सहावी माळ : षष्टी
देवी : कात्यायनी
कौशल्य: प्रतिकार, असुर विनाशनी

आजची महिला: जागृती, यशस्वी लढा : चुकीच्या निदानाशी.
“लोक काय म्हणतील” ह्या Stigma विरुद्ध लढा..

अस म्हणतात घरातील वातावरण , विचारसरणी , संस्कार, रितीभाती, आपला समाज , परिस्थिती या सगळ्या घटकांचा आपल्या जडणघडणीवर खूप प्रभाव पडत असतो. तसाच जागृतीवर पण पडला. लहानपणापासून जागृती खूप हुशार व मेहनती मुलगी होती. आई वडील हे जुन्या विचार सरणीचे होते. आई- वडिलांची प्रबळ इच्छा होती की जागृतीने डॉक्टर व्हावे. परंतु घरात आई वडिलांची सतत भांडणं होत असत . त्यामुळे घरातलं वातावरण चांगल नसायचं आणि त्यातून जागृतीला फक्त अभ्यासातच लक्ष घाल अशी ताकीद देण्यात येत असे. मात्र जागृतीला अभ्यासाचा प्रचंड कंटाळा येऊ लागला परिणामी दहावीमध्ये मेरिटलिस्ट चुकली , ह्याचा जागृतीला खूपच त्रास झाला. नैराश्य आल्यासारखे झाले. तरीपण डॉक्टर व्हायची बळकट इच्छा असल्यामुळे पुण्यातील सुप्रसिद्ध कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे गेल्यावर काही दिवस बरे गेले पण जागृती मैत्रिणींशी व्यवस्थित बोलू शकत नव्हती, स्वतःचे व्यवहार करण्यात अडचणी जाणवू लागल्या, लोकांमध्येही मिसळणे नकोसे होऊ लागले. शरीरात आणि मनात बरेच चेन्जेस जाणवू लागले. एकदा कॉलेजमध्ये ह्या सगळ्याचा खूप त्रास झाल्याने जागृती डॉक्टर कडे गेली आणि डॉक्टर ने स्किझोफ्रेनियासारखी लक्षणे वाटल्याने ऍडमिटही करून घेतले. घरातल्या समस्या बाहेर सांगू नयेत याची इतकी काळजी घेतली जायची की डॉक्टरांना पण जागृतीचे आई वडील खरे सांगत नसत. लोक काय म्हणतील हा ” स्टिग्मा ” त्यांच्या मुलीला अजून त्रासात ढकलू शकतो या विचारांच्या पलीकडचा होता. त्यामुळे त्यांच्या सतत होणाऱ्या भांडणाचा जागृतीला खूप त्रास होतो हे त्यांनी कधीच कबूल केले नाही आणि जागृतीने सत्यस्थिती सांगितली तरी त्यांनी वस्तूस्थिती नाकारल्यामुळे डॉक्टरांना तिचे बोलणे असत्यच वाटत गेले. परिणामी आजाराचे चुकीचे निदान झाले व जागृतीला स्किझोफ्रेनिया आहे असे निदान करून औषधोपचार सुरू झाले.
अभ्यास चालू असतांना जागृतीने स्वतःच लग्न ठरवलं खर पण या आजाराचा गैरफायदा घेऊन तिचा divorce झाला. अशा दूषित विचारांच्या गोंधळात पंधरा-वीस वर्षांचा काळ निघून गेला . या आजाराला नेमका तोड मिळाला तो जागृतीच्या आईच्या मृत्यूनंतर . ती गेल्यावर जागृतीच्या अंगावर जबाबदाऱ्या पडल्या त्या तिने खूप चांगल्या पद्धतीने पार पडल्या. दिनचर्या सावरू लागली व गोष्टी सुरळीतपणे सुरू झाल्या. जागृतीला बर्याच वेळेस आपण Schizophrenic नाही हे जाणवायचं. आणि जागृतीने परत डॉक्टर कडे जायचं ठरवलं. . त्याच सुमारास एकलव्य स्वमदत गटाची माहिती मिळाली. ह्या मध्ये आजारात खचलेल्या लोकांना परत उभी राहण्याची नवी उमेद मिळते अस जागृती म्हणते. आजाराविषयीचा Awareness आणि Acceptance ह्या दोन गोष्टींवर इथे खूप चांगल्या प्रकारे काम केले जाते. चर्चा सत्र होतात. गटात जागृती नियमितपणे हजर राहते. जागृती हि डॉक्टर आहे. आताच्या निदानामुळे व या गटामुळे जागृती खूपच सावरलेली आहे.
ह्या सगळ्या अयोग्य परिस्थितीचा प्रतिकार करण्याचे धाडस केल्यामुळेच आज जागृती या विळख्यातून बाहेर पडू शकली . डॉक्टरांना चुकीची माहिती देणे. योग्य डॉक्टर न निवडणे. लोकांना काय वाटेल म्हणून त्यावर उपचाराला देखील न जाणे या गोष्टींमुळे आयुष्य उधवस्त होतांना आम्ही बघितलित. त्यामुळे जागे व्हा. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. बोलून प्रोब्लेम Solve होतात. त्यामुळे बोलते व्हा. आज जागृती खूप आनंदी आहे व तिच्या डॉक्टरकीच्या प्रोफेशनमध्येही चांगली प्रगती करत आहे. एक जबाबदार डॉक्टर म्हणून कार्यरत आहे.

