहे ९ देवता ९ कौशल्य (9 Goddess 9Skillset)

प्रत्येक देवी हि कुठल्या ना कुठल्या कौशल्या बरोबर संलग्न आहे..त्याप्रमाणे प्रत्येक स्त्री देखील कुठल्या न कुठल्या देवीचे रूपच असते. त्याला अनुरूप रोज या नवरात्रोत्सवात आपण देवीच्या, आताच्या युगातील स्त्रीच्या एक एक मानसिकतेबद्दल चर्चा करूया..
स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या , खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या या मानसिकतेचा 9 Powerful “Myndful Mantras” चा आपण जागर करू.
नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!

ज्यांनी या नवरात्रीतील मागील दिवसंबद्दल वाचले नसेल त्यांच्यासाठी..
पहिली माळ : https://bit.ly/9Goddess9skillset
दुसरी माळ : https://bit.ly/9goddess9skillsetday2
तिसरी माळ – http://bit.ly/9goddess9Skillserday3