सप्तमी – कालरात्री
कौशल्य – शुभंकारी, बहुगुणी
आज जाणून घेऊया एक प्रेमळ,सहृद व्यक्तिमत्व, एक महत्वाकांक्षी आणि यशस्वी, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत महिला उद्योजिका “सुचेता आचार्य”.
देवी कालरात्री ही संकट मोचक आहे. नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारी, असुरांचा वध करणारी आहे. दिसायला अक्राळ विक्राळ असली तरी प्रेमळ आहे.
भारतीय स्त्री कालरात्री देवी प्रमाणेच शुभंकारी, सदैव कुटुंबाची मंगल कामना करणारी असते.
नोकरी व्यवसाय सांभाळताना तेवढीच किंबहुना थोडीबहुत जास्ती गृहकृत्यदक्ष असते.
कळत, नकळत येणाऱ्या नकारात्मक ऊर्जा , अप्रिय भावना, ताणलेले नातेसंबंध या सर्वांवर ती तिच्या चांगुलपणाने, सामंजस्याने, मेहनतीने उपाय शोधून काढते. आणि अश्या सर्व बिकट परिस्थितींवर विजय मिळवते.
हे चांगुलपणाचे, शुभंकर कवच ती फक्त घरीच वापरते असे नाही, तर तिच्या Professional आयुष्यात सुद्धा , नोकरी व्यवसायात सुद्धा ती निर्मळ भावनेने संकटे परतण्यास कारणीभूत होते.
काही माणसं जन्मलेली असतात चांगुलपणा साठी, लोकांचे भले करण्यासाठी. ते नेहमी लोकांचे शुभ चिंतत असतात.
आजच्या आपल्या मानकरी सुचेता आचार्य ह्या देखील असेच व्यक्तिमत्त्व. स्वभावाने अत्यंत प्रेमळ. स्वतःचे कुटुंब (सासर आणि माहेर दोन्हीही) अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळून स्वतःचे करिअर प्रभावीपणे जोपासतात.
त्यांचा जीवनप्रवास हा अनेक प्रवासांचा मिळून झालेला प्रवास आहे. प्रत्येक टप्प्यावर मी काही ना काही शिकत गेली असे त्या आवर्जून सांगतात.
अत्यंत पारंपारिक कर्मठ अश्या कौटुंबिक वातावरणातून आलेल्या असल्याने त्यांचा प्रवास, घराच्या पाठींब्याशिवाय व्यवसाय चालू करणे आणि वाढवणे, तसा खडतरच होता. आणि प्रत्येक आलेल्या Challenge ने त्यांना अधिक सक्षमच बनवले. First Generation Entrepreneur असून सुद्धा त्यांनी Motivation, Self Motivation, Determination आणि Go – getter स्वभावामुळे सर्व अडचणींवर मात केली.
त्यांच्या पहिल्या मुलीच्या जन्माच्या वेळेस, जन्मजात तसेच लहान बालकांसाठी आवश्यक, Bed Sets, जे अत्यंत नैसर्गिक, स्वच्छ, निर्जंतुक आणि त्वचेस चांगल्या पर्यायांच्या, Best देण्याच्या उद्देशाने, शोध घेत असतांना, समाजातील गरज लक्षात आली आणि “Baby Prints” या त्यांच्या पहिल्या व्यवसायाचा जन्म झाला. आणि लहान मुलांसाठी सुरक्षित आणि Best Bed Sets देण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले. आणि त्या त्यात यशस्वी झाल्या.
Baby Prints च्या यशाने आणि चांगल्या कामगिरीने त्यांनी नंतर “Quilt Manufacturing” च्या व्यासायात यशस्वी झेप घ्रेतली. आणि थोड्याच अवधीत जम बसवला. USA आणि Kenya येथे यशस्वी भाग घेतलेल्या Expo नंतर त्यांच्या साठी परदेशातील व्यवसायाची कवाडे उघडी झाली. Europe, USA, Singapore, Australia आणि Canada ई देशांमधून Orders यायला लागल्या.
त्यांनी जवळपास २०० महिलांना स्वतःच्या कंपनीत/Project मध्ये सामावून घेतले.
हे सगळे करत असतांना त्या सामाजिक बांधिलकी विसरल्या नाहीत, विविध सामाजिक संस्थांमधून, BBN Global Association सारख्या Business Networking Forums मधून त्या कार्यरत आहेत. आणि आता महिला उद्योजिकांना राष्ट्रीय पातळीवर एकत्र आणण्यासाठी त्या लवकरच एक उपक्रम चालू करत आहेत. ज्यातून महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडण्यास हातभार लागेल.
स्वतःच्या कुटुंबाचेच नाही तर समाजाचे सुद्धा हित जपणाऱ्या – शुभ चिंतणाऱ्या, “सुचेता मॅडम” सारख्या शुभंकारी स्त्री रुपाला सादर प्रणाम!
९ दुर्गा आणि ९ कौशल्य या संदर्भातील हा आणि या वर्षीच्या नवरात्रीतील आधीचे लेख Facebook वर www.facebook.com/MyndfulMantras वर जाऊन जास्तीत जास्त share आणि like करा…
मागील वर्षाच्या नवरात्रीचे लेख बघण्यासाठी क्लिक करा https://www.myndfulmantras.com/blog/
श्रेया कुलकर्णी जोशी
Clinical Psychologist
REBT Practitioner
Flower Remedy Practitioner
Myndfulmantras@gmail.com
www.myndfulmantras.com