पंचमी – देवी स्कंदमाता
कौशल्य – करुणा, निर्दोषपणा, धैर्य
आज जाणून घेऊया एका अद्भुत व्यक्तिमत्वाची, एका अनोख्या मातेची, अमूल्य जीवनसूत्रांच्या Storyteller ची, “रेणूताई गावस्करांची”
Renu Gavaskar
देवी स्कंदमाता हे इच्छापूर्ती करणारे रूप मानले जाते. ते माता स्वरूप आहे. त्यामुळे दयाभाव, करूणा, निर्मळ प्रेम हे सगळे भाव तिच्या रुपात आपसूकच येतात. स्त्री सुद्धा जेव्हा माता या भूमिकेत येते तेव्हा ती स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणते. माता होण्याची चाहूल लागल्यावर स्वतःची काळजी घेता घेता स्वतःच्या जबाबदाऱ्या अत्यंत हुशारीने काळजीपूर्वक पार पाडत असते. मातृत्व जसा तिच्या अपत्याचा जन्म असतो तसाच तिचाही तो पुनर्जन्मच असतो. डिलिव्हरी च्या वेळेस काहिजणींना तर मरणाच्या दारातून झगडून परत यावे लागते. तरीही ती अविरत मुलांची कुटुंबाची सेवा करताच असते. मातेच्या भूमिकेत ती चतुरस्त्र भूमिका बजावत असते नोकरी – व्यवसाय सांभाळणे, मुलांचे संगोपन, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, थोरा मोठ्यांची सेवा सर्व काही यशस्वीपणे हसतमुखाने पेलत असते.
आजच्या आपल्या मानकरी रेणूताई या लेखिका आणि समाजसेविका आहेत. करुणा, धैर्य आणि आणि ममत्व ई गुणांचा त्या संगम आहेत, नव्हे त्या गुणांसाठी रेणूताई आदर्श आहेत.
त्यांनी तर समाजाकडून दुर्लक्षित, दूर लोटलेल्या, निराधार अश्या मुलांचे मातृत्व स्वतःहून स्वीकारले आहे. त्या मुलांना कोणतेही लेबल ना लावता निर्दोषपाने स्वीकारले आहे. पोटच्या मुलांप्रमाणे त्या त्यांचे संगोपन करतात. त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असतात.
रेणूताई या मुलांच्या Friend, Philosopher, Guide, Mentor च नाही तर त्यांच्या आई सुद्धा आहेत.जगातील इतर मातांनप्रमाणेच त्या त्यांच्या ह्या मुलांना सर्वोत्तम मिळाल्याशिवाय शांत बसत नाहीत. कोवळ्या वयात जर संस्कार योग्य मिळाले तर ते माणसाला बदलू शकतात… वाईट मार्गापासून प्रवृत्त करू शकतात यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. मुलांचे वागणे, त्यांची मानसिकता आपल्यालासुद्धा चांगली मानसिकता बनवण्यास प्रवृत्त करते, त्यांच्याकडून आपण भरपूर काही शिकू शकतो असे रेणूताई चे सांगणे आहे. समाजात वाईट मार्गाला लागलेल्या मुलांना आपण बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत सुधारण्यासाठी नाही. मुलांकडूनच मी जीवनात सकारात्मकता शिकतेय असे त्या नेहमी सांगतात.
त्या म्हणतात कोणावरही कोणताही शिक्का न लावता, माणसाला माणूस म्हणून जगवायला द्यायला पाहिजे.
शिकतांना निखळ आनंद मिळत असावा असे वाटले म्हणून त्यांनी महाविद्यालयात तत्वज्ञान विषय निवडला असे त्या सांगतात. त्यांनी मुंबई विद्यापीठाची एम.ए. (तत्त्वज्ञान) ही पदवी मिळवली आहे.
रेणूताई गावस्करांनी समाजातील सर्व स्तरांतील मुलांसाठी (मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठीसुद्धा) कथाकथकाची भूमिका गेली कित्येक वर्ष समर्थपणे पार पाडली आहे.
त्या आम्ही युवा या न्यासाच्या अध्यक्ष आहेत. मुलांचे भवितव्य घडविणार्या एकलव्य न्यासाच्याही प्रमुख आहेत. डेव्हिड ससून संस्थेत त्या कित्येक वर्षे कार्यरत होत्या
त्यांची स्वलिखित अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.
अनाथ मुलांसाठी काम करत असल्याबद्दल आदर्श पालक पुरस्कार, सराहनीय शैक्षणिक कार्यासाठी आदिशक्ती पुरस्कार, अन्यायाविरुद्ध लढ्यासाठी सुसान ॲन्थनी पुरस्कार अश्या अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत.
रेणूताईना, त्यांच्या मातृत्वाला, ममत्वाला, करुणेला आणि प्रेरणेला त्रिवार वंदन!
धन्यवाद Milind Verlekar जी आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल.
हा आणि या वर्षीच्या नवरात्रीतील आधीचे लेख Facebook वर www.facebook.com/MyndfulMantras वर जाऊन जास्तीत जास्त share आणि like करा ..
मागील वर्षाच्या नवरात्रीचे लेख बघण्यासाठी क्लिक करा https://www.peru-turtle-924795.hostingersite.com/blog/
श्रेया कुलकर्णी जोशी
Clinical Psychologist
REBT Practitioner
Flower Remedy Practitioner
Myndfulmantras@gmail.com
www.peru-turtle-924795.hostingersite.com