तिसरी माळ – तृतीया
देवी – चंद्रघंटा
कौशल्य – शांतता, सौम्यता, सजगता
आजची महिला: अनुजा , यशस्वी लढा : Anorexia – Eating Disorder
अनुजा लहानपणापासूनच दिसायला एकदम गुबगुबीत. हेल्दी बेबी म्हणून घरामध्ये प्रसिद्ध. जस जशी अनुजा मोठी होऊन college ला जायला लागली तिच्या behavior मध्ये बरेच changes दिसायला लागले. काही दिवसांनी अनुजाने बारीक व्हायचे मनावर घेतले. कुठलाही पदार्थ खातांना वजन वाढण्याची भीती देखील वाटू लागली. यामध्ये diet च्या नावाखाली कमी जेवणे, सगळे न्यूट्रिशनस असलेले फूड इन टेक् न करणे, आपण अजून स्किनी दिसायला हवे याकडे असलेले अति प्रमाणात लक्ष देणे. वजन कमी दिसेल असे कपडे घालणे असं सागळ चालू होते. जेवणावरून अनुजाचे पूर्ण लक्ष उडून गेलेले. अनुजा जमेल त्या वेळात सतत व्यायाम करताना दिसायची यासगळ्याकडे आई-वडिलांचे लक्ष वेधले गेले. जरा खोदून खोदून विचारल्यावर असे लक्षात आले की, तिच्या आधीच्या वजनावरून तिच्या शाळेमध्ये तसेच कॉलेजमध्ये तिला सतत चिडवण्यात आला होतं. त्यामुळे पराकोटीची चिडचिड त्यानंतर डिप्रेशन, एकटेपणा या सगळ्यांनी तिला घेरून टाकलं होतं. बराच वेळा विचारल्यावरती कळलं की तिला लहानपणापासूनच तिच्या वजनावरती आणि शेप वरती लोक बोललेले होते. त्यामुळे आता चार लोकांमध्ये तरी माझी बॉडी ही आयडियल किंवा परफेक्ट असायला हवी, असं आनुजाला वाटायला लागलं . माझी किंमत हे मी कशी दिसेल ह्यावरच ठरेल असे ती म्हणायला लागली. हि सगळी eating disorder ची लक्षणं अनुजा मध्ये दिसायला लागली होती. या सगळ्या नादात खाणं नीट नसल्यामुळे तिच्यामध्ये अजिबात एनर्जी राहात नसे. त्यामुळे झोपही येत नसे. या disorder मुळे आनुजाने शरारीक बरोबरच स्वतःची मानसिक स्थिती खराब करून घेतली होती. Depression, Insomnia हे तर होतेच परंतु लो ब्लड प्रेशर, नखं निळसर रंगाची आणि तुटकी होण, हात आणि पाय सूज येणं, मासिक पाळी ची सायकल बिघडण. पिवळी व कोरडी पडलेली स्कीन आणि या सगळ्यात तिला आलेली चक्कर या सगळ्यांनी आई-वडिलांचे लक्ष खेचून घेतले. अनुजाचे आई वडील लगेच तिला dr. कडे घेऊन गेले. डॉक्टरांकडे गेल्यावर तीला कळले की तिला Anorexia झाला आहे. डॉक्टरांनी प्रायमरी औषध सुरू केले खरे परंतु या सगळ्याचं मूळ कुठेतरी मनावर झालेल्या परिणामांमध्ये होतं, आघातांमध्ये होतं, त्यामुळे मी बारीक दिसले तरच माझी किंमत होईल या थॉट प्रोसेस ला एलिमिनेट करण्यासाठी डॉक्टरांनी काउंसलिंग करायचे सुचवले. कौन्सिलिंग करताना बऱ्याच वेळा अनुजाला मागे फिरावे असे वाटले, जेवण सोडावसं वाटलं, मी जे करते आहे ते योग्य असेच सतत अनुजा म्हणत. Counselling अनुजाला कठीण व्हायला लागलं. dr नी तिच्या ईटिंग पॅटर्न वरती काम करायला सुरुवात केली. दीड ते दोन वर्षाच्या काउन्सलिंग नंतर अनुजा योग्य त्या पद्धतीने जेवण करायला लागली परंतु काही गोष्टी जसं की झोप न येणे आणि स्वतःला ओळखणं, स्वतःची किंमत ही बाहेरच्या फॅक्टर्स वर नसून आपण स्वतःकडे कसे बघतो या मध्ये आहे हे कौन्सिलिंग करण्यामध्ये बराच वेळ गेला आणि हळू हळू यामधून यामधून अनुजा सही सलामत बाहेर आलीच पण तिने हेल्दी लाइफ हॅबिट्स साठी ठिकठिकाणी या गोष्टींचा awareness देखील सुरू केला.
