द्वितीया – ब्रह्मचारिणी
कौशल्य – संयम, तपश्चर्या, अविचलता
संयम, तपश्चर्या आणि अविचलता… आज जाणून घेऊया एक तपश्चर्या, एक अनोखे व्यक्तिमत्व –
“डॉ प्राजक्ता-बोराडे कोळपकर”
स्त्री म्हंटले की सर्वात आधी आपल्यासमोर उभे राहतो तो गुण म्हणजे संयम.
ती जेवढ्या संयमाने (Patiently) स्वतःचे तसेच आप्तजनांचे आयुष्य, त्यातील वेगवेगळे विषय हाताळते त्याला तोड नाही. संसार, कुटुंब असो किंवा नोकरी, व्यवसाय ई. व अश्याच सर्वच पातळ्यांवर ती सातत्याने काम करत असते. अगदी रोज तेच तेच काम करावे लागत असले तरी त्या अविरतपणे करत असतात. सगळ्या भूमिका चोख बजावत असतात. त्या हे सगळे करत असतांना आपले “स्व”त्व देखील बर्याचदा बाजूला ठेवत असतात.
संपूर्ण आयुष्यात स्त्रीला अनेक अग्निदिव्यातून जावे लागते, त्यांचा सामना करावा लागतो. त्यासाठी लढताना, सामना करण्यासाठी ती वेळोवेळी स्वतःला update करत असते, स्वतःत सकारात्मक बदल घडवत असते. प्रसंगी इतरांमध्ये आणि वातावरणात सकारात्मक बदल घडवून आणण्यास कारणीभूत असते. तिच्या या अश्या तपः साधनेतून, तिच्या तपश्चर्येतून ती आयुष्यातील छोटे – मोठे उद्दिष्ट, यशाची शिखरे, महत्वाचे म्हणजे कुटुंबाचे आनंदी वातावरण साध्य करते. कुटुंबाला सांधून ठेवते.
आपल्या आजच्या मानकरी, ज्या देवी ब्रह्मचारीणीच्या “संयम, तपश्चर्या आणि अविचलता” या गुणधर्माशी साधर्म्य राखतात असे आम्हाला वाटते त्यांची “प्राजक्ता-बोराडे कोळपकर”, ज्या प्रा फाउंडेशन च्या संचालिका आहेत आपण त्यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया.
प्राजक्ताचा आजवरचा प्रवास हा आपणास थक्क करून टाकणारा आहे. कला, क्रीडा, नृत्य, आकाशवाणी व दूरदर्शन निवेदिका, कवयित्री, अभिनेत्री, वृत्तपत्रीय लेखिका, समुपदेशक, वक्ता, पाळणाघर आणि दिव्यांग मुलांसाठी अकादमी अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्राजक्ताच्या प्रवाही प्रवासात आपणही रममाण होऊन जाल. तिची जीवन – कहाणी जितकी मनाला हुरहूर लावणारी आहे तितकीच प्रेरणा देणारी आहे.
त्या प्रा फाउंडेशन च्या माध्यमातून Specially Abled मुलांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी काम करतात. काहीतरी वेगळे करायचे या उद्देशाने त्या झपाटलेल्या होत्या आणि तसाठी अविचल कार्यरत आहेत. लाखो रुपयांची नोकरी सोडून हे शिवधनुष्य पेलायचे त्यांनी ठरवले. हा Noble Cause त्यांनी स्वतःहून निवडला, आणि गेली अनेक वर्ष त्यावर संयमाने आणि अविचल पणे कार्य करत आहेत. यात पंधरा ते साठ वयाची सर्व प्रकारची दिव्यांग मुले आहेत. त्या म्हणतात “या मुलांना दुरुस्त करणे आणि समाजाच्या प्रवाहात आणणे हा माझा उद्देश नाही, तर या मुलांच्या जन्मापासून त्यांच्या आईचं आयुष्य खऱ्या अर्थाने संपलेलं असत, म्हणून तिला सांगणे आहे, तू हे मुल माझ्याकडे सोपव आणि तुझं उर्वरित आयुष्य तरी तुझ्या मनासारखं जग. या आयांच्या डोळ्यातून वाहणारे समाधानाचे आसू मला खूप शक्ती देतात. मागच्या जन्मी या मुलांनी माझ्यासाठी खूप काही केलं म्हणून या मुलांसाठी मी खूप काहीतरी करुन परतफेड करावी आणि त्यांच्या आयुष्यात आनंद पेरावा हीच मनापासून इच्छा.” आता प्रा फाँडेशन च्या माध्यमातून हे सगळं काम सूरु आहे. हे विचारच निःशब्द करतात आपल्याला. “प्रा फौंडेशन ला उद्या म्हणजेच ९ ऑक्टोबर २०२१ ला तब्बल १४ वर्ष पूर्ण होतायेत” एक तप पूर्ण होतेय त्याची “तपश्चर्या” त्यांची वाखाणण्याजोगी आणि वंदनीय आहे. समाजाच्या ह्या अत्यावश्यक विषयाला न्याय देताना त्यांच्या समोर अनेक संकटे आली. त्यातील आताचे करोना नामक Pandemic चे संकट तर संस्थेची आणि त्यांची स्वतःची परीक्षा बघणारे होते. पण त्या डगमगल्या नाहीत. त्यांची आतापर्यंत या विषयची तपश्चर्या मानसिक बळ आणि मोलाची साथ देऊन गेली. अनेक मदतीचे हात सुद्धा त्यामुळे पुढे आले अनेक अनोळखी अनामिक व्यक्ती धावून आल्या. अश्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना Support करणे तसे कठीण कार्य आहे. त्यांची मानसिक हेल्थ निट राखण्यासाठी, प्राजक्ता जी ना स्वतःच्या मानसिक हेल्थ वर पण तेवढेच काम करायला लागते. त्यांना अनेक “मानसन्मान” आणि “पुरस्कार” प्राप्त झाले आहेत. पण त्यांच्यासाठी सर्वोच्च पुरस्कार हा असेल की जेव्हा अश्या Specially Abled मुलांसाठी संस्था नसाव्यात, त्याची गरजच नसावी. हा त्यांचा पुरस्कार आणि मानसिक इच्छा!
ह्या मुलांची सेवा आणि त्यांच्या पालकांसाठी, मुख्यत्वे त्यांच्या आईचे उर्वरित आयुष्य सुकर करणे हि त्या देशसेवा मानतात. केवढे थोर हे विचार. त्यांच्या विचारांना आणि कर्तुत्वाला मनःपूर्वक नमन.
स्त्रीतील संयमाचे, तपश्चर्येचे. अविचलतेचे आणि दृढनिश्चयाचे हे चालते बोलते उदाहरण आहे.
प्राजक्ता जी ना आणि एकूणच संयमी, अविचल स्त्री शक्तीला माझा त्रिवार प्रणाम.
हा लेख Facebook वर www.facebook.com/MyndfulMantras वर जाऊन जास्तीत जास्त share आणि like करा ..
मागील वर्षाच्या नवरात्रीचे लेख बघण्यासाठी क्लिक करा https://www.myndfulmantras.com/blog/
श्रेया कुलकर्णी जोशी
Clinical Psychologist
REBT Practitioner
Flower Remedy Practitioner
Myndfulmantras@gmail.com
www.myndfulmantras.com