तृतीया: चंद्रघंटा
कौशल्य – शांतता, सौम्यता, सजगता

आज जाणून घेऊया असेच एक अनोखे व्यक्तिमत्व 3x TEDx Speaker and Founder of LAJA – “रिद्धी दोशी पटेल”

देवी चंद्रघंटा चे रूप सौम्यता, शांतता दर्शवते. भारतीय महिलांमध्ये देखील देवी चंद्रघंटेचा अंश आढळून येतो. ती शांतपणे, हसतमुख अत्यंत संयमाने स्वतःचा संसार, व्यवसाय सांभाळते. स्वतःचे करिअर संभाळून सगळे सणवार, उत्सव साजरे करते किंबहुना यशस्वीपणे पार पाडते.
शांतता, सौम्यता बरोबरच ती तेवढीच सजग असते. तिचे वेळेचे नियोजन, कामांचे व्यवस्थापन एकूणच सर्व प्रसंगांना ती सजगतेने बघत असते, सांभाळत असते. तिला येणाऱ्या संकटांची सुद्धा आधीच चाहूल लागत असते. त्यांचा सामना करायला ती सजगतेने सज्ज राहत असते.

आजच्या आपल्या मानकरी “रिद्धी दोशी पटेल” या देवी चंद्रघंटा च्या शांतता, सौम्यता, सजगता गुणधर्माशी साधर्म्य राखतात असे आम्हाला वाटते.
त्या त्यांच्या वर्तुणुकीत आणि बोलण्यात सुद्धा अत्यंत सौम्य, नम्र आहेत. त्या Child Psychologists आहेत. Parenting Counsellor आहेत. त्या पालक आणि मुलांमधल्या संवादांना सुधारून त्यांच्या घरात आनंद निर्माण करून पालकांना त्यांच्या मुलांच्या Growth साठी कसे मानसिक पातळीवर कामकरता येईल या साठी प्रयात्त्नशील असतात.

त्या ३ वेळेस TEDx Speaker आणि 16 TED-Ed Clubs ना त्या Advisor आहेत. मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या Mental Wellness साठी प्रामुख्याने काम करतात. त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यात National Award and Young Entrepreneur Award हे देखील अत्यंत मनाचे पुरस्कार आहेत. त्या LAJA संस्थेच्या Founder आहेत. हा भारतातील सर्वात पहिला फोरम आहे जो महिला स्व – सक्षमीकरण आणि वाढीवर (Women’s Development, Growth and Self-Empowerment) प्रामुख्याने काम करतो. त्यांनी असे ६ LAJA Chapters भारतभरात उभे केले आहेत. महिलांसाठी LAJA च्या माध्यमातून शहरी तसेच ग्रामीण भागातही त्या प्रभावीपणे काम करतात.

रिद्धी एक Qualified Trainer सुद्धा आहेत. अत्यंत यशस्वीपणे त्यांनी Corporates, वैयक्तिक, शैक्षणिक संस्था तसेच अनेक सामाजिक संस्थाना प्रशिक्षण दिले आहे. त्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. त्या सातत्याने मानसिक सक्षमता (Mental Health Awareness) या विषयात सातत्याने प्रचार आणि प्रसार करत असतात. आणि त्यासाठी प्रयत्नशील असतात. She has the distinction of conducting the very first Online Roundtable Conference to discuss the recommendations of the NEP 2020 and submit a whitepaper on the churnings from the same to The Ministry of Education.


एक उत्कृष्ठ ट्रेनर आणि देशाचे भवितव्य असलेली मुले आणि त्यांचे पालक यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आणि महत्वाचे म्हणजे महिलांच्या स्व-सक्षमीकरणासाठी, त्यांच्या वाढीसाठी अविरतपणे, सजगतेने काम करणाऱ्या “रिद्धी दोशी पटेल” यांच्या कार्याला आणि त्यांना मनःपूर्वक अभिवादन!

हा लेख Facebook वर www.facebook.com/MyndfulMantras वर जाऊन जास्तीत जास्त share आणि like करा ..

मागील वर्षाच्या नवरात्रीचे लेख बघण्यासाठी क्लिक करा https://www.myndfulmantras.com/blog/

श्रेया कुलकर्णी जोशी
Clinical Psychologist
REBT Practitioner
Flower Remedy Practitioner
Myndfulmantras@gmail.com
www.myndfulmantras.com