सातवी माळ – सप्तमी
देवी – कालरात्री
कौशल्य – शुभंकारी, बहुगुणी

शुभंकारी , नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारी, संकट मोचक, बहुगुणी

देवी कालरात्री ही संकट मोचक आहे. नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारी, असुरांचा वाढ करणारी आहे. दिसायला अक्राळ विक्राळ असली तरी प्रेमळ आहे.

भारतीय स्त्री कलरात्री देवी प्रमाणेच शुभंकारी, सदैव कुटुंबाची मंगल कामना करणारी असते.
नोकरी व्यवसाय सांभाळताना तेवढीच किंबहुना थोडीबहुत जास्ती गृहकृत्यदक्ष असते.
कुटुंबाचे कल्याण, सुखशांती, आरोग्य ह्या आणि अश्या अनेक गोष्टींवर तिचे प्रामुख्याने लक्ष असते, त्या तिच्या Priority वरच्या गोष्टी असतात. कळत, नकळत येणाऱ्या नकारात्मक ऊर्जा , अप्रिय भावना, ताणलेले नातेसंबंध या सर्वांवर ती तिच्या चांगुलपणाने, सामंजस्याने, मेहनतीने उपाय शोधून काढते. आणि अश्या सर्व बिकट परिस्थितींवर विजय मिळवते.
घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळवून देण्याचे काम स्त्री करत असते. घराला सुखी – समाधानी ठेवण्यात महिलांचा सिंहाचा वाटा असतो.
आणि हे चांगुलपणाचे, शुभंकर कवच ती फक्त घरीच वापरते असे नाही, तर तिच्या Professional आयुष्यात सुद्धा , नोकरी व्यवसायात सुद्धा ती निर्मळ भावनेने संकटे परतण्यास कारणीभूत होते. व्यवसायातील Employees असो , किंवा नोकरी करत असताना Collogues असो ती ममत्वाने त्यांचे Problems स्वतःचे मानून ते सोडवण्यास सहाय्यकारी असते. त्यांच्या या गुणांमुळेच अनेक शास्त्रज्ञ, R & D मार्फत शोधांमध्ये महिलाही अग्रेसर असल्याचे दिसून आले आहे. आणि त्यांनी अखिल मानवजातीला, समाजाला उपयोगी अश्या उपकरणांचा, Solutions चा शोध लावला आहे.
आणि आपण मागे चर्चा केल्याप्रमाणे वेळ प्रसंगी असूर प्रवृत्तीच्या विनाशासाठी काली चे रूप धारण करते.

स्वतःच्या कुटुंबाचेच नाही तर समाजाचे सुद्धा हित जपणाऱ्या – शुभ चिंतणाऱ्या, शुभंकारी स्त्री रुपाला सादर प्रणाम!

या शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त Myndful Mantras घेऊन येत आहे ९ देवता ९ कौशल्य (9 Goddess 9Skillset)

प्रत्येक देवी हि कुठल्या ना कुठल्या कौशल्या बरोबर संलग्न आहे..त्याप्रमाणे प्रत्येक स्त्री देखील कुठल्या न कुठल्या देवीचे रूपच असते. त्याला अनुरूप रोज या नवरात्रोत्सवात आपण देवीच्या, आताच्या युगातील स्त्रीच्या एक एक मानसिकतेबद्दल चर्चा करूया..
स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या , खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या या मानसिकतेचा 9 Powerful “Myndful Mantras” चा आपण जागर करू.


नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!

ज्यांनी या नवरात्रीतील मागील दिवसंबद्दल वाचले नसेल त्यांच्यासाठी..

पहिली माळ : https://bit.ly/9Goddess9skillset
दुसरी माळ : https://bit.ly/9goddess9skillsetday2
तिसरी माळ : http://bit.ly/9goddess9Skillserday3
चौथी माळ : https://bit.ly/9Goddess9SkillsetDay4
पाचवी माळ : https://bit.ly/9Goddess9SkillsetDay5
सहावी माळ : http://bit.ly/9Goddess9SkillsetDay6