अष्टमी – महागौरी
कौशल्य : ज्ञानी , बुद्धिमत्ता
विद्वत्ता, ज्ञान, कर्तृत्व आणि सामाजिक भान यांचा अनोखा मिलाफ असणाऱ्या “सौ स्नेहल अजय दिक्षित” या आपल्या आजच्या मानकरी आहेत. त्यांच्या बद्दल आपण जाणून घेऊया.
आपण नेहमीच लक्ष्मी बरोबरच सरस्वती ची विद्येची पूजा करतो. आजच्या देवी महागौरी प्रमाणे भारतीय स्त्री ही पुराण काळापासून ते आत्ता आधुनिक युगात सुद्धा ज्ञान – बुद्धिमत्ता चे प्रतिनिधित्व करते. समाज जीवनात अनेक उदाहरणे तिने आपल्या ज्ञानाच्या जोरावर प्रस्थापित केली आहेत. मग ते तंत्रज्ञान क्षेत्र असो, R & D असो, सैन्यदलातील तंत्रज्ञ असोत, ISRO सारख्या नामांकित अवकाश संशोधन क्षेत्रातील असो, बँकिंग, रिटेल क्षेत्र असो की Healthcare मधील तंत्रज्ञ असोत. महिलांनी आपला ज्ञानाच्या जोरावर एक विशेष असा ठसा उमटवला आहे.
नोकरी मध्ये सुद्धा अनेक उच्च पदे भूषवत आहेत आणि त्यांना न्याय देत आहेत.
तसेच व्यवसायात सुद्धा उत्तुंग भरारी घेत आहेत. मग ते Manufacturing क्षेत्र असो, सेवा क्षेत्र असो की एखादा Startup किंवा एखादी उत्कृष्ट Business Idea असो. महिलांचा यशस्वी वावर सगळीकडे दिसतो.
नवनवीन संकल्पना आणून त्या प्रत्यक्षात उतरवण्यात पण त्या अग्रेसर आहेत.
आपल्या ज्ञान – बुद्धिमत्ता चे प्रतिनिधित्व करणाऱ्या *आजच्या मानकरी स्नेहल दीक्षित यांनी Masters in Marketing Management मध्ये Post-Graduation केले आहे.
तसेच IIM Calcutta Fintech & Blockchain Course. POSH Act IC trainer from SHRIM हे देखील शिक्षण घेतले आहे.
30 वर्षे आर्थिक , गुंतवणूक क्षेत्राचा अनुभव , याच क्षेत्रात नोकरी सुरू.
इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंटस अश्या क्षेत्रात तिकडच्या Dynamism आणि Work Pressure, Targets मुळे भले भले जायला घाबरतात त्या क्षेत्रातील दिग्गज कोटक, फ्रॅंकलिन सारख्या कंपनी मध्ये त्यांनी Vice President Sales ही अत्यंत महत्वाची जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली आहे.
सध्या बीएसी Bombay Stock Exchange येथे हेड म्युचल फंड्स डिस्टि्ब्युशन म्हणून कार्यरत आहेत.
नोकरी करत असतांना ही त्यांच्या आतील एक संवेदनशील मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. आपल्या ज्ञानाचा फायदा समाजाला झाला पाहिजे, समाज अर्थसाक्षर झाला पाहिजे यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले.
फायनांशियल लिट्रसी , आर्थिक नियोजनाचे महत्व आणि ते कसे करावे यांवर व्याख्याने.
बँकिंग आणि फायनांस या विषया अंतर्गत बँकिंग अधिकारयांची मुलाखत पै फ्रेन्डस लायब्ररीतर्फे, एप्रिल २०१८ मध्ये घेतली होती.
संवेदनशील मन आणि सामाजिक भान यामुळे त्यांनी नोकरी, अर्थ विषयात जनजागरण सांभाळून सामाजिक कामातही सक्रिय सहभाग घ्यायला सुरुवात केली.
भारत विकास परिषद, च्या त्या कार्यकर्ती आहेत.
त्या सामाजिक भानातूनच, आणि समाजाला आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेतून ट्रेन मधील मैत्रीणींबरोबर एकत्र येऊन उर्जा फाऊंडेशनचा प्रारंभ केला. जुलै,२०१५. अनेक उपक्रम सुरु.
‘माझे प्लास्टीक कचरा ही माझी जबाबदारी’ अभियान, पुढे नेऊन पर्यावरणस्नेही पद्धतीने प्लास्टीकपासुन पॅालीफ्युल करणे यात केशवसीता मेमोरीयल ट्रस्ट,रूद्र इनव्हॅारमेंटल, केडीएमसी याच्याबरोबर काम सुरू.
प्लास्टीक त्रिसुत्रीवर आधारित जन जागृती (पब्लीक अवेअरनेस) कार्यक्रम. गेल्या ६० महिन्यांमध्ये १०० टन प्लास्टिक कचरा उर्जा टीमने डोंबिवली, ठाणे , कल्याण येथील नागरिकांकडून जमा करुन पर्यावरणपूरक पद्धतीने विघटन केले. समाजातील अनेक नागरिकांना यात सामाउन घेत एक चांगली प्रक्रिया तयार केली व प्लास्टिक कमी वापर्ण्याची व प्लास्टिक कचरा जमा करून तो योग्य ठिकाणी देण्याची चांगली सवय लावत आहेत.
गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत ज्ञानयज्ञ ऊपक्रमा अंतर्गत अत्तापर्यत ५ वर्षात ४,००० वर विद्यार्थी- विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत व समतोलवाढीसाठी अनेक उपक्रम देखील केले आहेत.
वृद्ध , मतिमंद मुलांसाठी मदत व त्यांसोबत एकत्र येऊन उपक्रम जेणेकरून आपला वेळ त्यांचासाठी सत्कारणी लागो, ज्यामुळे त्यांना आनंद होईल.
गरजु स्त्रीयांसाठी रोजगार निर्मिती – या अंतर्गत शिवणकामाद्वारे , उटणी बनविणे असे उपक्रम सुरू.
महिलांसाठी विशेष अर्थिक साक्षरता उपक्रम -या अंतर्गत महिलांनी अर्थिक गुंतवणूक कशी व का करावी यावर प्रबोधन.
आपली संस्कृती जपा – गुढीपाडवा – दिपावली या सणांच्या निमित्ताने संस्कृती व समाजिक उपक्रमांची सांगड.
वैयक्तिक आणि संस्थात्मक असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
विद्वत्ता, ज्ञान, कर्तृत्व आणि सामाजिक भान यांचा अनोखा मिलाफ असण्याऱ्या स्नेहल दीक्षित रुपी दुर्गेला मनःपूर्वक नमन
९ दुर्गा आणि ९ कौशल्य या संदर्भातील हा आणि या वर्षीच्या नवरात्रीतील आधीचे लेख Facebook वर www.facebook.com/MyndfulMantras वर जाऊन जास्तीत जास्त share आणि like करा…
मागील वर्षाच्या नवरात्रीचे लेख बघण्यासाठी क्लिक करा https://www.myndfulmantras.com/blog/
श्रेया कुलकर्णी जोशी
Clinical Psychologist
REBT Practitioner
Flower Remedy Practitioner
Myndfulmantras@gmail.com
www.myndfulmantras.com