अश्या या सौम्य मनाच्या, आणि सजग दुर्गेला, अनुजाला नवरात्री च्या तिसऱ्या माळी मनःपूर्वक अभिवादन.
मन आणि महिला हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या मला भासतात.
महिला ही टोकाची हळव्या मनाची पण असू शकते आणि टोकाची कणखर मनाची पण असू शकते.
पण महिलेच्या मनाकडे आपण किती लक्ष देतो, महिला तरी स्वतः कडे किती लक्ष देतात ?
चला या नवरात्रोत्सवात आपण महिलेच्या या मनाचा जागर करूयात…मानसिक व्याधींवर ,व्यंगांवर अथवा अपंगत्वावर मात केलेल्या आणि आपले आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचे आयुष्य सुरळीत पणे मार्गक्रमण करणाऱ्या महिलांना जाणून घेऊया..
अनेकदा स्त्री यशस्वी झाली की कौतुक करणारे काही असतात. शारीरिक अपंगत्वावर, व्यंगावर, व्याधी वर मात करून यशस्वी, नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या स्त्रियांचे समाजात कौतुक केले जाते. त्या वेगळे आयुष्य जगतात असे बोलले जाते (त्या Adverse Conditions var मात करून आयुष्य सुरळीत जगत असतातच, जे अजिबात सोपे नसते), त्यांना समाजात मानाचे स्थानही दिले जाते.
परंतु मानसिक आजारांवर, व्याधींवर मात करून यशस्वी झालेल्या, नॉर्मल आयुष्य तेवढ्याच ताकदीने पेलणाऱ्या महिलांना कोठेही फारसे Consider केले जात नाही. कौतुक करणे तर दूरच राहते. बऱ्याचदा कारणे अनेक असतात. आपल्याला मानसिक आजार झाला होता (जरी त्यातून पूर्णपणे बरे झालो असलो तरी) हे लोकांना सांगणे त्यांना योग्य वाटत नाही. दडपण येते. लोक वेडे म्हणतील अशी अनाठायी भीती असते. लोकांसमोर यायला घाबरत असतात. ती व्यक्ती तयार झाली तरी त्याचे कुटुंबीय तयार होत नसतात. या सगळ्या मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी, अश्या रोल मॉडेल लोकांसमोर ठेवण्याचे आम्ही ठरवले. जेणेकरून असे मांनसिक आजार झाले तरी त्यावर यशस्वीपणे मात करून नॉर्मल आयुष्य जगता येते, हे ठळकपणे दाखवून द्यायचे आहे. या महिलांचा, मानसिक आजाराने त्रस्त असणाऱ्या तसेच इतरही महिलांना, आदर्श घालून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
रोज ९ दिवस आम्ही एक एक देवी आणि तिचे कौशल्य बरोबर एक मानसिक आजारावर मात केलेली महिला…आधुनिक दुर्गा आपल्यासमोर आणायचा प्रयत्न करणार आहोत.
आपणही जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना या पोस्ट ला Tag करून, ही पोस्ट शेअर करून जास्तीत जास्ती समाजापर्यंत ही कल्पना पोहोचवावी ही विनंती.
स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या , खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या या मानसिकतेचा 9 Poweful “Myndful Mantras” चा आपण जागर करू.
नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!
श्रेया कुलकर्णी जोशी
Founder Myndful Mantras
Clinical Psychologist
REBT Practitioner