सप्तमी : देवी कालरात्री
आजच्या दुर्गा डॉ. पूजा ठक्कर
नवरात्र म्हणजे जागर शक्तीचा, शक्ती उपासनेचा…
चला या नवरात्रीत जाणून घेऊया मन:शक्ती ची उपासना करणाऱ्या, मन:शक्ती चा जागर करणाऱ्या “मानसशास्त्रातील नवदुर्गा”
कोणावर कुठलाही चुकीचा शिक्का बसू नये – Label लागू नये असे आपल्याला नेहमीच वाटते. आणि तो शिक्का आपल्या देशाचे भविष्य असणाऱ्या लहान मुलांना तर नक्कीच नको लागायला. काही मुलं Slow Learners असतात. एकूण आपल्या शैक्षणिक पद्धती मध्ये समाजाच्या गती मध्ये ते मागे पडत जातात. अश्या मुलांसाठी प्रामुख्याने काम करणाऱ्या, त्यांना मुळ प्रवाहाशी जमवून घेण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नांना बळकटी देणाचे मोलाचे काम करणाऱ्या आजच्या नवदुर्गा आहेत डॉ पूजा ठक्कर.
मुलांसाठी Aptitude Tests च्या माध्यमातून त्या मार्गदर्शन करतात. महिलांसाठी, त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी देखील त्या विशेष कार्यक्रम राबवतात. पालक आणि शिक्षकांसाठी त्या कार्यशाळा घेतात.
डॉ. पूजा ठक्कर ह्यांनी एज्यूकेशन सायकोलॉजी ह्या मध्ये मास्टर्स डिग्री घेतली असून, Personal Counselling मध्ये डिप्लोमा केलेला असून. त्यांनी PhD केली असून त्या RCI (Rehabilitation Council of India) मध्ये रजिस्टर्ड आहेत.
डॉ. पूजा ह्यांना मेंटल हेल्थ क्षेत्रामध्ये जवळपास ३५ वर्षांचा अनुभव आहे. त्या अनुभवाचा उपयोग समाजाला मानसिक आरोग्य नीट राखण्यासाठी कसा होईल या विषयी त्या प्रचार, प्रसार करत असतात.
डॉ. पूजा ह्या IGNOU मध्ये external Examiner, Academic Counsellor म्हणून काम बघतात. ‘Institute for Psychological Health’ (I.P.H.) मध्ये त्या Consultant Psychologist म्हणून काम पाहतात. ‘Slow Learners’ साठी “गती” म्हणून कार्यशाळा घेतली आहे तसेच “बहार” नावाने महिलांसाठी Personality development / Stress Management चे देखील वर्कशॉप घेतात.
गती आणि बहार नावाने त्यांचे पेपर पण पब्लिश झालेले आहेत. जे या विषयात काम करणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत.
स्वीडीश मुलांबरोबर Mental Health workshop घेतले आहेत. मुलांबरोबर, त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर काम करतांना. शिक्षण व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक शिक्षक यांसाठी सुद्धा पूजा मॅडम ने महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्या अनुषंगाने “शिक्षण प्रबोधिनी” ह्या नावाने त्यांनी शिक्षकांसाठी घेतलेला प्रोजेक्ट हा खूप महत्वाचा आहे.
Holy Cross Convent Special School मध्ये त्या Counsellor तर आहेतच, त्यांचा Career Training Centre चा अभ्यासक्रम पण तयार केला आहे. K. C. Gandhi High School, Mumbai., ‘Institute for Exceptional Children’ (I.E.C.) a Child Guidance Clinic आणि Manav Neuro Psychiatric Hospital, Mumbai. या ठिकाणी Consultant Psychologist म्हणून काम पाहतात.
UNICEF प्रायोजित प्रकल्पांमध्ये त्यांनी पर्यवेक्षक (supervisor) म्हणून काम बघितले आहे. विविध विद्यापिठामध्ये त्या Visiting faculty तसेच Coordinator म्हणून जात असतात.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी चालणाऱ्या शाळांमध्येही मॅडम ने कार्यशाळा/ tests घेऊन योगदान दिले आहे. त्यातून समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी काम करण्याची त्यांची तळमळ दिसून येते.
डॉ. पूजा ह्यांनी IPH च्या मदतीने , मुंबई , जळगाव , नाशिक, संभाजी नगर या शहरातील शाळांमध्ये Aptitude Tests घेतल्या आहेत, तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी ‘Learning Disabilities’, ‘ADHD’ & ‘Autism Spectrum Disorder’ या साठी Screening Module तयार केले. Maharashtra Knowledge Corporation Limited (MKCL) मधल्या 9th & 10th च्या विद्यार्थ्यांसाठी Online Aptitude/Career Guidance Test घेतल्या.
IQ Testing, Aptitude Testing, Personality Testing, Learning Difficulties, A.D.H.D., Intellectually Impaired & Autism या विषयात त्या काम करतातच त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे Counseling , ट्रेनिंग त्या सातत्याने घेत असतात.
मानसोपचार, मानसिक स्वास्थ्य या बद्दल जनजागरण करणाऱ्या, अनेकांना Therapy द्वारे मदतीचा हात देणाऱ्या आणि विशेषत: लहान मुलांच्यावर लक्ष केंद्रित करून समाजाला योगदान देणाऱ्या आजच्या दुर्गेला, डॉ पूजा ठक्कर यांना मन:पूर्वक अभिवादन!
चला या नवरात्रीत जाणून घेऊया मन:शक्ती ची उपासना करणाऱ्या, मन:शक्ती चा जागर करणाऱ्या “मानसशास्त्रातील नवदुर्गा”
या पोस्टला आणि आमच्या सोशल मीडिया channels ला Like, Follow आणि Subscribe नक्की करा… जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा.
श्रेया कुलकर्णी
Founder Myndful Mantras
Clinical Psychologist
Mindset Trainer