षष्ठी: देवी कात्यायनी
कौशल्य – प्रतिकार, असुरविनाशनी
आज जाणून घेऊया एका असुर मर्दिनीला, “ॲडव्होकेट मनीषा तुळपुळे” यांना, ज्यांनी लहान मुलांसाठी, महिलांसाठी अनेक प्रकारे लढे देऊन, त्यांना सुद्धा अपप्रवृत्ती रुपी राक्षसाचा प्रतिकार करायला, विनाश करायला सक्षम केले आहे.
देवी कात्यायनी ही महिषासूर मर्दिनी म्हणून प्रसिद्ध आहे. महिषासूर नामक असुराचा देवींनी वध केला.
आपल्या समाजात अनेक अश्या महिला आहेत ज्यांनी समाजातील अनेक अपप्रवृत्तीच्या विरोधात जाऊन, प्रसंगी त्यांचा नाश, नायनाट केला आहे, करत आहेत.
अनेक जणी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून, कधी वैयक्तिक Capacity मध्ये अनेकविध असामाजिक तत्वांना, व्यक्तींचा महिषारसुर मर्दिनी सारख्या सामोरे जातात, प्रसंगी त्यांचे मर्दन करतात.
महिला लाचार नाहीत तर त्या प्रसंगी दुर्गेचे महिषासूर मर्दिनी चे रूप देखील घेऊ शकतात हे अनेक जणींनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.
आजच्या आपल्या मानकरी ॲडव्होकेट मनीषा तुळपुळे या लहान मुले आणि महिला या विषयांत अनेक Cases लढून, त्यांच्या हक्कांबद्दल Awareness करवून न्याय मिळवून देण्यात यशस्वी झाल्या आहेत.
त्यांचे LLB पर्यंत शिक्षण झाले आहे. त्या मुंबई महापालिकेत Prosecutor होत्या. २० वर्ष नोकरीनंतर स्वेच्छा निवृत्ती घेऊन त्यानंतर महिला व मुलांच्या संदर्भात कायदेविषयक काम करण्यास सुरुवात केली.
सेहत संस्थेबरोबर पिडीतांचे वैद्यकीय उपचार व कायदे या विषयात संपुर्ण भारतात प्रशिक्षण कार्यक्रम, स्नेहा संस्थेबरोबर मुंबईत महिला व मुलांच्या कायद्य़ात पोलीस प्रशिक्षण, तसेच IJM संस्थेबरोबर कोकण विभागात विविध संस्था व सरकारी कर्मचारी यांचे मुलांविषयक कायद्यात प्रशिक्षण कार्यक्रम राबवले आहेत.
Voice for Justice या संस्थेची POSH कायद्यातील resource person. महिला व बालविकास च्या केंद्रिय मंत्रालयाने या संस्थेला POSH कायद्यातील प्रशिक्षणासाठी empaneled केले आहे.
RBI च्या केंद्रिय POSH समितीवर देखील त्या कार्यरत आहेत.
मजलीस संस्थेतर्फे २००९ – १० मधे महिला कायद्यात कामासाठी Fellowship.
महिला व बालकांना कायदेविषयक मोफत सल्ला देऊन सामाजिक बांधिलकी त्या जपत आणि जगत असतात.
अनेक वर्तमानपत्रात, मासिकात लेख प्रसिद्ध झाले आहेत. रेडीओ तसेच Tv वर मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत.
महिला व मुले यांच्याविषयीचे कायदे करण्यात आणि राबवण्यात त्यांचा मोलाचा हातभार आहे.
रायगड बाल कल्याण समिती अध्यक्ष. २०१३ ते २०१५. मार्गदर्शक बालकल्याण समित्या.कोकण विभाग. अश्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत, पाडत आहेत. महाराष्ट्र महिला बाल विकास विभागातर्फे जुन २०२० पासुन त्यांची नियुक्ती झाली आहे.
अनेक आघाड्यांवर बालकल्याण आणि महिला यांच्या संदर्भात लढणाऱ्या आणि अपप्रवृत्तींना प्रतिकार करणाऱ्या, प्रसंगी त्यांच्या विनाशास कारणीभूत असणाऱ्या मनीषा मॅडम रुपी दुर्गेला शतशः नमन.
धन्यवाद Rupali Pethkar-Joshi आम्हाला मनीषा Madam बरोबर Connect करून दिल्याबद्दल.
९ दुर्गा आणि ९ कौशल्य या संदर्भातील हा आणि या वर्षीच्या नवरात्रीतील आधीचे लेख Facebook वर www.facebook.com/MyndfulMantras वर जाऊन जास्तीत जास्त share आणि like करा ..
मागील वर्षाच्या नवरात्रीचे लेख बघण्यासाठी क्लिक करा https://www.myndfulmantras.com/blog/
श्रेया कुलकर्णी जोशी
Clinical Psychologist
REBT Practitioner
Flower Remedy Practitioner
Myndfulmantras@gmail.com
www.myndfulmantras.com