आठवी माळ – अष्टमी
देवी – महागौरी
कौशल्य – ज्ञानी, बुद्धिमत्ता
देवी महागौरी, धन – ऐश्वर्य प्रदायिनी, चैतन्यमयी, शारीरिक, मानसिक आणि सांसारिक तापाचे हरण करणारी आहे. पूर्व पापांचे निराकरण करणारी आहे.
आपण नेहमीच लक्ष्मी बरोबरच सरस्वती ची विद्येची पूजा करतो. महागौरी प्रमाणे भारतीय स्त्री ही पुराण काळापासून ते आत्ता आधुनिक युगात सुद्धा ज्ञान – बुद्धिमत्ता चे प्रतिनिधित्व करते. समाज जीवनात अनेक उदाहरणे तिने आपल्या ज्ञानाच्या जोरावर प्रस्थापित केली आहेत. मग ते तंत्रज्ञान क्षेत्र असो, R & D असो, सैन्यदलातील तंत्रज्ञ असोत, ISRO सारख्या नामांकित अवकाश संशोधन क्षेत्रातील असो, बँकिंग, रिटेल क्षेत्र असो की Healthcare मधील तंत्रज्ञ असोत. महिलांनी आपला ज्ञानाच्या जोरावर एक विशेष असा ठसा उमटवला आहे. नोकरी मध्ये सुद्धा अनेक उच्च पदे भूषवत आहेत आणि त्यांना न्याय देत आहेत. तसेच व्यवसायात सुद्धा उत्तुंग भरारी घेत आहेत. मग ते Manufacturing क्षेत्र असो, सेवा क्षेत्र असो की एखादा Startup किंवा एखादी उत्कृष्ट Business Idea असो. महिलांचा यशस्वी वावर सगळीकडे दिसतो. नवनवीन संकल्पना आणून त्या प्रत्यक्षात उतरवण्यात पण त्या अग्रेसर आहेत.
प्रत्येक स्त्री मधील महागौरी – सरस्वतीला त्रिवार वंदन!
या शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त Myndful Mantras घेऊन येत आहे ९ देवता ९ कौशल्य (9 Goddess 9Skillset)
प्रत्येक देवी हि कुठल्या ना कुठल्या कौशल्या बरोबर संलग्न आहे..त्याप्रमाणे प्रत्येक स्त्री देखील कुठल्या न कुठल्या देवीचे रूपच असते. त्याला अनुरूप रोज या नवरात्रोत्सवात आपण देवीच्या, आताच्या युगातील स्त्रीच्या एक एक मानसिकतेबद्दल चर्चा करूया..
स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या , खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या या मानसिकतेचा 9 Powerful “Myndful Mantras” चा आपण जागर करू.
नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!
ज्यांनी या नवरात्रीतील मागील दिवसंबद्दल वाचले नसेल त्यांच्यासाठी..
पहिली माळ : https://bit.ly/9Goddess9skillset
दुसरी माळ : https://bit.ly/9goddess9skillsetday2
तिसरी माळ : http://bit.ly/9goddess9Skillserday3
चौथी माळ : https://bit.ly/9Goddess9SkillsetDay4
पाचवी माळ : https://bit.ly/9Goddess9SkillsetDay5
सहावी माळ : http://bit.ly/9Goddess9SkillsetDay6
सातवी माळ : http://bit.ly/9Goddess9SkillsetDay7