द्वितीया : देवी ब्रह्मचारिणी
आजच्या दुर्गा डॉ. योगिता आपटे
मानसशास्त्रातील नवदुर्गा
नवरात्र म्हणजे जागर शक्तीचा, शक्ती उपासनेचा…
चला या नवरात्रीत जाणून घेऊया मन:शक्ती ची उपासना करणाऱ्या, मन:शक्ती चा जागर करणाऱ्या “मानसशास्त्रातील नवदुर्गा”
आजच्या आपल्या दुर्गा आहेत डॉक्टर योगिता आपटे अत्यंत कमी वयात खूप मोठा अनुभव गाठीशी असणाऱ्या एकाच अटेम्प्ट मध्ये नेट सेट जीआरएफ करणाऱ्या अतिशय बुद्धिमान मानसोपचार तज्ञ.
माणूस जसा आहे तसा का वागतो हा प्रश्न पडत असल्यामुळे सायकॉलॉजी मध्ये ऍडमिशन घेण्याचे त्यांनी ठरवले.. एका फटक्यात सेट नेट कम्प्लीट करून स्कॉलरशिप वरती पीएचडी करायला त्यांनी सुरूवात केली. त्यांचा पीएचडीचा मेजर वेरिएबल होता रेझिलीयन्स आणि पीएचडी करत असतानाच त्यांच्यातील रेझिलीयन्सची, चिकाटीची परीक्षा देवाने पुरेपूर घेतली , त्या परीक्षेच्या यशस्वीपणे उत्तीर्णही झाल्या.
पीएचडी करत असतानाच त्यांचा खूप मोठा कार एक्सीडेंट झाला त्या त्यात अतिशय गंभीर रित्या जखमी झाल्या त्यांच्या जवळपास प्राणावरच बेतलं होत. त्यांचे वडील तर एक्सीडेंट मध्ये दगावले देखील पण त्यांनी धीर नाही सोडला , चिकाटी नाही सोडली. या संकटावर मात करण्याचा निश्चय मनाशी पक्का केला आणि मात केली. आणि यातूनच इतर लोकांना हील करण्यासाठी परत सज्ज झाल्या.
माईंड मॅटर्स (Mind Matters) या नावाने स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली या माध्यमातून अनेक मेंटली स्ट्रेस लोकांना चांगलं जीवन जगण्याचा मार्ग यांनी दाखवला. Marital Relationship, Anxiety, OCD, Depression, Low Confidence, Fear अशा अनेक विषयात अनेक सक्सेस स्टोरी त्यांनी उभ्या केल्या आहेत. त्यांचं काम बघून मुंबई हायकोर्ट ने त्यांनी apply केलेला नसताना देखील मॅरिटल कौन्सिलर म्हणून त्यांना recognise केलं , त्यांचं कौतुक केलं. आणि मुंबई हायकोर्ट ने marital counsellor म्हणुन त्यांना appoint केल.
त्या स्वतः सर्टिफाइड इक्यू ट्रेनर आहेत. माझ्या स्वतःच्या आयुष्यात त्यांचे अनन्य साधारण महत्त्व आहे. नाशिकला एचपीटी कॉलेजला मी शिकत असताना त्या माझ्या शिक्षिका होत्या. सायकॉलॉजी ची आवड मला निर्माण करणाऱ्या काही लोकांमधील त्या एक अतिशय उत्तम प्राध्यापिका, खूप जणांना त्यांनी खऱ्या अर्थाने सायकॉलॉजिस्ट म्हणून घडवलं. आजही त्या आनंद निकेतन इथे संलग्न आहेत.
माईंड टूर(Mind Tour) सारख्या अभिनव उपक्रम त्या राबवतात आणि लोकांचा त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो.
लीडिंग बाय एक्झाम्पल या उप्तीप्रमाणे आदर्शवत वाटचाल मानसशास्त्र या विषयात करत असताना अनेकांना घडवणाऱ्या या मानसशास्त्रातील दुर्गेला माईंड फुल मंत्राज आणि माझ्या कडून मनोभावे अभिवादन.
चला या नवरात्रीत जाणून घेऊया मन:शक्ती ची उपासना करणाऱ्या, मन:शक्ती चा जागर करणाऱ्या “मानसशास्त्रातील नवदुर्गा”
या पोस्ट ला आणि आमच्या सोशल मीडिया channels ला Like, Follow आणि Subscribe नक्की करा… जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा.
श्रेया कुलकर्णी
Founder Myndful Mantras
Clinical Psychologist
Mindset Trainer