नवमी : देवी सिद्धदात्री
आजच्या दुर्गा डॉ. शिरीषा साठे
नवरात्र म्हणजे जागर शक्तीचा, शक्ती उपासनेचा…
चला या नवरात्रीत जाणून घेऊया मन:शक्ती ची उपासना करणाऱ्या, मन:शक्ती चा जागर करणाऱ्या “मानसशास्त्रातील नवदुर्गा”
मानसशास्त्र सारखा विषय, मेंटल हेल्थ विषय जो आपल्याकडून बऱ्याचदा दुर्लक्षित केला जातो. तो विषय अगदी सर्वसामान्यांना समजेल अश्या भाषेत सांगणे ही कला आत्मसात असलेल्या. अत्यंत गहन विषयांना, Terminologies ना सामन्यांच्या भाषेत आणि आजूबाजूला असणाऱ्या उदाहरणांच्या साहाय्याने समजावून सांगणाऱ्या, सखोल अभ्यास असणाऱ्या आणि प्रचंड अनुभव गाठीशी असणाऱ्या आजच्या आपल्या दुर्गा आहेत सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ शिरीषा साठे.
शिरीषा साठे यांनी बी ए एम एस केलेले असून त्यांनी क्लिनिकल सायकॉलॉजी मध्ये मास्टर डिग्री घेतलेली आहे. आपल्या आयुष्यात कोणताही प्रॉब्लेम असला तरी तो मूलतः आपल्या विचार, भावना आणि वर्तन या 3 बरोबरच निगडित असतो. त्याच्यावर कसे काम करायचे, सारासार विचार कसे करावे ह्या विषयी त्या REBT या जगविख्यात थेरपीचा सखोल अभ्यास करून शिकवतात. त्यांनी युकेला जाऊन हिप्नो थेरपी देखील केलेली आहे.
काहीतरी नवीन शिकायची आवड माणसाला स्वस्थ बसू देत नाही, मग वयाचे बंधन नसते, किती बिझी आहे त्याची अडचण नसते कारण वेळ कसाही काढला जातो इच्छा असेल तर. त्याप्रमाणेच एवढा प्रचंड अनुभव गाठीशी असताना सुद्धा, नव्या च्या शोधात , अजून Research करण्यासाठी त्या सध्या “स्पाऊजल वॉईलन्स” यावर पीएचडी देखील करीत आहेत.
2016 पासून त्या श्यामची आई फाउंडेशन याच्या अध्यक्षा आहेत. त्याचबरोबर बालभारती मधून “सेल्फ डेव्हलपमेंट” आणि “आर्ट ॲप्रीसीएशन” या पुस्तकांसाठी त्या chair person होत्या त्याच बरोबर मानसशास्त्राची ११ वी आणि १२वी च्या पुस्तकांसाठी देखील त्या Chair person होत्या.
आपल्या अनुभवाचा, ज्ञानाचा लोकांबरोबरच काही सामाजिक संस्थांना, सेवाभावी संस्थांना फायदा होईल यासाठी त्या प्रयत्नशील असतात.
शामची आई फाउंडेशन मधून “अविरत” नावाचा ऑनलाईन कोर्स चाळीस हजार शालेय शिक्षकां बरोबर त्यांच्या कंटिन्यूअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट साठी घेतला होता.
महिलांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी, तिला Stress ला/ संकटांना योग्य प्रकारे हाताळण्याचे मानसिक बळ मिळण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. म्हणूनच महाराष्ट्र वुमन कमिशन च्या वतीने POSH साठी ऑनलाईन कोर्सेस डिझाईन करून भारतभर त्याचे ट्रेनिंग घेत असतात.
त्यांनी विविध व्यवसायिक सेटिंग्स मध्ये कॉर्पोरेट सेटिंग मध्ये खूप कळजीपूर्वककाम केलं आहे, असोसिएट प्रोफेसर अशी पद भूषवली. फर्ग्युसन कॉलेज, संचेती कॉलेज, एसएनडीटी कॉलेज या ठिकाणी त्या व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जात होत्या.
Cinema and Psychology, Social Psychology, Adjustment Psychology Religion and Psychology, Psychology of Gender Positive Psychology यासारखे अनेक कोर्सेस त्यांनी शिकवले आणि व्यक्तिमत्त्व घडवले.
कोणत्याही मानसिक आजारात त्या व्यक्ती बरोबर तेवढेच महत्वाचे असतात त्याच्या आजूबाजूचे निकटवर्तीय . त्यांच्यासाठी – स्क्रीझोफिनीच्या केअर गिव्हर्स साठी त्यांनी ट्रेनिंग म्यान्युअल डेव्हलप केले आहे.
ILS लॉ कॉलेजच्या women study center मधून शिरिषा मॅडम आणि अजून काही दिग्गज लोकांनी मिळून Counsellors and Social workers ह्यांच्यासाठी Domestic Violence वर ट्रेनिंग म्यान्युअल डेव्हलप केले आहे.
असलेले Wisdom, आलेले अनुभव शब्दबद्ध करून ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिरीषा साठे आणि हेमा होनवड या दोघींनी मिळून “विधायक शिस्त” असे पुस्तक लिहिले आणि त्याला स्वर्गीय डॉक्टर कुमुद बंसल यांचे अवॉर्ड देखील मिळाले.
शिरीषा साठे यांनी Role of Ayurvedic Medicines in Enhancing Intellectual Ability हा पेपर देखील International conference मध्ये प्रेझेंट केलेला आहे.
विविध वृत्तपत्रांमध्ये देखील शिरीषा साठे यांनी लिखाण केलेले आहे त्यामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट, पेरेंटिंग, रिलेशन्सशिप इत्यादी विषयाला त्यांनी हात घातला आहे.
वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी रेडिओ आणि टीव्ही वरती इंटरव्यू दिलेले आहेत. देशाची आजची पिढी मानसिक ताण तणावां पासून दूर राहावी म्हणून तरुणांसाठी त्यांनी बरेचसे वर्कशॉप्स कंडक्ट्स केलेले आहेत.
टेक्सस स्कूल ऑफ मेंटल हेल्थ मधून त्यांनीं “psycho Oncology” वरती ऑनलाईन कोर्स डेव्हलप केला आहे. या गंभीर विषयाला शीरिषा मॅडम नक्कीच सहज सोप्पे करून सांगत असतील.
“दि अमुक तमुक शो – TATS” या सुप्रसिद्ध YouTube Channel साठी मानसिक आजार या विषयावर झालेल्या चर्चा सत्राचे Eposides सोशल साईट्स वर खूप प्रसिद्ध आहेत.
मानसिक स्वास्थ्यासाठी सर्वतोपरी प्रचार – प्रसार करणाऱ्या या Campaigner दुर्गेला Salute..
चला या नवरात्रीत जाणून घेऊया मन:शक्ती ची उपासना करणाऱ्या, मन:शक्ती चा जागर करणाऱ्या “मानसशास्त्रातील नवदुर्गा”
या पोस्टला आणि आमच्या सोशल मीडिया channels ला Like, Follow आणि Subscribe नक्की करा… जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा.
श्रेया कुलकर्णी
Founder Myndful Mantras
Clinical Psychologist
Mindset Trainer