प्रतिपदा: देवी शैलपुत्री
आजच्या दुर्गा डॉ. शुभा थत्ते

मानसशास्त्रातील नवदुर्गा
आजच्या दुर्गा डॉ. शुभा थत्ते
नवरात्र म्हणजे जागर शक्तीचा, शक्ती उपासनेचा…
चला या नवरात्रीत जाणून घेऊया मन:शक्ती ची उपासना करणाऱ्या, मन:शक्ती चा जागर करणाऱ्या “मानसशास्त्रातील नवदुर्गा”
आजच्या दुर्गा आहेत मानसशास्त्रातील आदरणीय ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व डॉ. शुभा थत्ते..वयाच्या 83 व्या वर्षी देखील तरुणांना लाजवेल असा मन:शक्ती जागराचा धडाका लावलेला आहे. ज्या काळी सायकॉलॉजी हा विषय घेणं म्हणजे वेड्यांबरोबर काम करणं हे समजलं जायचं अश्या काळी त्यांनी सायकॉलॉजी मध्ये शिक्षण घ्यायला सुरुवात केली.
मुंबई युनिवर्सिटी मधून डॉक्टरेट पदवी घेऊन , KEM Hospital, NIMHANS यासारख्या मोठ्या ठिकाणी आपली कामाची कारकीर्द सुरु केली. मा. किशोर फडके या सारख्या प्रसिद्ध Psychologist कडून आणि New York येथून Rational Emotive Behaviour Therapy (REBT) या जगप्रसिद्ध थेरपी चे प्रशिक्षण घेतले आणि अनेकांना दिले आणि अजूनही देत आहेत.
त्यांचे निरीक्षण , अनुभव आणि बुद्धिमत्ता यांच्या जोरावर Seth G.S. Medical College and K.E.M. Hospital, P. D. Hinduja Hospital अशा अनेक संस्थाना शुभा थत्ते या जोडल्या गेल्या.
१९९० साली , आनंद नाडकर्णी यांच्या समवेत Institute for Psychological Health (IPH) या संस्थेची स्थापना केली , सुदृढ मन सर्वांसाठी या घोषवाक्या सोबत विविध लोकांच्या मानसिक आरोग्यासाठी काम करायला सुरुवात केली. शुभा मॅडम सांगत होत्या, त्याकाळी मानधन देऊन Mental Health बद्दल बोलायला कोणीही तयार नसे. परंतु मेंटल हेंल्थ अवेअरनेस साठी शुभा थत्ते आणि आनंद नाडकर्णी हे “अंतरंगात डोकावताना आणि मनाचे इंद्रधनुष्य” असे निशुल्क सत्र ठिकठिकाणी जाऊन करायचे. तेव्हा कुठे संस्था मोठी व्हायला लागली. काम करतांना त्यांना प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे भारतात सहज अशा Psychometric Test न मिळणं. महाराष्ट्रात, किंबहुना देशातही नसेल, अशा विविध Psychometric test परदेशांतून जमवणे आणि इकडे introduce करणे, implement करणे हे भारतीयांसाठी मानसिक आजारांवर लढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे काम त्यांनी केले. WISC -IV (intelligence test) या टेस्टच्या standardisation साठी data collection चे काम देखील शुभा मॅडम ने केले आहे.
फक्त IPH नाही तर डोंबिवली मधील अस्तित्व, नाशिक मधील आशा निकेतन, ठाण्यातील विश्वास, आणि पुण्यातील स्वानंद या मानसिक आरोग्यासाठी चालवल्या जाणाऱ्या संस्था सुरु करण्यात शुभा मॅम चा मोलाचा वाटा आहे.
युनिवर्सिटी, कॉलेजेस, हॉस्पिटल्स अनेक प्रतिथयश संस्थांमध्ये Anger Management , Parenting , Stress Management , REBT for practicing counsellors , Assertiveness, Psychology, Psychological Disorders, Mental Health अश्या असंख्य विषयांवर त्या व्याख्याने, मार्गदर्शन, चर्चासत्र सातत्याने करत असतात.
“Reliance group ची POSH कमिटी” , तसेच “जेष्ठांसाठी असलेले Neuropsychological Nurturance centre सप्तसोपान” , “ Ethicos , Independent Ethics Committee for evaluation of drug trials” अशा नाजूक विषयात देखील शुभा मॅम काम करत आहेत.
मैत्र मनाचे 2018, Best Scientific Paper, Woman of the year अशा अनेक पुरस्कारांनी शुभा थत्ते यांना सन्मानित केलेलं आहे.
माझ्या सारखे Psychology विषयांत काम करत असण्यार्ऱ्यांना शुभा मॅडम च्या कामाने भारावून जायला होतं आणि नवी उर्जा मिळते. या साठी आम्ही तुमचे आयुष्यभर ऋणी आहोत.
माईंडफुल मंत्रास आणि माझ्या तर्फे तुमच्या कार्याला आणि तुम्हाला मनापासून सलाम!
या नवरात्रीत जाणून घेऊया मन:शक्ती ची उपासना करणाऱ्या, मन:शक्ती चा जागर करणाऱ्या “मानसशास्त्रातील नवदुर्गा”
या पोस्ट ला आणि आमच्या सोशल मीडिया channels ला Like, Follow आणि Subscribe नक्की करा… जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा.
श्रेया कुलकर्णी
Founder Myndful Mantras
Clinical Psychologist
Mindset Trainer