अशा डोळ्यांना न दिसणाऱ्या असुरांचा प्रतिकार करणाऱ्या असुर विनाशिनीला , जागृतीला नवरात्रीच्या या सहाव्या माळी मनःपूर्वक अभिवादन.

संकल्पना:
“नवदुर्गा – Women Who Fought against Mental Disabilities/Disorders”

मन आणि महिला हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या मला भासतात.
महिला ही टोकाची हळव्या मनाची पण असू शकते आणि टोकाची कणखर मनाची पण असू शकते.
पण महिलेच्या मनाकडे आपण किती लक्ष देतो, महिला तरी स्वतः कडे किती लक्ष देतात ?
चला या नवरात्रोत्सवात आपण महिलेच्या या मनाचा जागर करूयात…मानसिक व्याधींवर ,व्यंगांवर अथवा अपंगत्वावर मात केलेल्या आणि आपले आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचे आयुष्य सुरळीत पणे मार्गक्रमण करणाऱ्या महिलांना जाणून घेऊया..
अनेकदा स्त्री यशस्वी झाली की कौतुक करणारे काही असतात. शारीरिक अपंगत्वावर, व्यंगावर, व्याधी वर मात करून यशस्वी, नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या स्त्रियांचे समाजात कौतुक केले जाते. त्या वेगळे आयुष्य जगतात असे बोलले जाते (त्या Adverse Conditions var मात करून आयुष्य सुरळीत जगत असतातच, जे अजिबात सोपे नसते), त्यांना समाजात मानाचे स्थानही दिले जाते.
परंतु मानसिक आजारांवर, व्याधींवर मात करून यशस्वी झालेल्या, नॉर्मल आयुष्य तेवढ्याच ताकदीने पेलणाऱ्या महिलांना कोठेही फारसे Consider केले जात नाही. कौतुक करणे तर दूरच राहते. बऱ्याचदा कारणे अनेक असतात. आपल्याला मानसिक आजार झाला होता (जरी त्यातून पूर्णपणे बरे झालो असलो तरी) हे लोकांना सांगणे त्यांना योग्य वाटत नाही. दडपण येते. लोक वेडे म्हणतील अशी अनाठायी भीती असते. लोकांसमोर यायला घाबरत असतात. ती व्यक्ती तयार झाली तरी त्याचे कुटुंबीय तयार होत नसतात. या सगळ्या मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी, अश्या रोल मॉडेल लोकांसमोर ठेवण्याचे आम्ही ठरवले. जेणेकरून असे मांनसिक आजार झाले तरी त्यावर यशस्वीपणे मात करून नॉर्मल आयुष्य जगता येते, हे ठळकपणे दाखवून द्यायचे आहे. या महिलांचा, मानसिक आजाराने त्रस्त असणाऱ्या तसेच इतरही महिलांना, आदर्श घालून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

रोज ९ दिवस आम्ही एक एक देवी आणि तिचे कौशल्य बरोबर एक मानसिक आजारावर मात केलेली महिला…आधुनिक दुर्गा आपल्यासमोर आणायचा प्रयत्न करणार आहोत.
आपणही जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना या पोस्ट ला Tag करून, ही पोस्ट शेअर करून जास्तीत जास्ती समाजापर्यंत ही कल्पना पोहोचवावी ही विनंती.

स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या , खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या या मानसिकतेचा 9 Powerful “Myndful Mantras” चा आपण जागर करू.

नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!

श्रेया कुलकर्णी जोशी

Founder Myndful Mantras
Clinical Psychologist
REBT Practitioner