तृतीया : देवी चंद्रघंटा
आजच्या दुर्गा : रिद्धी दोशी पटेल
मानसशास्त्रातील नवदुर्गा
नवरात्र म्हणजे जागर शक्तीचा, शक्ती उपासनेचा…
चला या नवरात्रीत जाणून घेऊया मन:शक्ती ची उपासना करणाऱ्या, मन:शक्ती चा जागर करणाऱ्या “मानसशास्त्रातील नवदुर्गा”
समाज नीट राहायचा असेल तर प्रत्येक कुटुंब नीट असावे लागते, ते आनंदी असावे लागते. त्यात महिलांचे योगदान खूप मोठे असते. त्या घर जोडून ठेवतात, घराचे घरपण एक प्रकारे सांभाळतात. अश्या महिलांचे मानसिक स्वास्थ्य त्यांचे सक्षमीकरण, त्यांची सर्वतोपरी उन्नती यासाठी ज्या काम करतात तसेच महिला सगळ्यात जास्ती कुटुंबात काळजी करत असलेला घटक म्हणजे त्यांचे मुल, त्या मुलांचे संगोपन, त्याची वाढ त्याचे मानसिक स्वास्थ्य यासाठी प्रामुख्याने अत्यंत जिकरिने ज्या काम करत असतात अश्या बहुआयामी, बहुगुणी आणि Parenting या विषयावर जागृती करणाऱ्या आजच्या नवदुर्गा “रिद्धी दोशी पटेल” या एक चाईल्ड सायकॉलॉजिस्ट आणि पेरेंटिंग काउंसलर आहेत. तसेच त्यांना 3 वेळेस TEDx या प्लॅटफॉर्म वरती स्पीकर म्हणून बोलवण्यात आले आहे. त्या विविध १६ TED ED Clubs क्लब मध्ये अडवायझर म्हणून काम बघतात.
भारतात नव्याने लागू होणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) संदर्भात सूचना , सुधारणा प्रस्ताव यावर सर्वप्रथम Online Roundtable Conference आयोजित करण्याचे आणि त्यातून आलेल्या सूचनांचे संकलन करून त्याचा प्रस्ताव शिक्षण मंत्रालयाकडे पाठवण्याचे श्रेय रिद्धी मॅडम ना जाते.
मुलांवरती काम करायचं म्हणजे संवेदनशीलता खूप महत्त्वाची. रिद्धी या अत्यंत संवेदनशील सौम्य नम्र आहेत. पालक आणि मुलांमधला संवाद सुधारून त्यांची सर्वांगीण विकास (Holistic Growth) कशी होईल याकडे त्यांचे लक्ष असते.
मुलांशी बोलताना त्यांच्या मनातले ट्रॉमा कसे अलगद बाहेर काढून त्यांच्यावर काम केलं पाहिजे हा रिद्धीचा हातखंडा. रिद्धी या एक ट्रेनर असल्यामुळे त्या सातत्याने मेंटल हेल्थ अवेअरनेस चा प्रचार आणि प्रसार करत असतात. वुमन एम्पॉवरमेंट, डेव्हलपमेंट ग्रोथ या विषयावर देखील रिद्धी यांचं काम वाखाण्याजोग आहे. रिद्धी दोशी यांनी महिलांवरती काम करणं किती गरजेचं आहे हे लक्षात घेऊन महिलांकरिता “लजा” नावाच्या संस्थेची सुरुवात केली आणि हा भारतातला पहिला फोरम सुरू केला जिथे महिला स्व सक्षमीकरण आणि उन्नती वरती प्रामुख्याने काम केलं जातं. “लजा” चे असे सहा चाप्टर भारतभरात त्यांनी उभे केले आहेत आणि महिलांसाठी लजाच्या माध्यमातून शहरी तसेच ग्रामीण भागातही त्या प्रभावीपणे काम करतात.
विविध ठिकाणी जाऊन विविध संस्थांमध्ये जाऊन NGO’s मध्ये जाऊन रिद्धी या त्यांचे ट्रेनिंग्स प्रोग्राम्स कंडक्ट करत असतात.
रिद्धी दोशी यांना National Award, Young Entrepreneur, Innovative Mental Health Practitioner, Rex Karmaveer Chakra Award, Nation Builder Award असे अनेक नामांकित Awards, Recognitions मिळालेले आहेत.
मुलांबरोबर मूल होऊन काम करताना तुमच्या या उत्साहाला आणि डेडिकेशनला माईंड फुल मंत्रास आणि माझा मानाचा मुजरा
चला या नवरात्रीत जाणून घेऊया मन:शक्ती ची उपासना करणाऱ्या, मन:शक्ती चा जागर करणाऱ्या “मानसशास्त्रातील नवदुर्गा”
या पोस्ट ला आणि आमच्या सोशल मीडिया channels ला Like, Follow आणि Subscribe नक्की करा… जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा.
श्रेया कुलकर्णी
Founder Myndful Mantras
Clinical Psychologist
Mindset Trainer