नवमी – सिद्धिदात्री देवी

कौशल्य – दातृत्व, निर्मिती, नियोजन

आज जाणून घेऊया “प्रज्ञा पोंक्षे” यांना, ज्यांनी “Her Highnest” संकल्पनेतून स्वतःच्या घराचेच नाहीतर समस्त स्त्रियांच्या स्वतःच्या हक्काच्या घराचे, स्त्रीच्या खर्या अर्थाने Independence चे स्वप्न बघितले आहे.

आजची देवी सिद्धिदात्री देवी, तिच्या आराधनेने भगवान महादेवांना 8 सिद्धींची प्राप्ती झाली होती असे सांगतात.


आधुनिक स्त्री जरी सिद्धी देणारी नसली तरी तिच्या सिद्ध हस्ताने ती नेहमीच सगळ्यांना काहींना काही देत असते. कुटुंब तसेच नोकरी – व्यवसायात देखील येन केन मार्गाने तिचे सहकार्यांप्रति, employee प्रति हे दातृत्व चालूच असते. मुलांना चांगले संस्कार देणे हे तर तिचे अविरत पणे चालूच असते.
ज्याप्रमाणे सिद्धीदात्री देवीने प्रजापिता ब्रह्मा ना सृष्टी निर्माण करायला सांगितले, भगवान विष्णू ना ती व्यवस्थित कार्य करतेय ना ह्यावर लक्ष ठेवायला सांगितले आणि महादेवांना दुष्ट प्रवृत्तीच्या विनाशाची जबाबदारी घ्यायला सांगितले. त्याप्रमाणेच स्त्री ही एक उत्तम नियोजन करणारी असते.. एक उत्कृष्ट व्यवस्थापक असते, Manager असते. जशी व्यवसायात ती Employees KRA – Key Responsibilities ठरवून देते, त्याप्रमाणे काम होतेय की नाही हे बघते. तसेच ती घरातही कुटुंबाचे KRA ठरवून देते. जबाबदाऱ्या वाटून देते. स्वतः काय करायचे, नवऱ्याने काय करायचे, मुलांनी कोणती कामे वाटून घ्यायची हे कुशलतेने ठरवते, आणि त्यांना त्याचे महत्व पटवून देऊन, कामे करूनही घेते.
घरातील प्रत्येक कार्य, ते कितीही लहान असो किंवा मोठे असो, सणवार – उत्सव असोत, महिला सगळ्याचे यथासांग – व्यवस्थित निययोजन करून ते पार पाडते.

आपल्या आजच्या मानकरी “प्रज्ञा पोंक्षे” या नियोजन, निर्मिती आणि दातृत्व या देवी सिद्धीदात्री च्या गुंणधर्मांशी तंतोतंत जुळतात. अत्यंत धाडसाने त्यांनी स्वतःचे “त्रिमित रचना” हे विश्व निर्माण केले. गेले ८-१० वर्षे त्या तो व्यवसाय अत्यंत यशस्वीपणे पार पडत आहेत. आर्किटेक्चरल डिझाईन आणि प्लानिंग, इन्टेरिअर डिझाईन, Project & Contract Management विषयात ते ग्लेनमार्क, मास्टेक, रिलायंस सारख्या अनेक नामवंत कंपन्यांना सर्व्हिस देत आहेत.

व्यवसायात यशाची उत्तुंग शिखरे गाठत असतांना त्यांनी सामजिक बांधिलकी जपण्याकडे हि तेवढाच भर दिला. समजाचे आपणहि काही देणे लागतो हि भावना त्या सतत जपत राहिल्या. त्यातून त्यांनी “हार्मनी – सेफ लिविंग” हा उपक्रम चालू केला, ज्यातून सामालाला निसर्गाच्या जवळ नेले आणि समाजभान जपण्याचा देखील प्रयत्न केला, करत आहेत.
आज स्त्री कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. नोकरी – व्यवसायात सुद्धा ती अग्रेसर आहे. स्त्री ने “स्वत्व” जपले पाहिजे. तिच्या मधील “ती” कडे पण लक्ष दिले पाहिजे. स्त्री हि Independent असली पाहिजे यावर प्रज्ञाजींचा खूप भर आहे. Independence विचारांचा, वर्तनाचा, आर्थिक एकूणच सर्वच स्तरावर असला पाहिजे. एक महत्वाचा मुद्दा बर्याचदा दुर्लक्षित राहतो तो म्हणजे स्त्रीचे स्वतःचे हक्काचे घर.
प्रत्येक स्त्रीचे स्वतःचे हक्काचे घर असावे. जे तिच्या स्वतःच्या नावावर असावे हे स्वप्न उस्राशी बाळगून त्या अविरत काम करत आहेत. “Her Highnest” (www.herhighnest.com)संकल्पनेतून त्या यशस्वीपणे काम करत आहेत. महिलांना मार्गदर्शन करत आहेत. अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांबरोबर Tie-Up करून महिलांना Concession मिळवून देऊन स्वतःच्या नावावर घर असावे या साठी प्रोत्साहन देत आहेत. आणि हे सर्व त्या कोणत्याही मोबदल्याशिवाय महिला सक्षमीकरण – Independence या एकाच उद्देश्याने करत आहेत.

एवढे करूनच त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी महिलांसाठी सर्व सोयींनी सुसज्ज असे Shelters उभे केले आहेत, अजून करणार आहेत. आणि Co- working workspace पण निर्माण केल्या आहेत.
आणि हे सर्व ते विधायक देशकार्य मानून निस्वार्थपणे करत आहेत.

नवीन विश्व निर्माण करण्याचे धमक, त्यासाठीचे नियोजन आणि दातृत्व असणाऱ्या सिद्धदात्री देवीचे आधुनिक रूप असणाऱ्या “प्रज्ञा पोंक्षे” जींना माझा मनाचा मुजरा.

प्रत्येक स्त्री मधील सिद्धिदात्री ला मनापासून प्रणाम !

या शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त Myndful Mantras तर्फे आपण ९ देवता ९ कौशल्य (9 Goddess 9Skillset) या संदर्भात चर्चा केली.
प्रत्येक देवी हि कुठल्या ना कुठल्या कौशल्या बरोबर संलग्न आहे..त्याप्रमाणे प्रत्येक स्त्री देखील कुठल्या न कुठल्या देवीचे रूपच असते. त्याला अनुरूप रोज या नवरात्रोत्सवात आपण देवीच्या, आताच्या युगातील स्त्रीच्या एक एक मानसिकतेबद्दल चर्चा केली..
स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या , खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या या मानसिकतेचा 9 Powerful “Myndful Mantras” चा आपण तुमच्या साहाय्याने जागर केला।
नवरात्रीच्या या शेवटच्या माळेत मी भारतीय स्त्री मधील सर्व गुणांना, तिच्यातील नव दुर्गांना त्रिवार वंदन करते.

९ दुर्गा आणि ९ कौशल्य या संदर्भातील हा आणि या वर्षीच्या नवरात्रीतील आधीचे लेख Facebook वर www.facebook.com/MyndfulMantras वर जाऊन जास्तीत जास्त share आणि like करा…

मागील वर्षाच्या नवरात्रीचे लेख बघण्यासाठी क्लिक करा https://www.myndfulmantras.com/blog/

श्रेया कुलकर्णी जोशी
Clinical Psychologist
REBT Practitioner
Flower Remedy Practitioner
Myndfulmantras@gmail.com
www.myndfulmantras.com