तिसरी माळ: देवी चंद्रघंटा
कौशल्य – शांतता, सौम्यता, सजगता
आजची दुर्गा: सौ. नयना विनय समहस्त्रबुद्धे

प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या हक्कांबाबत जागरुकता असली पाहिजे, तिचं तिच्या हक्कांबाबतचं भान हेच तिला समाजात स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरता मिळवून देऊ शकतं असे म्हणणारी आजची आपली तिसरी दुर्गा नयनाताई.

शारदीय नवरात्रौत्सवात माईडफुल मंत्राज जागर करीत आहे अशा नऊ महिलांचा ज्यांच्या तिमिरातून तेजाकडे जाण्याच्या प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळते आहे, आणि यापुढे देखील मिळत राहील. आजच्या डिजिटल विश्वात आपण अशा महिलांचा जागर करणार आहोत ज्यांनी खऱ्या अर्थाने देवीच्या गुणांना अंगिभूत केले आहे. अशा महिला ज्यांनी नवदुर्गांचा अंश आमच्यातही आहे असं म्हणत संकटांवर मात केली आहे आणि आज त्या दिमाखात इतरांना संकट काळात लढण्याची प्रेरणा देत आहेत.

प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या हक्कांबाबत जागरूकता असली पाहिजे, तिचं तिच्या हक्कांबाबतचं भान हेच तिला समाजात स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरता मिळवून देऊ शकतं असं म्हणणारी आजची आपली तिसरी दुर्गा म्हणजेच देवी चंद्रघंटेच्या शांतता, संयमता आणि सजगता गुणांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका, समाजसेविका, निवृत्त बँक अधिकारी नयना सहस्त्रबुद्धे.

भारतीय परंपरा, विचारधारा यांचा पुरस्कार करणाऱ्या कर्तृत्ववान भारतीय स्त्री चे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नयनाताई. नयनाताईंनी स्त्रीशक्ती आणि महिलांचे हक्कसंबंधी १०० हून अधिक विषयांवर लेखन केले आहे.

इंग्रजी आणि अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेमार्फत व इतर संस्थांमार्फत त्यांनी समाजातील विविध विषयांवर काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी स्त्रीयांच्या हक्कांविषयी आणि स्त्रीयांमध्ये आत्मभान निर्माण करण्याची अत्यंत गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि स्त्रीयांमध्ये आत्मभान निर्माण करण्यासाठी समाजातील तळागाळापर्यंत काम करण्याचा निश्चय केला.
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर पर्यंत प्रवास, भारतीय स्त्री शक्ती संस्थेच्या जनरल सेक्रेटरी (२०११-१४), अखिल भारतीय अध्यक्षा, तसेच आता उपाध्यक्ष अश्या विविध जबाबदाऱ्या मधून कार्यरत. महिलांविषयीचे राष्ट्रीय धोरण ठरविणाऱ्या २०१६ च्या समितीत सदस्या, सरोगसी या महिलांविषयीच्या कायद्यात दुरुस्ती करणाऱ्या समितीत सदस्या, ब्लॉग लेखिका अशा एक ना अनेक जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे निभावताना नयनाताई एक आई, पत्नी आणि कौटुंबिक स्त्री आहेत हे कधीच विसरल्या नाहीत. घरच्या जबाबदाऱ्या देखील त्यांनी तितक्याच शांततेने आणि सजगतेने सांभाळल्या.
External Advisory Committee of National Commission for Women या समितीवर नयना सहस्त्रबुद्धे यांची २०२२-२४ या कालावधीसाठी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मी नगरसेविका आणि “Indian Perspective on Women” या पुस्तकांचे सहसंपादन असो वा “स्त्रीभान” या पुस्तकाचे लेखन असो त्यांचा स्त्रीयांविषयींच्या कायद्यांचा, हक्कांचा अभ्यास आपल्यासमोर येतो. म्हणूनच समाजातील विविध संस्थांनी दखल घेत त्यांच्या ‘स्त्रीभान’ या पुस्तकाला विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.


स्त्रीयांचे हक्क आणि आत्मनिर्भरता या विषयांवर सखोल काम करीत चंद्रघंटा देवीच्या शांतता, सौम्यता, सजगता या गुणांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या नवदुर्गेला माईंडफुल मंत्राजतर्फे मानाचा मुजरा.

चंद्रघंटा श्लोक :
पिण्डजप्रवरारूढ़ा चण्डकोपास्त्रकैर्युता ।
प्रसीदं तनुते महयं चन्द्रघण्टेति विश्रुता ॥

रोज ९ दिवस आम्ही एक एक देवी आणि तिचे कौशल्य बरोबर नऊ महिलांचा ज्यांच्या तिमिरातून तेजाकडे जाण्याच्या प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळते आहे, आणि यापुढे देखील मिळत राहील अश्या महिला- आधुनिक दुर्गा आपल्यासमोर आणायचा प्रयत्न करणार आहोत.

आपणही जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना या पोस्ट ला Tag करून, ही पोस्ट शेअर करून जास्तीत जास्ती समाजापर्यंत ही कल्पना पोहोचवावी ही विनंती.

स्त्रीच्या प्रगतीत सहाय्यक ठरणाऱ्या , खरेतर तिला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवणाऱ्या मानसिकतेचा, Poweful “Myndful Mantras” चा आपण या नवरात्रीत जागर करू.

या वर्षीच्या इतर नवदुर्गांविषयी माहिती वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा –
पहिली माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga23Day1
दुसरी माळ – https://bit.ly/MyndfulNavdurga2023Day2

नवशक्तीचा – नवरात्रोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!

श्रेया कुलकर्णी
Founder Myndful Mantras
Clinical Psychologist
REBT Practitioner